SSC HSC Exam : 10वी-12वीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेचा फॉर्म नंबर 17 भरून दहावी-बारावीची (SSC HSC Exam) परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत; असं  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 10वीसाठी http://form17.mh-ssc.ac.in आणि 12वीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. खासगी विद्यार्थ्यांना विलंब शुल्काने नाव (SSC HSC Exam) नोंदणी करण्यासाठी शेवटची तरीख 20 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com