Home Blog Page 191

Education : आता लाड नाही!! 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार 

Education (10)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या (Education) पालकांसाठी महत्वाची अपडेट आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. परीक्षेत नापास झाल्यानंतर पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र, तरीही विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात बसवले जाईल. हा बदल 2023-2024 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

दोन्ही इयत्तांसाठी प्रत्येक विषयासाठी 50 ते 60 गुणांसाठी ही परीक्षा होईल. भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. कला, कार्यानुभव आदी (Education) इतर विषयांकरिता सध्या प्रचलित असलेले आकारिक मूल्यमापन केले जाईल. इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस म्हणजे एप्रिल महिन्यात होईल आणि इतर इयत्तांसमवेत यांचा निकाल जाहीर केला जाईल. किमान 35 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील.
2010 पासून शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धती बंद करण्यात आली. मात्र, यामुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे राहतात, अशी ओरड सर्वत्र होऊ लागल्याने पाचवी आणि आठवी करता पुन्हा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

असे आहेत निकष (Education)
 परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण दिले जातील. मात्र, तरीही तो एक किंवा एकाहून अधिक विषयांत अनुत्तीर्ण होत असेल तर पुनर्परीक्षा घेतली जाईल, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केले जाईल, पुनर्परीक्षाही मूळ परीक्षेनुसारच असेल. विदर्भ वगळता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येईल. पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीत प्रवेश द्यायचा असल्यास पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIS Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये थेट मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा!!

ESIS Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS Recruitment 2023) अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी
भरले जाणारे पद आणि शैक्षणिक पात्रता –
1. पूर्णवेळ आणि अर्धवेळ तज्ञ – 04 पदे
– आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.B.B.S. P.G सह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य पदासह पी.जी. 3 वर्षांचा अनुभव किंवा पी.जी. (ESIS Recruitment 2023)
2. वैद्यकीय अधिकारी – 07 पदे
– आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.B.B.S. P.G सह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य
पद संख्या – 11 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – ESIS हॉस्पिटल, वरळी, मुंबई-18
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 67 वर्षे असावे
मिळणारे वेतन – रु. 60,000/- ते रु. 1,29,000/- दरमहा
नोकरीचे ठिकाण – मुंबई

काही महत्वाच्या लिंक्स – (ESIS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ‘या’ पदांवर नोकरीची संधी; मिळेल 90 हजारापर्यंत पगार

Banking Job (18)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सहकारी (Banking Job) बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

बँक – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 20 पदे (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. व्यवस्थापक – 10 पदे
B.E/ B. Tech
2. सहव्यवस्थापक – 02 पदे
B.E/ B. Tech
3. सहायक व्यवस्थापक – 06 पदे
B.E/ B. Tech
4. उप महाव्यवस्थापक – 02 पदे
किमान II वर्ग असलेल्या कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी. अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल

वय मर्यादा – 35 ते 59 वर्षे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मिळणारे वेतन – (Banking Job)
1. व्यवस्थापक- 77,000/- रुपये दरमहा
2. सहव्यवस्थापक -65,000/- रुपये दरमहा
3. सहायक व्यवस्थापक -62,000/- रुपये दरमहा
4. उप महाव्यवस्थापक -90,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2023 : मेगाभरती!! 12 वी पास ते पदवीधारकांसाठी इंडियन ऑईलमध्ये भरती सुरु

IOCL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये (IOCL Recruitment 2023) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदाच्या एकूण 1603 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

संस्था – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद –
1. ट्रेड अप्रेंटिस
2. तंत्रज्ञ अप्रेंटिस
पद संख्या – 1603 पदे (IOCL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th/ ITI/ Diploma/ B.A/ B.Com/ B.Sc/ BBA
वय मर्यादा – 18 वर्षे ते 24 वर्षे
(वयोमर्यादेच्या गणनेसाठी महत्त्वपूर्ण तारीख 30.11.2023 आहे. नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.)
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. कागदपत्रांची पडताळणी
3. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स – (IOCL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ayodhya Ram Mandir : ‘हा’ आहे अयोध्येतील नव्या राम मंदिराचा पुजारी; 3 हजार उमेदवारांमधून झाली निवड; किती मिळणार पगार?

Ayodhya Ram Mandir

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाची सध्या जोरात तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. याआधी नव्या राम मंदिराच्या पुजाऱ्याचीही निवड झाली आहे. या भरतीसाठी सुमारे 3 हजार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

कोण आहे नवा पुजारी
एका रिपोर्टनुसार अशी माहिती आहे, की गाझियाबादचा विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्या राम मंदिराचा पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ते गाझियाबाद येथील दूधेश्वर वेद विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून 20 जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी (Ayodhya Ram Mandir) एक मोहित आहे. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हा सीतापूर येथील रहिवासी आहे. त्याने दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी तो तिरूपतीला गेला. आचार्यची पदवी घेतल्यानंतर तो पीएचडीची देखील तयारी करत आहे. अशातच त्यानं राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्याची निवड झाली.

एवढा मिळणार पगार (Ayodhya Ram Mandir)
पूर्वी मुख्य पुजाऱ्याला २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला २० हजार रुपये मिळत होते. मात्र आता राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचं वेतन ३२,९०० रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याचा पगार ३१,९०० रुपये करण्यात आला. तसेच इतर पुजारी आणि सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापूर्वी येथील मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजारी यांचे पगार खूपच कमी होते. त्या काळात मुख्य पुजाऱ्यांना केवळ १५,५२० रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना ८,९४० रुपये एवढा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ दिली आणि मुख्य पुजाऱ्यांना २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्यांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार २५ हजारांवरून ३२ हजार ९०० रुपये तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३१,००० रुपये करण्यात आला आहे.

23 जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन मिळणार
22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व राम भक्तांना भव्य मंदिरात प्रभू रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराच्या आतील बाजूने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून प्रसाद वाटपासोबतच वाहतूक मार्ग सुरळीत करण्यावर भर दिला (Ayodhya Ram Mandir) जाणार आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला आरामात दर्शन घेता यावे, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज दीड ते अडीच लाख लोकांना प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येणार आहे. चार रांगेत दर्शनाची व्यवस्था असणार आहे.
विमानतळही होतंय तयार 
अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 डिसेंबरपर्यंत तयार होणार असल्याची माहिती आहे. यासह विमानसेवाही सुरू होणार आहे. येथे 2200 मीटर धावपट्टी उघडली जाणार आहे, ज्यावर छोटी विमाने तसेच बोईंग 737, एअरबस 319 आणि एअरबस 320 सारखी मोठी विमाने उतरू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2023 : 10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुषखबर!! इस्रोमध्ये ‘या’ पदांवर निघाली भरती

ISRO Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन ।  इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा (ISRO Recruitment 2023) असणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. इस्रोने विविध पदांच्या 54 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10वी आणि ITI पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – इस्रो (Indian Space Research Organisation)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
पद संख्या – 54 पदे

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) –
NSLC/SSC पास, NCVT कडून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
2. तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रिकल) – (ISRO Recruitment 2023)
NSLC/SSC पास, NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
3. तंत्रज्ञ-बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) –
NSLC/SSC पास, NCVT कडून इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
4. तंत्रज्ञ-बी (फोटोग्राफी) –
SSLC/SSC पास, NCVT कडून डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC.
5. तंत्रज्ञ-बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर) –
NSLC/SSC पास, NCVT कडून डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC

वय मर्यादा – (ISRO Recruitment 2023)
18 ते 35 वर्षे
(SC/ST उमेदवार: 5 वर्षे, ओबीसी उमेदवार: 3 वर्षे)
परीक्षा फी – 500 रूपये
मिळणारे वेतन – 21, 700 ते 69,100 रुपये
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. कौशल्य चाचणी

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जनरल नॉलेजचे ‘हे’ प्रश्न परीक्षेत चांगले मार्क मिळवून देतील; तुम्हाला माहित आहेत का उत्तरे?

GK Updates 11 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
उत्तर – युनायटेड स्टेट्स.
प्रश्न  2 – NASA ने प्रक्षेपित केलेल्या नवीन अंतराळ दुर्बिणीचे नाव काय आहे?
उत्तर – जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप.
प्रश्न 3– जगातील सर्वाधिक भेट दिलेला देश कोणता आहे?
उत्तर – फ्रान्स.

प्रश्न 4– जगातील सर्वात मोठ्या महासागराचे नाव काय आहे?
उत्तर – प्रशांत महासागर.
प्रश्न 5– कोणत्या ग्रहाला सर्वाधिक वलय आहेत?
उत्तर – शनी (GK Updates)
प्रश्‍न 6– भारत सरकारने अलीकडे कोणता कायदा केला आहे जो सोशल मीडियाचे नियमन करेल?
उत्तर – वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, 2022.

प्रश्न 7– जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर – सहारा वाळवंट.
प्रश्न 8 – क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
उत्तर – व्हॅटिकन सिटी.
प्रश्न 9– जगातील सर्वात प्रसिद्ध शिल्प कोणते आहे?
उत्तर – डेव्हिड.
प्रश्न 10 – (GK Updates) जगातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे?
उत्तर – लॉर्ड ऑफ द रिंग्ज.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : घरच्यांना लग्नाला नकार दिला; नोकरीसह अभ्यास केला अन् अभिलाषा बनली IAS…

UPSC Success Story of IAS Abhilasha Abhinav

करिअरनामा ऑनलाईन । अभिलाषा यांचा IAS होण्याचा (UPSC Success Story) प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. तेलंगणा केडरच्या आयएएस अधिकारी अभिलाषा अभिनव मूळच्या पाटणा, बिहार येथील आहेत. अभिलाषा UPSC नागरी सेवा परीक्षेत 2017 मध्ये 18 वा क्रमांक मिळवून IAS बनल्या आहेत.  केवळ यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठीच त्यांना संघर्ष करावा लागला नाही, तर त्या आधी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होतील आणि नंतरच लग्नाचा विचार करतील हा निर्णय त्यांच्या कुटुंबाला पटवून देण्यासाठीही त्यांनी मोठी धडपड केली.

माझं इतक्यात लग्न करु नका
नागरी सेवा परीक्षेची तयारी करणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांना फक्त UPSC उत्तीर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत तर अनेक आघाड्यांवरही त्यांना संघर्ष करावा लागतो. ती जर एखादी मुलगी असेल तर हा संघर्ष आणखीनच वाढतो. बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असलेल्या IAS अभिलाषा अभिनवची कहाणीही अशीच आहे. नोकरीसोबतच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. त्यांचे लवकर लग्न करु नये म्हणून आई-वडिलांना पटवून दिले आणि नंतर त्या स्वतः ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचू शकल्या आहेत.

B.Tech नंतर मिळाली नोकरी (UPSC Success Story)
अभिलाषा ही शालेय जिवनापासून हुशार विद्यार्थिनी होती. त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथून झाले. त्यांनी इयत्ता 10 वी परिक्षेत शाळेत टॉप केले होते तर बारावीत 84 टक्के गुण मिळवले होते. बारावीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील ए. एस.  कॉलेजमधून B. Tech पूर्ण केले. अभ्यासासोबतच खेळातही अभिलाषा नेहमीच पुढे असायच्या. अभिलाषा यांना B.Tech पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाली तरीही त्यांची UPSC ची तयारी सुरुच होती.

IAS ऐवजी IRS पद मिळाले
अभिलाषा यांनी 2014 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला होता. त्यांना पहिल्या प्रयत्नात पूर्व परिक्षेत अपयश आले; पण त्या खचल्या नाहीत. 2016 मध्ये त्यांनी UPSC चा दुसऱ्यांदा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतात 308 वा क्रमांक पटकावला. त्यांना IAS ऐवजी IRS सेवा मिळाली.
IRS पद सोडून पुन्हा दिली परीक्षा (UPSC Success Story)
अभिलाषा दुसऱ्या प्रयत्नात IRS होण्यात यशस्वी ठरल्या मात्र यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना IAS अधिकारीच व्हायचे होते. यानंतर त्यांनी UPSC 2017 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी स्वतःचे सर्व विक्रम मोडून 18 व्या रँकसह IAS होण्यात यशस्वी झाल्या. नोकरीसोबतच UPSC ची तयारी करण्यासाठी त्या म्हणतात की, ज्या उमेदवारांकडे ऐष आराम आहे त्यांनी त्याचा गैरवापर करु नये. जो वेळ मिळेल तो योग्य कामासाठी वापरा.

UPSC देणाऱ्यांना दिला मोलाचा सल्ला
नागरी सेवा परीक्षेच्या तयारीबाबत अभिलाषा म्हणतात; “या परीक्षेचे तीन महत्वाचे टप्पे लक्षात घ्या. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी अगदी सुरुवातीपासूनच करा. टॉपर्स उमेदवारांच्या मुलाखती अवश्य पहा. जेणेकरून यश कसे मिळवता येते हे समजेल. धोरण तयार करा आणि अभ्यासावर (UPSC Success Story) लक्ष केंद्रित करा.”  त्या पुढे म्हणतात; “ज्यांना नोकरीसोबतच UPSC ची तयारी करायची आहे त्यांनी वीकेंडचा लाभ घ्या. ऑफिसमध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्याचा अभ्यासासाठी चांगला उपयोग करा. मी ऑफिसला जाताना फोनवर अभ्यास करायचे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका आणि स्वतःशी प्रामाणिक रहा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPS Training Centre : असे तयार होतात IPS अधिकारी; कोठे आणि किती दिवस चालते ट्रेनिंग? जाणून घ्या….

IPS Training Centre

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. उमेदवारांना (IPS Training Centre) अनेक कसोट्या पार करत या पदापर्यंत पोहचावे लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी अशा सर्व कसोट्या पार केल्यानंतर उमेदवारांना अत्यंत कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. UPSC ची परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांपुढील आव्हाने कमी होत नाहीत. यानंतर त्यांना पुढचा टप्पा पार करावा लागतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत CSE परीक्षा घेतली जाते. त्यानंतर उमेदवार IPS, IAS, IFS, IRS होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देशात IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होते आणि ते किती दिवस चालते.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरीनंतर उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे जावे लागते. त्यानंतर (IPS Training Centre) त्यांना येथे 11 महिने प्रशिक्षण दिले जाते. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 6 महिन्यांच्या जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते. यानंतर हे उमेदवार पुन्हा SVPNPA हैदराबाद येथे परततात.

येथे होतो फाऊंडेशन कोर्स
UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, IPS प्रशिक्षणाचा प्रारंभिक टप्पा फक्त IAS अधिकार्‍यांसह केला जातो. त्यांना LBSNAA, मसूरी येथे फाउंडेशन कोर्स देखील करावा लागत. या प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने आहे. यानंतर, येथून IAS आणि IPS प्रशिक्षणार्थींचे मार्ग वेगळे होतात.

IPS चे पुढील प्रशिक्षण येथे होते (IPS Training Centre)
आता या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी सरदार वल्लभभाई पटेल (SVPNPA) राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे हजर रहावे लागते. त्यानंतर त्यांना 11 महिने प्रशिक्षण दिले जाते. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते, जे 6 महिन्यांचे असते. यानंतर हे उमेदवार पुन्हा SVPNPA, हैदराबाद येथे परततात, जिथे ते पुन्हा प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यातून जातात. यानंतर त्यांना कुठेतरी अंतिम पोस्टिंग दिली जाते. वेगवेगळ्या टप्प्यात होणारे हे प्रशिक्षण खडतर असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HDFC Scholarship 2023-24 : HDFC बँक देणार 75 हजाराची स्कॉलरशीप; पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

HDFC Scholarship 2023-24

करिअरनामा ऑनलाईन ।  शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (HDFC Scholarship 2023-24) होतकरु विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. HDFC बँकेने 2023-24 या वर्षासाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीची  रक्कम, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घेवूया…

‘एचडीएफसी बँक परिवर्तन योजने’च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी, पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतात.
1. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये 55 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
2. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3. उमेदवार भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

एवढी रक्कम मिळणार – (HDFC Scholarship 2023-24)
1. उमेदवारांना मिळणारी शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे. इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल.

1 पदव्युत्तर पदवी ( जनरल ) ३५ हजार रुपये
2 पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) ७५ हजार रुपये
3 पदवी ( जनरल) ३० हजार रुपये
4 पदवी ( प्रोफेशनल) २५ ते ५० हजार रुपये
5 आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा १८ आजार रुपये
6 इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत १८ आजार रुपये
7 इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत १५ हजार रुपये

 

कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक –
1. पासपोर्ट साईज फोटो
2. मागील वर्षाचे गुणपत्रक
3. आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना, चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र (HDFC Scholarship 2023-24)
4. बोनाफाईड सर्टिफिकेट/ फीस पावती
5. पालकांचा उत्पनाचा दाखला.

कसा करायचा अर्ज –
पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी आणि शिष्यवृतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com