IPS Training Centre : असे तयार होतात IPS अधिकारी; कोठे आणि किती दिवस चालते ट्रेनिंग? जाणून घ्या….

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. उमेदवारांना (IPS Training Centre) अनेक कसोट्या पार करत या पदापर्यंत पोहचावे लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी अशा सर्व कसोट्या पार केल्यानंतर उमेदवारांना अत्यंत कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. UPSC ची परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांपुढील आव्हाने कमी होत नाहीत. यानंतर त्यांना पुढचा टप्पा पार करावा लागतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत CSE परीक्षा घेतली जाते. त्यानंतर उमेदवार IPS, IAS, IFS, IRS होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देशात IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होते आणि ते किती दिवस चालते.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरीनंतर उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे जावे लागते. त्यानंतर (IPS Training Centre) त्यांना येथे 11 महिने प्रशिक्षण दिले जाते. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 6 महिन्यांच्या जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते. यानंतर हे उमेदवार पुन्हा SVPNPA हैदराबाद येथे परततात.

येथे होतो फाऊंडेशन कोर्स
UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, IPS प्रशिक्षणाचा प्रारंभिक टप्पा फक्त IAS अधिकार्‍यांसह केला जातो. त्यांना LBSNAA, मसूरी येथे फाउंडेशन कोर्स देखील करावा लागत. या प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिने आहे. यानंतर, येथून IAS आणि IPS प्रशिक्षणार्थींचे मार्ग वेगळे होतात.

IPS चे पुढील प्रशिक्षण येथे होते (IPS Training Centre)
आता या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी सरदार वल्लभभाई पटेल (SVPNPA) राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे हजर रहावे लागते. त्यानंतर त्यांना 11 महिने प्रशिक्षण दिले जाते. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते, जे 6 महिन्यांचे असते. यानंतर हे उमेदवार पुन्हा SVPNPA, हैदराबाद येथे परततात, जिथे ते पुन्हा प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यातून जातात. यानंतर त्यांना कुठेतरी अंतिम पोस्टिंग दिली जाते. वेगवेगळ्या टप्प्यात होणारे हे प्रशिक्षण खडतर असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com