Home Blog Page 151

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा येथे अधिकारी, व्यवस्थापकासह विविध पदावर भरती सुरु; ताबडतोब करा APPLY

BOB Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या (BOB Recruitment 2024) एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (BOB Recruitment 2024)

पदपद संख्या 
अग्निशमन अधिकारी02
व्यवस्थापक10
वरिष्ठ व्यवस्थापक09
मुख्य व्यवस्थापक01

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. देय तारखेनंतर प्राप्त (BOB Recruitment 2024) झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित; इथे करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत (Job Alert) वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

संस्था – कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे
भरले जाणारे पद – वकील
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख –
22 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
The Applicant should be practicing advocate and should have at least 5 years experience of conducting Civil, Criminal, Labour and Industrial, Service matters, as the case may be as on 01-03- 2024 (However seniority in the profession will be considered as an additional qualification)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Alert) कागदपत्रे सादर करायची आहेत.
4. अर्ज केवळ ई-मेलद्वारेच स्विकारले जातील.
5. अर्जाबाबत कसलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
6. भरती संदर्भात सर्व सुचना उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
7. अर्ज प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : बी.टेक., एमबीए, बँकर ते आयएएस पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; IAS होवून स्वप्न केले साकार

Career Success Story of IAS Priyamvada Mhaddalkar

करिअरनामा ऑनलाईन । वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिला (Career Success Story) कलेक्टर व्हायचं होतं. आपण IAS अधिकारी होवून करिअर करायचं असा प्रियंवदा ने निर्धारच केला होता. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने इन्व्हेस्टमेंट बँकरची मोठ्या पगाराची नोकरी सोडली. यासाठी 2020 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. या परिक्षेत संपूर्ण भारतातून 13 वी रॅंक मिळवत ती IAS अधिकारी बनली आहे. उच्च शिक्षणानंतर 6 वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकरी ते आयएएस अधिकारी होण्याचा तिचा प्रवास कसा होता ते पाहूया….

बी.टेक., एमबीए, बँकर ते आयएएस
प्रियंवदा अशोक म्हादळकर (IAS Priyamvada Mhaddalkar) ही महाराष्ट्रातील रत्नागिरीची रहिवासी आहे. 2021 मध्ये UPSC ने घेतलेल्या परिक्षेत ती 13 वा क्रमांक मिळवून टॉपर ठरली आहे. वयाच्या 31 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. तिने परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. (B.Tech) केल्यानंतर तिने आयआयएम बंगळुरूमधून एमबीए (MBA) केले. एमबीएनंतर प्रियंवदाला एका इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली. तिने 6 वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये काम केले आहे.

वडिलांकडून मिळाली प्रेरणा (IAS Priyamvada Mhaddalkar)
प्रियंवदाचे वडील महाराष्ट्र सरकारमध्ये कर्मचारी होते. प्रियंवदाला नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा तिच्या वडिलांकडून मिळाली. पण त्यावेळची परिस्थिती आणि योगायोगामुळे इंजिनीअरिंग आणि एमबीए केल्यानंतर अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात तिने काम केले.

एवढी होती गुणांची कमाई (Career Success Story)
प्रियंवदाने यूपीएससी (UPSC) मेन्समध्ये समाजशास्त्र हा पर्यायी विषय म्हणून ठेवला होता. तिला यूपीएससीमध्ये 2025 पैकी 1024 गुण मिळाले. तिला UPSC मेन्समध्ये 826 आणि मुलाखतीत 275 पैकी 198 गुण मिळाले होते. यूपीएससीच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवणे, असे तिचे मत आहे. या वेळापत्रकाचे ती नियमीत पालन करायची. नोट्स बनवण्यावरही तीने खूप जोर दिला. नोट्स स्वतःच्या शब्दात बनवायला हव्यात. त्यामुळे विषय समजून घेणे आणि दीर्घकाळ लक्षात ठेवणे सोपे होते, असे प्रियंवदाचे (IAS Priyamvada Mhaddalkar) मत आहे.
प्रियंवदा दररोज 9 ते 10 तास अभ्यास करायची. नागरी सेवेच्या परीक्षेत बातम्या आणि चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सातत्य आणि दिनचर्या आवश्यक असते. या सातत्यामुळे तिला अनेक प्रकारे मदत झाली आहे.

प्रवास कठीण आहे, धीर धरावा लागेल”
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना प्रियंवदा सांगते; “तुम्ही अभ्यास केलेला विषय लिहिण्याचा सराव केला की संकल्पना स्पष्ट होते. तसेच, जर नोट्स स्वतः बनवल्या असतील तर त्या नंतर उजळणी करताना खूप मदत करतात. मॉक टेस्ट दिल्याने उत्तरे चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होते. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी स्वतःला प्रेरित आणि सकारात्मक ठेवले पाहिजे. हा प्रवास लांबचा आणि कठीण आहे, म्हणून धीर धरावा लागेल”,
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become RBI Governor : कसं व्हायचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर? काय असते पात्रता? गलेलठ्ठ पगारासह मिळतात इतरही सुविधा

How to Become RBI Governor

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे (How to Become RBI Governor) देशातील सर्वोच्च पदांपैकी एक पद आहे. या पदाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. RBI गव्हर्नर कसे व्हायचे हे तुम्हाला माहित आहे का? तसेच या पदापर्यंत पोहचण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? या सर्वोच्च पदापर्यंत पोहचणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळतो? आज आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत…

देशातील सर्वोच्च पदापैकी एक पद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India ) गव्हर्नर होणे ही एक उच्च-प्रोफाइल नोकरी आहे. पूर्वी हे पद पदोन्नतीसह IAS (IAS) अधिकाऱ्यांना दिले जात होते, परंतु आता कोणताही पदवीधर, पदव्युत्तर तसेच चार्टर्ड अकाउंटंटची पदवी (How to Become RBI Governor) असणारा आणि कामाचा दीर्घ अनुभव असणारा उमेदवार RBI चा गव्हर्नर बनू शकतो. या पदावर पात्र होण्यासाठी अर्थशास्त्रातील पदवी असणे हा एक अतिरिक्त फायदा आहे.

RBI गव्हर्नर होण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक
1. RBI गव्हर्नर होण्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
2. या पदावर नियुक्तीसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 40 ते 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
3. या व्यक्तीला बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कामाचा किमान 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4. ती व्यक्ती एखाद्या नामांकित बँकिंग, आर्थिक किंवा शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत असावी.
5. ती व्यक्ती देशातील कोणत्याही (How to Become RBI Governor) राजकीय पक्षाशी संबंधित नसावी.
6. टीअ व्यक्तीकडे जागतिक बँक किंवा IMF मध्ये काम करण्याचा अनुभव असावा.
7. या व्यक्तीने अर्थ मंत्रालयात काम केले असावे.
8. संबंधित व्यक्ती बँकेचे अध्यक्ष किंवा महाव्यवस्थापक असणे आवश्यक आहे.

RBI गव्हर्नर पदावर अशी होते नियुक्ती (How to Become RBI Governor)
RBI गव्हर्नरची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे (ACC) केली जाते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. कॅबिनेटची नियुक्ती समिती या पदासाठी विहित केलेल्या पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची RBI गव्हर्नर पदावर नियुक्ती करते.

RBI गव्हर्नरला किती पगार मिळतो?
आरबीआय गव्हर्नरच्या (Governor) स्वाक्षरीनंतरच नोटांची छपाई होते. त्यांचे मुख्य कार्य आर्थिक धोरण तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि देखरेख करणे हे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावर (How to Become RBI Governor) असलेल्या व्यक्तीला भारत सरकार दरमहा अडीच लाख रुपये पगार देते. याशिवाय त्यांना अनेक प्रकारच्या जीवनावश्यक सुविधाही दिल्या जातात.

तगड्या पगारासोबत मिळतात ‘या’ सुविधा
RBI चे मुख्यालय देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे आहे. येथे पगाराव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला एक मोठे अधिकृत निवासस्थान, कार आणि ड्रायव्हरसह इतर सुविधा देखील दिल्या जातात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : रेल्वे सहायक लोको पायलट भरतीच्या 5696 जागांसाठी वयाची मर्यादा वाढवली

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे विभागांत सहायक (Railway Recruitment 2024) लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे; याबाबत महत्वाची अपडेट आह. या भरती प्रक्रियेत वयाची अट तीन वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5696 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोना काळात दोन वर्षे परीक्षा घेता आल्या नाहीत. परिणामी अनेक उमेदवारांची वयाची मर्यादा उलटून गेल्याने त्यांना भरती आणि नोकरीपासून वंचित रहावे लागले. याचा विचार करुन रेल्वेने सहायक लोको पायलट (Loco Pilot) पदासाठीच्या वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत दिली आहे. सहाय्यक लोको पायलट नियुक्तीसाठीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी रीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर केले आहे.

प्रवर्गनिहाय वयाची सवलत –
1. सर्वसाधारण – ३० ऐवजी ३३
2. ओबीसी – ३३ ऐवजी ३६
3. एससी, एसटीचे – ३५ ऐवजी ३८ वयाचे उमेदवार अर्ज करू शकतील. त्यासाठी सर्वसाधारण व इडब्ल्यूएसच्या उमेदवारांची जन्म तारीख २ जुलै १९९१ ते १ जुलै २००६, ओबीसींचे २ जुलै १९८८ ते १ जुलै २००६, एससी, एसटी उमेदवारांचे २ जुलै १९८६ ते १ जुलै २००६ दरम्यान असायला हवे.

भरती विषयी – (Railway Recruitment 2024)
या भरतीसाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण अथवा आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. उमेदवार १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतील. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० तर राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये शुल्क आहे.

अशी होणार परीक्षा –
– रेल्वे बोर्डाकडून ७५ गुणांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. त्यासाठी ६० मिनिटांत ७५ प्रश्न सोडवावे लागतील.
– यानंतर चाळणी आणि कागदपत्रांची (Railway Recruitment 2024) पडताळणी केली जाईल.
– त्यानंतर सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आदींवर चाचणी होईल. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2024 : 10 वी/12 वी पाससाठी खुषखबर!! भाभा अणु संशोधन केंद्रात थेट द्या मुलाखत

BARC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्रात तंत्रज्ञ/बी पदाच्या (BARC Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ/बी
पद संख्या – 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक आहे; तसेच 1 वर्ष कालावधीचे व्यापार प्रमाणपत्र (विज्ञान आणि गणितासह एसएससी किंवा एचएससीमध्ये किमान 60% गुण) असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 50 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (BARC Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 11,730/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – Conference Room No.2, Ground floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.
मुलाखतीची तारीख – 22 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BARC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नव्हतं म्हणून दिली UPSC; IIS अधिकारी होवून स्वप्न केले साकार

UPSC Success Story of IIS Anubhav Dimri

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडच्या देवभूमीला लष्करी भूमी (UPSC Success Story) म्हणून ओळख आहेच पण याबरोबरच इथल्या नगरिकांनी सैन्य, शिक्षण, साहित्य, सुरक्षा सल्लागार, सीडीएस, आयएएस, आयपीएस अशा अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या देवभूमीतील रहिवाशांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील डिमर गावातील तरुण अधिकारी अनुभव डिमरी (IIS Anubhav Dimri) याचं. अनुभव दुसऱ्याच प्रयत्नात UPSCची परीक्षा पास झाला आणि सध्या तो IIS पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करूनही नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तो यामध्ये यशस्वी झाला; पाहूया त्याच्या वाटचाली विषयी…

आर्मी स्कूलमध्ये झाले शिक्षण
अनुभवचे वडील चंद्रशेखर डिमरी 3 गढवाल रायफलमध्ये तैनात होते तर त्याची आई विजया डिमरी गृहिणी आहे. वडिलांच्या सैन्यातील नोकरीमुळे त्यांची देशात कुठेही बदली होत असे. त्यामुळे त्याचे बालपण आर्मी स्कूल, मेरठ, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेले. 12 वीनंतर मात्र तो पदवी करण्यासाठी दिल्लीत आला आणि आयपी युनिव्हर्सिटी दिल्लीतून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

IT क्षेत्रात फार रस नव्हता (UPSC Success Story)
अनुभवने सांगितले की, “कॉम्प्युटर सायन्स आणि कोडिंग आणि डिकोडिंगमध्ये माझे मन रमत नाही; हे लक्षात आल्यानंतर मी दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा विचार केला. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षापासून मी यूपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. 2019 मध्ये मी पहिल्यांदा परीक्षा दिली पण माझा हा प्रयत्न असफल ठरला. मी पूर्व परीक्षा पास करु शकलो नाही. पण मी मागे हटलो नाही. मी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला आणि जोरदार तयारी सुरु केली आणि पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी पास करण्यात मला यश मिळाले. “

सरकारी अधिकारी होणारा कुटुंबातील पहिला तरुण
अनुभवला वयाच्या 26 व्या वर्षी हे यश मिळाले आहे. UPSC ने 2020 मध्ये घेतलेल्या परिक्षेत राखीव यादीत त्याला 37 वे स्थान मिळाले आणि तो IIS म्हणजेच भारतीय माहिती सेववेमध्ये सामील (UPSC Success Story) झाला. तो सध्या दिल्लीत कार्यरत आहे. अनुभव सांगतो की, त्याच्या कुटुंबातून UPSC ची परीक्षा देवून पास होणारा अनुभव (IIS Anubhav Dimri) हा पहिलाच व्यक्ति आहे. त्याच्या आधी कोणीही स्पर्धा परीक्षा दिल्या नाहीत. त्याने आपले ध्येय निश्चित केले आणि मेहनतीने लक्ष्य गाठले आहे; त्यामुळे अनुभवचे उदाहरण तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल हे निश्चित.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

MS Excel Free Online Course

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम केवळ कौशल्यावर आधारित नोकऱ्यांनुसार तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक आहे कॉम्प्युटर मधील एक्सेल कोर्स.

पॉवर पॉईंट (Power Point) प्रेझेंटेशन आणि एम एस वर्ड (MS Word) ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल (MS Excel) शीट्सपर्यंत, काही कौशल्ये आहेत जी नेहमी नोकरीच्या बाजारपेठेत आवश्यक असतात. जर कोणाकडे (MS Excel Free Online Course) व्यावसायिक पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्र यासह एक्सेल शीटवर काम करण्याचे कौशल्य असेल, तर हे स्किल तुम्हाला नोकरी मिळवण्यास मदत करू शकते. यामुळे उमेदवाराचा Resume प्रभावी होवू शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की MS Excel हा कोर्स तुम्ही मोफतपणे कुठे शिकू शकता याविषयी…

1. मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
मायक्रोसॉफ्ट त्यांच्या वेबसाइटवरच एमएस एक्सेलवर काम करण्याचे प्रशिक्षण देते. कंपनीने आपल्या वेबसाइटवर व्हिडिओ ट्यूटोरियल अपलोड केले आहेत. हे पाहून एक्सेल शीटवर काम करण्याचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करता येते.

2. उडेमी (Udemy) (MS Excel Free Online Course)
Udemy ही एज्युटेक कंपनी आहे. हे त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विनामूल्य अनेक अभ्यासक्रम देतात. या प्लॅटफॉर्मवर एक्सेल शीट्सशी संबंधित अनेक कोर्सेस करता येतात. ज्यामध्ये मूलभूत ते प्रगत स्तरापर्यंतच्या लहान अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

3. लिंक्डइन (LinkedIn)
व्यवसाय आणि रोजगार केंद्रित सोशल मीडिया (MS Excel Free Online Course) प्लॅटफॉर्म LinkedIn वर देखील काही कोर्स करता येतात. या प्लॅटफॉर्मवर एक्सेलच्या टिप्ससह अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

4. कोर्सेरा (Coursera)
कोर्सेरा या ऑनलाइन ट्यूटोरियल प्लॅटफॉर्मवर शेकडो विनामूल्य ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यापैकी एक आहे एक्सेल कोर्स. एक्सेल शीटशी संबंधित अनेक (MS Excel Free Online Course) कोर्सेस आहेत. ज्यामध्ये परिचयापासून ते प्रगत स्तरापर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या ऑनलाइन कोर्सेसमध्ये डेटा ॲनालिसिस, डेटा मॅनेजमेंट इत्यादी गोष्टी एक्सेल शीटवर शिकता येतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2024 : UPSCची 1056 पदांसाठी अधिसूचना जारी; ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संघ लोकसेवा (UPSC Recruitment 2024) आयोगाने UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा परीक्षा 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामाध्यमातून 1056 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2024
पद संख्या – 1056 पदे (UPSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2024 आहे.

वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (UPSC Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/100/-
SC/ST/PWD/महिला – फी नाही
मिळणारे वेतन – 56,100/- ते 70,000/- रुपये दरमहा (आरोग्य लाभ, प्रवास प्रतिपूर्ती, स्थगित वेतन आणि अतिरिक्त लाभ)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा तारीख – 26 मे 2024
मुख्य परीक्षा तारीख – नंतर जाहीर केली जाईल

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत लोको पायलटच्या 5696 जागांसाठी जम्बो भरती; 10वी, ITI पास करु शकतात अर्ज

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत भरती होण्याची इच्छा (Railway Loco Pilot Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाने असिस्टंट लोको पायलट पदांच्या एकूण 5696 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय रेल्वे
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
पद संख्या – 5696 पदे
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (Railway Loco Pilot Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी तसेच ITI पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 19900/- रुपये दरमहा
असा करा अर्ज – (Railway Loco Pilot Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत.
4. अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
6. मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com