Home Blog Page 150

GK Updates : सरकारी परीक्षा किंवा मुलाखतीत विचारले जातात असे चक्रावून सोडणारे प्रश्न; एकदा वाचाच

GK Updates 18 Feb

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – नोबेल पारितोषिक (GK Updates) देण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – नोबेल पारितोषिक देण्याची सुरुवात 1901 मध्ये झाली होती.
प्रश्न 2 – सर्वात जास्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या व्यक्तीकडे आहेत?
उत्तर – वास्तविक, आश्रिता फरमान यांच्याकडे सर्वाधिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 2023 पर्यंत, त्यांच्याकडे सर्वात वेगवान 100 मीटर धावणे, सर्वात जलद 100 मीटर धावणे (एका पायावर) इत्यादी 600 पेक्षा जास्त विक्रम आहेत.

प्रश्न 3 – भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल (GK Updates) कोण होत्या आणि त्या कोणत्या राज्याच्या होत्या?
उत्तर – भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, ज्यांना उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल बनवण्यात आले होते.
प्रश्न 4 – कोणत्या खाद्य पदार्थात सर्वाधिक लोह आढळते?
उत्तर – सर्वाधिक लोह हिरव्या भाज्यांमध्ये आढळते.

प्रश्न 5 – सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यात आहे.
प्रश्न 6 – (GK Updates) फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक कोण होते?
उत्तर – फोर्ट विल्यम कॉलेजचे संस्थापक लॉर्ड हेस्टिंग्ज होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RITES Recruitment 2024 : महिन्याचा 1,20,000 एवढा पगार; RITES अंतर्गत ग्रॅज्युएट्सना नोकरीची उत्तम संधी

RITES Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । RITES लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची (RITES Recruitment 2024) उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ डिझाइन अभियंता, CAD ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 68 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

संस्था – राईट्स लिमिटेड (RITES LIMITED)
भरले जाणारे पद – कनिष्ठ डिझाइन अभियंता, CAD ड्राफ्ट्समन
पद संख्या – 68 पदे (RITES Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024
वय मर्यादा – 55 वर्षे

भरतीचा तपशील – (RITES Recruitment 2024)

पदपद संख्या 
कनिष्ठ डिझाइन अभियंता13 पदे
CAD ड्राफ्ट्समन55 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ डिझाइन अभियंताGraduate Engineer
CAD ड्राफ्ट्समनDiploma / ITI Draughtsman

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
कनिष्ठ डिझाइन अभियंता30,000-1,20,000
CAD ड्राफ्ट्समन20,000-66,000

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rites.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्यसह विविध पदावर नोकरी; सरकारच्या वित्त मंत्रालयात भरती सुरु

Government Job (50)

करिअरनामा ऑनलाईन । वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग (Government Job) अंतर्गत न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य) पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

विभाग – वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार
भरले जाणारे पद – न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)
पद संख्या – 96 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

भरतीचा तपशील – (Government Job)

पदपद संख्या 
न्यायिक सदस्य63
तांत्रिक सदस्य (केंद्र)32
तांत्रिक सदस्य (राज्य)01

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
4. उमेदवारांनी अर्ज शुल्क (Government Job) भरणे अनिवार्य आहे.
5. एकदा पाठवलेले अर्ज शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
6. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIA Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी NIA मध्ये 1.12 लाख पगाराची नोकरी; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

NIA Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये नोकरी (NIA Recruitment 2024) मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2024 आहे.

संस्था – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी
भरले जाणारे पद – असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (NIA Recruitment 2024)
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे पाठवायचा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार
वय मर्यादा – उमेदवाराचे (NIA Recruitment 2024) वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मिळणारे वेतन –
1. सहाय्यक – पे मॅट्रिक्समधील स्तर 06 अंतर्गत, RS. 35,400 आणि 1,12,400 रुपये दरमहा
2. स्टेनोग्राफर ग्रेड I – लेव्हल 06 साठी – RS. 35, 400 ते 1,12,400 रुपये दरमहा
3. अप्पर डिव्हिजन क्लर्क- पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 04 अंतर्गत RS. 25,500 ते 81, 100 रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : मिस इंडिया फायनलिस्टने मॉडेलिंग सोडले; 10 महिन्याचा सेल्फ स्टडी अन् क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Aishwarya Sheoran

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली विद्यापीठातून पदवी (UPSC Success Story) घेतल्यानंतर ऐश्वर्याने 2018 मध्ये CAT ची परीक्षा देखील दिली आणि IIM इंदूरमध्येही तिची निवड झाली, परंतु तिने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नाही कारण तिचे संपूर्ण लक्ष होते नागरी सेवेच्या परीक्षेवर. आज आपण एका उमेदवाराबद्दल बोलणार आहोत जिने मॉडेलिंगची चमकती दुनिया सोडून UPSC नागरी सेवा परीक्षा दिली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात ती चक्क पास झाली आणि IAS अधिकारी बनली.

मॉडेलिंगमध्येही नाव कमावलं
ऐश्वर्या शेओरान (Aishwarya Sheoran IAS) ही राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिला मॉडेलिंगची विशेष आवड होती. तिने 2015 मध्ये ‘मिस दिल्ली’चा किताब जिंकला होता. याशिवाय ती एका वर्षातच म्हणजे 2016 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ची फायनलिस्ट स्पर्धक राहिली आहे. UPSC ची तयारी करण्यापूर्वी ऐश्वर्या मॉडेलिंग (UPSC Success Story) करत असे. तिची मॉडेलिंग कारकीर्द देखील चांगली चालली होती. या क्षेत्रात तिने दिल्लीत खूप नावलौकिक मिळवला. मॉडेलिंगमध्ये तिने अनेक अवॉर्ड मिळवले. असे असतानाही तिने मॉडेलिंग सोडून यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सन 2018 मध्ये तिने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा फॉर्म भरला आणि अभ्यास सुरू केला.

सेल्फ स्टडीच्या जोरावर फक्त 10 महिन्यात अभ्यास केला पूर्ण
विशेष म्हणजे UPSC चा अभ्यास करताना तिने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. अवघ्या 10 महिन्यात तिने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तिने घरी (UPSC Success Story) राहूनच अभ्यास केला. तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ती पास झाली. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तिने संपूर्ण भारतात 93 वा क्रमांक मिळवला आणि ती आयएएस (IAS) बनली.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार (UPSC Success Story)
ऐश्वर्याचे कुटुंब सुरुवातीपासून दिल्लीत राहत होते. ती अभ्यासात खूप हुशार होती. तिचे सुरुवातीचे शिक्षण संस्कृती स्कूल, चाणक्यपुरी, दिल्ली येथून झाले. बारावी बोर्डाच्या परीक्षेत 97.5 टक्के गुण मिळवून ती अव्वल ठरली होती. यानंतर तिने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ऐश्वर्याने 2018 साली CAT 2018 ची परीक्षा देखील दिली आणि IIM इंदूरमध्येही तिची निवड झाली, परंतु तिने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नाही कारण तिचे लक्ष्य IAS अधिकारी बनणे होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAFSU Recruitment 2024 : सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 64 पदाकरिता भरती; 1,82,400 पगार; कुठे कराल अर्ज?

MAFSU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान (MAFSU Recruitment 2024) विद्यापीठ, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदाच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कृषी/पशुवैद्यकीय विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (MAFSU Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 मार्च 2024 रोजी 38 वर्षापर्यंत
राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1500/- रुपये (MAFSU Recruitment 2024)
राखीव प्रवर्ग – 750/- रुपये शुल्क नाही
मिळणारे वेतन – 57,700/- रुपये ते 1,82,400/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Study Tips : परीक्षा जवळ आल्या….अभ्यासाचा ताण घेवू नका; फॉलो करा ‘या’ टिप्स

Study Tips (4)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर (Study Tips) आल्या आहेत. चांगले मार्क मिळवण्याच्या चढाओढीत विद्यार्थी अनेकदा ताण तणाव आणि कठीण वेळापत्रकांचा सामना करताना दिसतात. अभ्यासक्रम, परीक्षा आणि वैयक्तिक कामे यांचा समतोल राखणे आव्हानात्मक ठरू शकते. पण तुम्ही जर एक चांगली रणनीती अवलंबली तर हा प्रवास सोपा होवू शकतो. अभ्यासामुळे येणाऱ्या ताण ताण तणावाला सामोरे जाण्यासाठी प्रभावी ठरू शकतील अशा काही टिप्स आपण येथे पाहणार आहोत.

वेळचे व्यवस्थापन
वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे हे एक कौशल्य आहे; जे शिक्षणात यश मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. वेळेचे योग्य नियोजन केल्याने तुम्ही त्या वेळेशी बांधील राहता. अभ्यास, उजळणी आणि वैयक्तिक कामे याचे योग्य नियोजन करा. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणा. ठरलेल्या कामांना प्राधान्य द्यायला शिका, तुम्ही अभ्यास, इतर जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन निर्माण करू शकता.

विलंब करणे टाळा (Study Tips)
अभ्यासात विलंब केल्याने शैक्षणिक दबाव वाढू शकतो, ज्यामुळे कामात घाई आणि निकृष्ट दर्जाचे काम होऊ शकते. तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे विलंब होतो हे ओळखा आणि त्या गोष्टी करणे टाळा. ही सवय तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करू शकते.

छोट्या नोट्स तयार करा
अतिरिक्त ताण तणाव घेतला तर अभ्यास करणे (Study Tips) कधी कधी कठीण होवून बसते; ज्यामुळे तणाव जास्तच वाढतो. यासाठी तुम्ही मोठ्या असाइनमेंट्स किंवा अभ्यास सामग्रीचे छोट्या, आटोपशीर नोट्समध्ये रूपांतर करा. यामुळे तुमचा वर्कलोड कमी होण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Recruitment : आता 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही TET पात्रता होणार बंधनकारक

Teachers Recruitment (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार (Teachers Recruitment) करण्यासाठी केंद्र सरकार मोठे निर्णय घेत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा (TET) परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंबलबजवणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य होती. सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे; नंतर या निर्णयाला राज्य सरकार आपल्या व्यवस्थेत सामील करतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) अंतर्गत नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मुलांचे शिक्षण, नमुने तसेच शिक्षक होण्याच्या पात्रतेशी संबंधित हे बदल केले जात आहेत. आधी खाजगी किंवा सरकारी शाळेत आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टीईटी (TET) देणे आवश्यक होते. मात्र आता NEP अंतर्गत इयत्ता 9वी ते 12वीच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या टप्यात बारावीपर्यंत टीईटी हा नियम हरियाणा, केरळ, ओडिशा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. या राज्यांमध्ये STET (STET) म्हणजेच राज्य (Teachers Recruitment) शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 12 वी पर्यंत लागू करण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये बारावीपर्यंत टीईटीचा नियम लागू केला जाणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय स्तरावरील शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. CTET स्कोअर आयुष्यभर वैध आहे. सीटीईटीच्या धर्तीवर आता टीईटी आयुष्यभर वैध करण्याची (Teachers Recruitment) योजना आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये, TET परीक्षेचा एक पेपर अजूनही इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहे आणि दुसरा पेपर 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतला जातो. मात्र, आता तो इयत्ता नववी ते बारावीसाठी बंधनकारक केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? पहा महत्वाचे प्रश्न

GK Updates 16 Feb

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1 – जगातील कोणता देश ‘लँड ऑफ थंडरबोल्ट’ म्हणून ओळखला जातो?
उत्तर – भारताचा शेजारील देश भूतान हा थंडरबोल्टची भूमी म्हणून ओळखला जातो.
2. महात्मा गांधींनी साबरमती (GK Updates) आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
उत्तर – महात्मा गांधींनी 1916 मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली.

3 – भारतातील पहिला ब्रिटीश (GK Updates) कारखाना स्थापन करण्याचा आदेश कोणत्या मुघल सम्राटाने दिला होता?
उत्तर – मुघल सम्राट जहांगीरने भारतात पहिला ब्रिटिश कारखाना स्थापन करण्याचा आदेश दिला होता.
4 – भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे?
उत्तर –भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद जपानकडून घेतली आहे.

5 – मधुशाला या कवितेचा लेखक कोण आहे हे?
उत्तर – वास्तविक मधुशाला या कवितेचे लेखक हरिवंशराय बच्चन आहेत.
6 – जगातील एकमेव असा देश कोणता आहे ज्याचा ध्वज आयतकृती आकारात नाही?
उत्तर – (GK Updates) नेपाळ हा जगातील एकमेव देश आहे ज्याचा ध्वज आयतकृती आकारात नाही.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : मध्य रेल्वेने जाहिर केली लिपीक, शिपाई, हेल्परसह अनेक पदांवर भरती; 622 पदे रिक्त; जाणून घ्या पात्रता

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी निर्माण (Railway Recruitment 2024) झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 622 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आंतरविभागीय उमेदवारांकडून आणि भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

विभाग – मध्य रेल्वे, सोलापूर
भरली जाणारी पदे – SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई
पद संख्या – 622 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर , महाराष्ट्र
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
SSE06 पदे
JE25 पदे
Sr. Tech.31 पदे
Tech-I327 पदे
Tech-II21 पदे
Tech-III45 पदे
हेल्पर125 पदे
Ch.OS01 पद
OS20 पदे
वरिष्ठ लिपिक07 पदे
कनिष्ठ लिपिक07 पदे
शिपाई07 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Railway Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com