GK Updates : भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? पहा महत्वाचे प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1 – जगातील कोणता देश ‘लँड ऑफ थंडरबोल्ट’ म्हणून ओळखला जातो?
उत्तर – भारताचा शेजारील देश भूतान हा थंडरबोल्टची भूमी म्हणून ओळखला जातो.
2. महात्मा गांधींनी साबरमती (GK Updates) आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
उत्तर – महात्मा गांधींनी 1916 मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली.

3 – भारतातील पहिला ब्रिटीश (GK Updates) कारखाना स्थापन करण्याचा आदेश कोणत्या मुघल सम्राटाने दिला होता?
उत्तर – मुघल सम्राट जहांगीरने भारतात पहिला ब्रिटिश कारखाना स्थापन करण्याचा आदेश दिला होता.
4 – भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे?
उत्तर –भारतीय राज्यघटनेतील कलमाची तरतूद जपानकडून घेतली आहे.

5 – मधुशाला या कवितेचा लेखक कोण आहे हे?
उत्तर – वास्तविक मधुशाला या कवितेचे लेखक हरिवंशराय बच्चन आहेत.
6 – जगातील एकमेव असा देश कोणता आहे ज्याचा ध्वज आयतकृती आकारात नाही?
उत्तर – (GK Updates) नेपाळ हा जगातील एकमेव देश आहे ज्याचा ध्वज आयतकृती आकारात नाही.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com