Study Tips : परीक्षा जवळ आल्या….अभ्यासाचा ताण घेवू नका; फॉलो करा ‘या’ टिप्स

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर (Study Tips) आल्या आहेत. चांगले मार्क मिळवण्याच्या चढाओढीत विद्यार्थी अनेकदा ताण तणाव आणि कठीण वेळापत्रकांचा सामना करताना दिसतात. अभ्यासक्रम, परीक्षा आणि वैयक्तिक कामे यांचा समतोल राखणे आव्हानात्मक ठरू शकते. पण तुम्ही जर एक चांगली रणनीती अवलंबली तर हा प्रवास सोपा होवू शकतो. अभ्यासामुळे येणाऱ्या ताण ताण तणावाला सामोरे जाण्यासाठी प्रभावी ठरू शकतील अशा काही टिप्स आपण येथे पाहणार आहोत.

वेळचे व्यवस्थापन
वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे हे एक कौशल्य आहे; जे शिक्षणात यश मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. वेळेचे योग्य नियोजन केल्याने तुम्ही त्या वेळेशी बांधील राहता. अभ्यास, उजळणी आणि वैयक्तिक कामे याचे योग्य नियोजन करा. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणा. ठरलेल्या कामांना प्राधान्य द्यायला शिका, तुम्ही अभ्यास, इतर जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन निर्माण करू शकता.

विलंब करणे टाळा (Study Tips)
अभ्यासात विलंब केल्याने शैक्षणिक दबाव वाढू शकतो, ज्यामुळे कामात घाई आणि निकृष्ट दर्जाचे काम होऊ शकते. तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे विलंब होतो हे ओळखा आणि त्या गोष्टी करणे टाळा. ही सवय तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करू शकते.

छोट्या नोट्स तयार करा
अतिरिक्त ताण तणाव घेतला तर अभ्यास करणे (Study Tips) कधी कधी कठीण होवून बसते; ज्यामुळे तणाव जास्तच वाढतो. यासाठी तुम्ही मोठ्या असाइनमेंट्स किंवा अभ्यास सामग्रीचे छोट्या, आटोपशीर नोट्समध्ये रूपांतर करा. यामुळे तुमचा वर्कलोड कमी होण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com