UPSC Success Story : मिस इंडिया फायनलिस्टने मॉडेलिंग सोडले; 10 महिन्याचा सेल्फ स्टडी अन् क्रॅक केली UPSC

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली विद्यापीठातून पदवी (UPSC Success Story) घेतल्यानंतर ऐश्वर्याने 2018 मध्ये CAT ची परीक्षा देखील दिली आणि IIM इंदूरमध्येही तिची निवड झाली, परंतु तिने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नाही कारण तिचे संपूर्ण लक्ष होते नागरी सेवेच्या परीक्षेवर. आज आपण एका उमेदवाराबद्दल बोलणार आहोत जिने मॉडेलिंगची चमकती दुनिया सोडून UPSC नागरी सेवा परीक्षा दिली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात ती चक्क पास झाली आणि IAS अधिकारी बनली.

मॉडेलिंगमध्येही नाव कमावलं
ऐश्वर्या शेओरान (Aishwarya Sheoran IAS) ही राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिला मॉडेलिंगची विशेष आवड होती. तिने 2015 मध्ये ‘मिस दिल्ली’चा किताब जिंकला होता. याशिवाय ती एका वर्षातच म्हणजे 2016 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ची फायनलिस्ट स्पर्धक राहिली आहे. UPSC ची तयारी करण्यापूर्वी ऐश्वर्या मॉडेलिंग (UPSC Success Story) करत असे. तिची मॉडेलिंग कारकीर्द देखील चांगली चालली होती. या क्षेत्रात तिने दिल्लीत खूप नावलौकिक मिळवला. मॉडेलिंगमध्ये तिने अनेक अवॉर्ड मिळवले. असे असतानाही तिने मॉडेलिंग सोडून यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सन 2018 मध्ये तिने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा फॉर्म भरला आणि अभ्यास सुरू केला.

सेल्फ स्टडीच्या जोरावर फक्त 10 महिन्यात अभ्यास केला पूर्ण
विशेष म्हणजे UPSC चा अभ्यास करताना तिने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. अवघ्या 10 महिन्यात तिने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तिने घरी (UPSC Success Story) राहूनच अभ्यास केला. तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ती पास झाली. UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तिने संपूर्ण भारतात 93 वा क्रमांक मिळवला आणि ती आयएएस (IAS) बनली.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार (UPSC Success Story)
ऐश्वर्याचे कुटुंब सुरुवातीपासून दिल्लीत राहत होते. ती अभ्यासात खूप हुशार होती. तिचे सुरुवातीचे शिक्षण संस्कृती स्कूल, चाणक्यपुरी, दिल्ली येथून झाले. बारावी बोर्डाच्या परीक्षेत 97.5 टक्के गुण मिळवून ती अव्वल ठरली होती. यानंतर तिने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ऐश्वर्याने 2018 साली CAT 2018 ची परीक्षा देखील दिली आणि IIM इंदूरमध्येही तिची निवड झाली, परंतु तिने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला नाही कारण तिचे लक्ष्य IAS अधिकारी बनणे होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com