Home Blog Page 149

AAI Recruitment 2024 : AAI अंतर्गत ‘ज्युनिअर एक्सिक्यूटीव्ह’ पदावर नोकरीची संधी; डिग्री धारक करु शकतात अर्ज

AAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2024) अंतर्गत सुमारे 490 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ कार्यकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India)
भरले जाणारे पद – कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 02 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2024

पद संख्या – 490 पदे
वय मर्यादा – 27 वर्षे (AAI Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree
मिळणारे वेतन – Rs.40, 000/‐ ते 1,40,000/- रुपये दरमहा

असा करा अर्ज – (AAI Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या (AAI Recruitment 2024) लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
5. अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2024 पासून सुरु होईल)
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : नाईट ड्यूटी… कॉलेज अन् जिवतोड मेहनत; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Rajkamal Yadav

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर एखाद्या आव्हानासमोर (UPSC Success Story) पाहाडासारखे उभे राहिला तर कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. याचा प्रत्यय येतो आयएएस ऑफिसर राज कमल यादव यांच्याकडे पाहिल्यानंतर. आज आम्ही तुम्हाला एका IAS अधिकाऱ्याची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी केवळ आपले भविष्य स्थिर केले नाही; तर आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट काम करून हजारो लोकांचे जीवनमान देखील उंचावले आहे. राजकमल यादव (Rajkamal Yadav IAS) यांनी UPSC परिक्षेत संपूर्ण भारतातून 21 व्या क्रमांकाने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांची कारकिर्द अनेकांसाठी जीवनदान ठरली आहे; पाहूया सविस्तर….

शालेय शिक्षण गावातूनच पूर्ण केले
राजकमल यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे झाला. त्यांनी गावातूनच इयत्ता 6 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील शिक्षणासाठी ते लखनौ सैनिकी शाळेत गेले. मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. राजकमल हे एक चांगले क्रिकेटपटू आहेत. याशिवाय बॉडी बिल्डिंगचा शौक पूर्ण करण्यासाठी ते जिममध्ये तासनतास घाम गाळतात.

पदवीचे शिक्षण घेताना केली UPSC ची तयारी
राजकमल हे 2013 बॅचचे IAS (IAS) अधिकारी आहेत. ग्रॅज्युएशनच्या काळातच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. कॉलेजमधून घरी आल्यानंतर लगेचच ते अभ्यासाला बसायचे. सुमारे 12 ते 15 महिने त्यांची UPSC ची तयारी सुरु होती.

असा आहे शैक्षणिक प्रवास (UPSC Success Story)
बारावीनंतर राजकमल एनडीएची (NDA) लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते, पण मुलाखतीत नापास झाले, यानंतर ते प्री-मेडिकल टेस्टमध्येही नापास झाले. ऑल इंडिया प्री-व्हेटर्नरी टेस्ट (एआयपीव्हीटी) मध्ये चांगली रँक आणि शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी मद्रास व्हेटर्नरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
राजकमल यादव (Rajkamal Yadav IAS) यांना सीडीएस (CDC) म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवेद्वारे सैन्यात भरती व्हायचे होते. पण अभ्यासादरम्यान त्यांना कळले, की पशुवैद्यकीयद्वारे देखील सैन्यात नोकरी मिळू शकते. या दोन्ही परीक्षांच्या तयारीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाने त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठात पाठवले.

नाईट ड्युटी करत केली UPSC ची तयारी
अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान त्यांना संशोधन आणि नोकरीच्या अनेक ऑफर मिळाल्या. पण देशाची सेवा करण्याचे स्वप्न त्यांना भारतात परत घेवून आले. त्यानंतर गुरुग्राममधील रुग्णालयात पशु वैद्यकीय डॉक्टर म्हणून ते नाईट ड्युटी करू लागले आणि दिवसा यूपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. दरम्यान, त्यांची आयसीआर ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) मध्ये निवड झाली. 2013 मध्ये, त्यांनी केवळ स्व-अभ्यासातून 21 वा क्रमांक मिळवून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि डॉक्टरमधून ते आयएएस (IAS) अधिकारी बनले.

कारकिर्दीत केला गावांचा कायापालट (UPSC Success Story)
2014 मध्ये आयएएस राजकमल यांची डीएम (DM) म्हणून नियुक्ती झाली. दक्षिण सिक्कीम जिल्ह्यात पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील काही गावांना नवसंजीवनी दिली होती. त्या (UPSC Success Story) काळात तेथील ग्रामस्थांना शाळा, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत होता. राजकमल यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या आणि गावाचा कायापालट केला.

‘दत्तक गाव’ उपक्रम यशस्वी केला
या IAS अधिकाऱ्याने सुमारे 7,500 लोकांना चांगले जीवन देण्यात मोठे योगदान दिले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘दत्तक गाव’ उपक्रमांतर्गत अविकसित गाव दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासाची जबाबदारी घेतली जाते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सुमारे 7,500 नागरिकांना चांगले जीवन मिळू शकले आहे.
माझ्या यशामध्ये पालकांचा मोठा वाटा
राजकमल त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना देतात. आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा केवळ आई वडिलांमुळे मिळाल्याचे ते सांगतात. राजकमल यांचे वडील किशोर यादव हे ग्रामीण बँकेत नोकरीस होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

New Education Policy : 10वी, 12वी बोर्डाची परीक्षा दोनवेळा देता येणार; ‘या’ शैक्षणिक वर्षापासून लागू होणार नवीन शासन निर्णय

New Education Policy (3)

करिअरनामा ऑनलाईन । ‘प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे.

या नव्या शैक्षणिक धोरणामुळे येत्या काळात बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे. या विद्यार्थ्यांना परिक्षेत गुणांची चांगली कमाई करण्यासाठी एक नव्हे तर (New Education Policy) दोन संधी मिळणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की, शैक्षणिक सत्र 2025-26 पासून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनवेळा 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेस बसण्याचा पर्याय मिळेल.

आता वर्षातून दोनवेळा देता येणार बोर्डाची परीक्षा (New Education Policy)
NEP 2020 अंतर्गत केंद्राच्या योजनेबद्दल बोलताना मंत्री प्रधान म्हणाले; “शैक्षणिक सत्र 2025-26 पासून, विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेस दोनवेळा बसण्याची संधी मिळणार आहे.” गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार (NCF) विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्यांना सर्वोत्तम गुण कायम ठेवण्याचा पर्यायही मिळेल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण कायम ठेवता येतील.

10 बॅगलेस दिवस
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दरवर्षी शाळांमध्ये 10 बॅगलेस दिवस (New Education Policy) सुरू करण्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि खेळ अशा उपक्रमांवर विशेष भर देण्याचा सल्ला दिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर; खोट्या आश्वासनांपासून असा करा बचाव

Shikshak Bharti 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती (Shikshak Bharti 2024) प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार 678 रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

सुमारे 5 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना संस्था किंवा जिल्हा परिषदेतील नियुक्ती संदर्भात संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित असून, त्यामध्ये (Shikshak Bharti 2024) कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल मंडळी या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचे निरीक्षण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नोंदवले आहे.

खोट्या आश्वासनांपासून सावधान!!
“मी तुम्हाला जवळच्या संस्थेत नोकरी देतो, अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी केली आहे.” संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. या सर्व (Shikshak Bharti 2024) बाबींना आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल; असे मांढरे म्हणाले. दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती किंवा संपर्कातील व्यक्ती यांच्यावर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येईल; असेही ते म्हणाले.

पोलिसात फिर्याद द्या (Shikshak Bharti 2024)
संगणकीय पद्धतीने होणाऱ्या भरतीत कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. असे असतानाही दलाल अथवा अन्य मंडळी काही कृत्य करीत असतील, तर त्याचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे. कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याकडे तातडीने फिर्याद द्यावी; अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2024 : इंडियन नेव्हीमध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स’ पदाच्या 254 जागांवर भरती सुरु

Indian Navy Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी आनंदाची (Indian Navy Recruitment 2024) बातमी आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स पदांच्या एकूण 254 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

संस्था – भारतीय नौदल अकादमी
भरले जाणारे पद – शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स
पद संख्या – 254 पदे (Indian Navy Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech in any discipline
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Navy Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

OIL India Recruitment 2024 : OIL इंडियामध्ये इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी; तब्बल 2,20,000 एवढा पगार

OIL India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त (OIL India Recruitment 2024) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

संस्था – ऑईल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अधीक्षक अभियंता
पद संख्या – 15 पदे (OIL India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024

वय मर्यादा –
1. UR/EWS: 32/34
2. OBC (NCL): 35/37
3. SC/ST: 37/39
अर्ज फी –
General/ OBC (NCL) – 500 + Applicable taxes
SC/ST/PwBD/EWS/Ex-Servicemen – Nil

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अधीक्षक अभियंताGraduate degree in Engineering of minimum 04 years duration with minimum 65% marks in (OIL India Recruitment 2024)
Engineering. ORPost Graduate degree in Petroleum Engineering/ Technology of minimum 02 years duration with minimum 60 % marks and having Engineering at graduation level.

मिळणारे वेतन – 80,000/- ते 2,20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (OIL India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : आरामदायी नोकरी सोडून UPSC क्रॅक केली; 2 वेळा फेल होवूनही अशी बनली टॉपर

IAS Success Story of IAS Vishakaha Yadav

करिअरनामा ऑनलाईन । दिल्लीच्या द्वारका येथे जन्मलेली विशाखा… अभ्यासात (IAS Success Story) पहिल्यापासूनच हुशार… तिने अभ्यासात घेतलेल्या आघाडीमुळे तिला दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मध्ये प्रवेश मिळाला. जिथे तिने 2014 मध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. तिच्या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम सुरू केले. आरामदायी आणि मोठ्या पगरची नोकरी तिला मिळाली होती; पण तिचे ध्येय तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिला वेगळेच क्षेत्र खुणावत होते. त्यामुळे तिने ही सुरक्षित नोकरी सोडून आयएएस (IAS) अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. समोर आलेल्या अडथळ्यांवर मात करत विशाखाने अखेर स्वप्न पूर्ण केलेच. जाणून घेवूया…

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
विशाखा यादवची (IAS Vishakha Yadav) कहाणी म्हणजे एक अखंड समर्पणाचा पुरावा आहे. एक सुरक्षित, बड्या पगाराची नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. विशाखाला खऱ्या अर्थाने कुटुंबाने भक्कम पाठिंबा दिला. तिचे वडील राजकुमार यादव आणि आई सरिता यादव दोघे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ती हा खडतर प्रवास पार करु शकली; असं विशाखा मानते.

सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी
1994 साली नवी दिल्लीच्या द्वारका येथे विशाखाचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आणि तिथून तिने 2014 मध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. तिच्या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी मिळवली.

आयुष्यात हा ठरला टर्निंग पॉइंट
बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून विशाखा काम करत होती. मात्र 2017 मध्ये विशाखाने तिची आरामदायी नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. UPSC ची परीक्षा पास करायचीच असा चंग तिने बांधला. तिने कठोर अभ्यासासाठी (IAS Success Story) स्वतःलाच वचनबद्ध केले. सोशल मीडियासारख्या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले आणि पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. यासाठी ती लायब्ररीमध्ये बरेच तास अभ्यासात घालवत असे. मनाला विरंगुळा देण्यासाठी ती सुडोकू कोडी सोडवत असे.

अडथळ्यांवर मात करुन देशात ठरली टॉपर
विशाखाच्या (IAS Vishakha Yadav) मार्गात अनेक आव्हाने येत होती. संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिला 2 वेळा अपयश आले. पण तिने धीर धरला. आधी झालेल्या चुका सुधारून तिने पुन्हा परीक्षा दिली. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. यावेळी तिने कमाल केली. ती फक्त परीक्षा पास झाली नाही; तर यावेळी ती संपूर्ण भारतातून 6 वा क्रमांक (AIR 6) मिळवत टॉपर ठरली. कठोर परिश्रम, समर्पण आणि अथक प्रयत्नाने कोणतेही ध्येय साध्य केले जाऊ शकते; हे विशाखाकडून शिकायला मिळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

New Education Policy : 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे विषय वाढले; आता ‘एवढे’ विषय शिकावे लागणार

New Education Policy (2)

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (New Education Policy) महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार असून आता जास्त विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत. त्यानुसार दहावीला 10 विषयांचा तर बारावीला 6 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. याविषयी सीबीएसईने (CBSE) शाळांना सूचना देण्यास सांगितले आहे. शाळांकडून सूचना आल्यानंतर हे बदल होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (New Education Policy) अनुसरून हे बदल होणार आहेत; अशी माहिती आहे.

भारतीय भाषांची सक्ती
नवीन शैक्षणिक धोरणानुसार 10 वी, 12 वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

5 ऐवजी 10 विषय शिकावे लागणार (New Education Policy)
10 वीमध्ये 2 ऐवजी 3 भाषांची सक्ती असणार आहे. यामधील दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच 11 वी-12वीत एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भारतीय भाषा (Indian language) असणार आहे. तसेच नववी-दहावीत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या वाढवली आहे. विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषय शिकावे लागणार आहेत. यामध्ये 3 भाषा तर 7 मुख्य विषय असणार आहेत. या विषयांमध्ये गणित, संगणक शास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे.

दहावी प्रमाणे अकरावी-बारावीच्या (New Education Policy) स्तरावर बदल केला आहे. आता बारावीत दोन भाषा आणि चार मुख्य विषय असणार आहेत. बारावीत सर्व विषयांची चार गटात विभागणी होणार आहे. त्यात भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय असे चार गट असणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण किती झाले? परीक्षा किंवा मुलाखतीत विचारले जातात असे प्रश्न

GK Updates 19 Feb.

करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रमुख (GK Updates) राजकारणी आणि साम्राज्याचे संस्थापक होते. ते देशाच्या महान शासक आणि योद्ध्यांपैकी एक आहेत, जे तरुणांना प्रत्येक आव्हानांशी लढण्यासाठी प्रेरित करतात. ते मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते. लहानपणापासूनच त्यांनी अनेक कठीण आव्हानांना तोंड दिले. धर्माच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या महान योद्ध्याची आज जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…

  1. शिवाजी महाराजांची (Shivaji maharaj) जयंती कधी असते?
    उत्तर : 19 फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जयंती दिवस आहे.
  2. जगात शिवाजी महाराजांची किती स्मारके आहेत?
    उत्तर : ही संख्या लाखोंच्या घरात असावी. याविषयी कोणताही विशिष्ट आणि विश्वासार्ह क्रमांक उपलब्ध नाही.
  3. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या किती?
    उत्तर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 360 किल्ले जिंकले आहेत.
  4. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते?
    उत्तर : (GK Updates) श्री. छ. सईबाई
  5. स्वराज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते?
    उत्तर : छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
  6. शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?
    उत्तर : शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या. त्यांची अनुक्रमे नवे सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई अशी आहेत.
  7. शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती?
    उत्तर : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजारामराजे
  8. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला?
    उत्तर : वाराणसीचे ब्राह्मण गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
  9. शिवाजी महाराजांशी संबंधित माहितीसाठी कोणती प्रसिद्ध पुस्तके उपलब्ध आहेत?
    उत्तर : श्रीमान योगी, शिवचरित्र, सभासद बखर, शिवाजी द ग्रेट मराठा, द लाईफ ऑफ शिवाजी महाराज, चाईलेन्जिंग डेस्टिनी अ बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी, अ हिस्ट्री ऑफ मराठा, शककर्ते शिवराय खंड 1, 2, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा इत्यादि………
  10. राजे छत्रपती शिवाजी यांचा मृत्यू कधी झाला?
    उत्तर : 3 एप्रिल 1680 (GK Updates)
  11. शिवाजी महाराजांचे शिक्षण (Education) किती झाले?
    उत्तर : शिवाजी राजे यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले. आई जिजाबाईंनी त्यांना महाभारत, रामायण आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान दिले. बालपणी राजकारण आणि युद्धनीतीचे शिक्षण घेतलेल्या शिवाजींनी आपले बालपण देशातील महापुरुषांच्या कथा ऐकण्यात आणि संतांच्या सत्संगात घालवले. धार्मिक, राजकीय, युद्ध इत्यादी सर्व कलांमध्ये ते निपुण होते.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : सरकारी नोकर भरतीची यादी; हा आहे अर्ज करण्याचा आठवडा; पहा संपूर्ण माहिती

Government Jobs (56)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी हा देशातील सर्वात (Government Jobs) आरामदायक आणि सुरक्षित नोकरीचा पर्याय मानला जातो. सरकारी नोकरीचे आकर्षण सर्वांनाच असते. या नोकरीच्या बाजारपेठेत आपण आपली कौशल्ये आणि पात्रता यांच्याशी जुळणारी सरकारी नोकरी शोधत असतो. तुमची ही शोध मोहीम सोपी व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला सरकारी भरतीच्या जाहिराती विषयी एकात्रीत माहिती देत आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही विविध सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकता.

SECL Recruitment 2024 : 1,425 पदे
South Eastern Coalfields Limited अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतींतही पात्र उमेदवार https://www.secl-cil.in/index.php या वेबसाईट वरुन अधिक माहिती घेवून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. SECL संस्थेतील एकूण 1,425 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे. यामाध्यमातून 1,075 तंत्रज्ञ शिकाऊ पदांसह 350 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत.

UP Higher Judicial Services : 83 पदे (Government Jobs)
15 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट allahadahighcourt.in द्वारे उमेदवार उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवासाठी अर्ज करू शकतात. या माध्यमातून वकिलांची 83 पदे भरली जाणार आहेत.

Indian Coast Guard Recruitment 2024 : 260 खलाशी पदे
भारतीय तटरक्षक दलाने 13 फेब्रुवारी रोजी नाविक (जनरल ड्युटी) या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार 27 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाईट cgept.cdac.in वरुन तुम्ही माहिती घेवू शकता. यामाध्यमातून सेलर जनरल ड्युटीसाठी 260 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिसूचनेनुसार, उत्तरेत 79, पश्चिमेत 66, ईशान्य भागात 68, पूर्वेत 33, उत्तर पश्चिममध्ये 12 आणि अंदमान आणि निकोबारमध्ये फक्त 3 पदे भरली जाणार आहेत.

TN TRB Teacher Recruitment 2024 : 1,768 माध्यमिक श्रेणी शिक्षक पदे
तामिळनाडू शिक्षक भरती मंडळ (TN TRB) सध्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट trb.tn.gov.in द्वारे माध्यमिक श्रेणी शिक्षकांसाठी अर्ज स्वीकारत आहे. या भरती मोहिमेद्वारे, मंडळाचे (Government Jobs) राज्यभरात एकूण 1,768 माध्यमिक शिक्षक पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2024 आहे आणि भरती परीक्षा यावर्षी 24 जून रोजी होणार आहे.

IDBI Recruitment 2024 : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकांची 500 पदे
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 2024 मध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) च्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार idbibank.in या अधिकृत वेबसाईट वरुन अधिक माहिती घेवून दि. 26 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून 500 कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com