GK Updates : छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण किती झाले? परीक्षा किंवा मुलाखतीत विचारले जातात असे प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रमुख (GK Updates) राजकारणी आणि साम्राज्याचे संस्थापक होते. ते देशाच्या महान शासक आणि योद्ध्यांपैकी एक आहेत, जे तरुणांना प्रत्येक आव्हानांशी लढण्यासाठी प्रेरित करतात. ते मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते. लहानपणापासूनच त्यांनी अनेक कठीण आव्हानांना तोंड दिले. धर्माच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या महान योद्ध्याची आज जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी…

  1. शिवाजी महाराजांची (Shivaji maharaj) जयंती कधी असते?
    उत्तर : 19 फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जयंती दिवस आहे.
  2. जगात शिवाजी महाराजांची किती स्मारके आहेत?
    उत्तर : ही संख्या लाखोंच्या घरात असावी. याविषयी कोणताही विशिष्ट आणि विश्वासार्ह क्रमांक उपलब्ध नाही.
  3. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या किती?
    उत्तर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 360 किल्ले जिंकले आहेत.
  4. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते?
    उत्तर : (GK Updates) श्री. छ. सईबाई
  5. स्वराज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते?
    उत्तर : छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
  6. शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?
    उत्तर : शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या. त्यांची अनुक्रमे नवे सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई अशी आहेत.
  7. शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे काय होती?
    उत्तर : धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजारामराजे
  8. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला?
    उत्तर : वाराणसीचे ब्राह्मण गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
  9. शिवाजी महाराजांशी संबंधित माहितीसाठी कोणती प्रसिद्ध पुस्तके उपलब्ध आहेत?
    उत्तर : श्रीमान योगी, शिवचरित्र, सभासद बखर, शिवाजी द ग्रेट मराठा, द लाईफ ऑफ शिवाजी महाराज, चाईलेन्जिंग डेस्टिनी अ बायोग्राफी ऑफ छत्रपती शिवाजी, अ हिस्ट्री ऑफ मराठा, शककर्ते शिवराय खंड 1, 2, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा इत्यादि………
  10. राजे छत्रपती शिवाजी यांचा मृत्यू कधी झाला?
    उत्तर : 3 एप्रिल 1680 (GK Updates)
  11. शिवाजी महाराजांचे शिक्षण (Education) किती झाले?
    उत्तर : शिवाजी राजे यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले. आई जिजाबाईंनी त्यांना महाभारत, रामायण आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान दिले. बालपणी राजकारण आणि युद्धनीतीचे शिक्षण घेतलेल्या शिवाजींनी आपले बालपण देशातील महापुरुषांच्या कथा ऐकण्यात आणि संतांच्या सत्संगात घालवले. धार्मिक, राजकीय, युद्ध इत्यादी सर्व कलांमध्ये ते निपुण होते.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com