How to Become RBI Governor : कसं व्हायचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर? काय असते पात्रता? गलेलठ्ठ पगारासह मिळतात इतरही सुविधा

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे (How to Become RBI Governor) देशातील सर्वोच्च पदांपैकी एक पद आहे. या पदाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. RBI गव्हर्नर कसे व्हायचे हे तुम्हाला माहित आहे का? तसेच या पदापर्यंत पोहचण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? या सर्वोच्च पदापर्यंत पोहचणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळतो? आज आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत…

देशातील सर्वोच्च पदापैकी एक पद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India ) गव्हर्नर होणे ही एक उच्च-प्रोफाइल नोकरी आहे. पूर्वी हे पद पदोन्नतीसह IAS (IAS) अधिकाऱ्यांना दिले जात होते, परंतु आता कोणताही पदवीधर, पदव्युत्तर तसेच चार्टर्ड अकाउंटंटची पदवी (How to Become RBI Governor) असणारा आणि कामाचा दीर्घ अनुभव असणारा उमेदवार RBI चा गव्हर्नर बनू शकतो. या पदावर पात्र होण्यासाठी अर्थशास्त्रातील पदवी असणे हा एक अतिरिक्त फायदा आहे.

RBI गव्हर्नर होण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक
1. RBI गव्हर्नर होण्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
2. या पदावर नियुक्तीसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 40 ते 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
3. या व्यक्तीला बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कामाचा किमान 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4. ती व्यक्ती एखाद्या नामांकित बँकिंग, आर्थिक किंवा शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत असावी.
5. ती व्यक्ती देशातील कोणत्याही (How to Become RBI Governor) राजकीय पक्षाशी संबंधित नसावी.
6. टीअ व्यक्तीकडे जागतिक बँक किंवा IMF मध्ये काम करण्याचा अनुभव असावा.
7. या व्यक्तीने अर्थ मंत्रालयात काम केले असावे.
8. संबंधित व्यक्ती बँकेचे अध्यक्ष किंवा महाव्यवस्थापक असणे आवश्यक आहे.

RBI गव्हर्नर पदावर अशी होते नियुक्ती (How to Become RBI Governor)
RBI गव्हर्नरची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे (ACC) केली जाते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. कॅबिनेटची नियुक्ती समिती या पदासाठी विहित केलेल्या पात्रता आणि कामाच्या अनुभवाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीची RBI गव्हर्नर पदावर नियुक्ती करते.

RBI गव्हर्नरला किती पगार मिळतो?
आरबीआय गव्हर्नरच्या (Governor) स्वाक्षरीनंतरच नोटांची छपाई होते. त्यांचे मुख्य कार्य आर्थिक धोरण तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि देखरेख करणे हे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावर (How to Become RBI Governor) असलेल्या व्यक्तीला भारत सरकार दरमहा अडीच लाख रुपये पगार देते. याशिवाय त्यांना अनेक प्रकारच्या जीवनावश्यक सुविधाही दिल्या जातात.

तगड्या पगारासोबत मिळतात ‘या’ सुविधा
RBI चे मुख्यालय देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे आहे. येथे पगाराव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला एक मोठे अधिकृत निवासस्थान, कार आणि ड्रायव्हरसह इतर सुविधा देखील दिल्या जातात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com