Railway Recruitment 2024 : रेल्वे सहायक लोको पायलट भरतीच्या 5696 जागांसाठी वयाची मर्यादा वाढवली

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे विभागांत सहायक (Railway Recruitment 2024) लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे; याबाबत महत्वाची अपडेट आह. या भरती प्रक्रियेत वयाची अट तीन वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5696 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोना काळात दोन वर्षे परीक्षा घेता आल्या नाहीत. परिणामी अनेक उमेदवारांची वयाची मर्यादा उलटून गेल्याने त्यांना भरती आणि नोकरीपासून वंचित रहावे लागले. याचा विचार करुन रेल्वेने सहायक लोको पायलट (Loco Pilot) पदासाठीच्या वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत दिली आहे. सहाय्यक लोको पायलट नियुक्तीसाठीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी रीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर केले आहे.

प्रवर्गनिहाय वयाची सवलत –
1. सर्वसाधारण – ३० ऐवजी ३३
2. ओबीसी – ३३ ऐवजी ३६
3. एससी, एसटीचे – ३५ ऐवजी ३८ वयाचे उमेदवार अर्ज करू शकतील. त्यासाठी सर्वसाधारण व इडब्ल्यूएसच्या उमेदवारांची जन्म तारीख २ जुलै १९९१ ते १ जुलै २००६, ओबीसींचे २ जुलै १९८८ ते १ जुलै २००६, एससी, एसटी उमेदवारांचे २ जुलै १९८६ ते १ जुलै २००६ दरम्यान असायला हवे.

भरती विषयी – (Railway Recruitment 2024)
या भरतीसाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण अथवा आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. उमेदवार १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतील. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० तर राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये शुल्क आहे.

अशी होणार परीक्षा –
– रेल्वे बोर्डाकडून ७५ गुणांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. त्यासाठी ६० मिनिटांत ७५ प्रश्न सोडवावे लागतील.
– यानंतर चाळणी आणि कागदपत्रांची (Railway Recruitment 2024) पडताळणी केली जाईल.
– त्यानंतर सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आदींवर चाचणी होईल. यासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com