Home Blog Page 152

CET Nursing Exam 2024 : नर्सिंग CETच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CET Nursing Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू (CET Nursing Exam 2024) इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्‍यभरातील नर्सिंग महाविद्यालयात बी.एस्सी नर्सिंग (B. Sc. Nursing) या पदवी अभ्यासक्रमास सीईटी (CET) परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सीईटी परीक्षेला प्रविष्ट होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज (CET Nursing Exam 2024)
नर्सिंग प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दि. २९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. CET सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. टप्‍याटप्‍याने अर्ज प्रक्रिया पार पडत आहे. गेल्‍या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासदेखील राज्‍यस्‍तरावरील सीईटी परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जात असतात. तसेच विविध शिक्षणक्रमांच्‍या नोंदणी (CET Nursing Exam 2024) प्रक्रिया अंतिम टप्यात आल्या आहेत. नर्सिंग अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षा नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली असून, सध्याच्‍या वेळापत्रकानुसार २९ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतील. ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठी १ मार्चपर्यंत मुदत असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Overseas Bank Recruitment 2024 : इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधारकांसाठी नोकरीची संधी

Indian Overseas Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ओव्हरसीज बँकेत (Indian Overseas Bank Recruitment 2024) कार्यालयीन सहाय्यक पदावर भरतीची जाहिरात निघाली आहे. संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – इंडियन ओव्हरसीज बँक
भरले जाणारे पद – कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 1 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Overseas Bank Recruitment 2024)
1. उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याच्याकडे संगणकाचे ज्ञान असावे.
2. फक्त करूर जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत
3. बेसिक अकाऊंटिंगचे ज्ञान ही प्राधान्याची पात्रता आहे
4. उमेदवार बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित स्थानिक भाषेत अस्खलित असावा.
5. इंग्रजी/हिंदीमध्ये भाषेचा ओघ ही एक अतिरिक्त पात्रता असेल
6. स्थानिक भाषेत टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे, इंग्रजीमध्ये टायपिंग कौशल्य हा एक अतिरिक्त फायदा आहे
7. MS ऑफिस (MS-Word, MS-Excel आणि MS-Power point), टॅली आणि इंटरनेट मध्ये प्रवीण असावे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्षे असावे.

परीक्षा फी – फी नाही (Indian Overseas Bank Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 12,000/- रुपये दरमहा[निश्चित प्रवास भत्ता [FTA] – रु.1000/- प्रति महिना]
नोकरी करण्याचे ठिकाण – करूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन ओव्हरसीज बँक प्रादेशिक कार्यालय १२/१, ए.पी.टी. रोड, पार्क रोड-साठी रोड जं इरोड-638 003.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.iob.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CISF Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मेगाभरती!! CISF अंतर्गत भरली जाणार 836 पदे

CISF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत नोकरीची (CISF Recruitment 2024) उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी पदाच्या तब्बल 836 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
भरले जाणारे पद – सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी
पद संख्या – 836 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20फेब्रुवारी 2024
आरक्षण तपशील – (CISF Recruitment 2024)
अनारक्षित प्रवर्गासाठी – ६४९ पदे
अनुसूचित जातीसाठी – 125 पदे
अनुसूचित जमातीसाठी – 62 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
– उमेदवाराचे वय 01.08.2023 रोजी 35 वर्षे, म्हणजे, त्यांचा जन्म 02.08.1988 पूर्वी झालेला नसावा.
– अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत शिथिलता.
– OBC उमेदवारांसाठी वयाची कोणतीही सूट लागू नाही.
अशी होणार निवड –
वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षा, शारीरिक प्रतिनिधित्व आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे CISF मध्ये उमेदवारांची निवड केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ITI पास उमेदवारांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरीत ‘या’ पदावर भरती; 161 पदे रिक्त

Government Job (49)

करिअरनामा ऑनलाईन । जबलपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत रिक्त (Government Job) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकाळ-आधारित DBW पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, जबलपूर
भरले जाणारे पद – कार्यकाळ-आधारित DBW
पद संख्या – 161 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Job)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur, Madhya Pradesh, Pin -482005

आवश्यक शैक्षणिक पात्रता – ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी अप्रेंटिस आणि सरकारकडून संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेतील ACCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांना संधी मिळेल.
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 19,900/- रुपये + DA
अशी होणार निवड – (Government Job)
उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या क्रमाने NCTVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाईल. NCTVT मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे ऑर्डनन्स फॅक्टरी खमारियाद्वारे ट्रेड टेस्टसाठी उमेदवारांना बोलावण्याची कट ऑफ टक्केवारी निश्चित केली जाईल.
नोकरी करण्याचे ठिकाण – खमरिया, जबलपूर

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प; ताण तणावावर मात करत बनली IFS; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Gitika Tamta

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडमधील गीतिका… तिचा IFS अधिकारी (UPSC Success Story) होण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे. आता ती अभिमानाने तिचा संघर्ष UPSC परीक्षार्थींसमोर व्यक्त करते. यामुळे इतर उमेदवारांना प्रेरणा मिळेल आणि ते सुध्दा न थांबता आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. जाणून घेवूया गीतिकाविषयी….

कठीण होता UPSC चा प्रवास
आजारपण, कौटुंबिक समस्या, पालकांची बदली आणि समाजाच्या दबावाला सामोरे जात स्वत:चा मार्ग ठरवणाऱ्या मुलीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. गीतिका तामता असं हिचं नांव. तिच्याससाठी UPSC पास होण्याचा प्रवास खूप कठीण होता. पण ती खचली नाही, थांबली नाही.. प्रत्येक अडचणीवर मात करत ती आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली. उत्तराखंडमधील 2022 बॅचच्या IFS गीतिकाची कहाणी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे.

नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प (UPSC Success Story)
गीतिका (IFS Geetika Tamta) ही उत्तराखंडच्या नैनितालची रहिवासी आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प करत असतो. असाच संकल्प गीतिकाने केला. 2021 च्या नवीन वर्षाच्या सुरवातीला तिने गांभीर्याने अभ्यास करण्याचा संकल्प केला होता. तिने एकाग्रतेने अभ्यास सुरू केला पण ती इन्स्टाग्रामवर जास्त सक्रिय असल्यामुळे तिचे अभ्यासापासून लक्ष विचलित झाले. यानंतर तिने पंधराच दिवसात तीची सर्व सोशल मीडिया खाती निष्क्रिय केली.

कुटुंबापासून स्वतःला वेगळे ठेवले
गीतिकाने तिच्या अभ्यासाचे तास वाढवले ​​होते पण तरीही तिच्या समोर एक समस्या उभी होती. सण-उत्सव, कुटुंब, मित्रमंडळींची मेळावे यामुळे तिला त्रास होत होता. तिने सर्वांपासून स्वतःला वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. एप्रिल 2021 मध्ये तिने एका बोर्डवर अभ्यासाचे वेळापत्रक बनवले.

अचानक परीक्षा पुढे गेली
2021 मध्ये UPSC परीक्षा 27 जून रोजी होणार होती. गीतिकाचे (IFS Geetika Tamta) परीक्षा केंद्र दिल्लीत होते. अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळावे म्हणून एप्रिलमध्येच ती दिल्लीला गेली होती. त्यावेळी (UPSC Success Story) तिच्या घरात काही गोष्टी घडत होत्या ज्यामुळे ती भावनिक तणावात होती. दिल्लीत आल्यानंतर तिने शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामही सुरू केला. त्यानंतर दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली. कोविडच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच मे २०२१ मध्ये ती नैनितालला परतली.

अशी केली ताण तणावावर मात
परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यामुळे गीतिकानेही तिचे परीक्षा केंद्र दिल्लीऐवजी अल्मोडा येथे बदलले. हे केंद्र तिच्या घरापासून जवळ होते. ती तिच्या आईचे जॅकेट घालून परीक्षेला गेली होती. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढण्यास मदत व्हायची. 10 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व परीक्षा दिल्यानंतर, तिने 13 ऑक्टोबरपासून UPSC च्या मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. तिला जेव्हा तणाव जाणवत होता तेव्हा ती मेणबत्त्यांच्या सुगंधाने स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न करायची.

अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी
पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर गीतिकाने उत्तर लेखन सराव आणि वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये तिच्या पालकांची बदली झाली. तिचे कुटुंब डेहराडूनला (UPSC Success Story) स्थायिक झाले आणि ती दिल्लीला आली. दिल्लीच्या हिवाळ्यात ती आजारी पडली. मग डॉक्टरांनी तिला सतत प्रेरित केले. ती मुख्य परीक्षेत पास झाली. नंतर ती डेहराडूनला आली होती. यूपीएससी मुख्य परीक्षेतील यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ती कुटुंबासह हरिद्वारला गेली होती.

G20 शिखर परिषदेत सहभागी (UPSC Success Story)
UPSC मुलाखतीची तयारी करण्यासाठी तिने दिल्लीत राहून अनेक मॉक इंटरव्ह्यू दिले, ज्याचा तिला खूप फायदा झाला. अखेर UPSC चा निकाल 30 मे 2022 रोजी प्रसिद्ध झाला आणि ती संपूर्ण भारतातून 239 वी रँक मिळवत IFS अधिकारी बनली. मसुरी येथील एलबीएसएनएए येथे प्रशिक्षणादरम्यान ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली. नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेमध्ये ती सहभागी झाली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Drone Pilot : कसं व्हायचं ड्रोन पायलट; कुठे घ्याल प्रशिक्षण?

How to Become Drone Pilot

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी (How to Become Drone Pilot) जवळ येवून ठेपल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहिती करुन देत आहोत. तुम्ही इयत्ता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ड्रोन पायलट बनून या क्षेत्रात तुमचे नशीब आजमावू शकता. यासाठी तुम्हाला डीजीसीए (DGCA) मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला ड्रोन पायलट बनण्याचा परवाना मिळू शकेल.

तंत्रज्ञान क्षेत्रात ड्रोन उद्योग झपाट्याने विकसित झाला आहे आणि येत्या काही वर्षात तो वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे. काही वर्षापूर्वी ड्रोनचा वापर फारच मर्यादित होता, पण आता विवाह सोहळ्यांव्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्र, कृषी क्षेत्र, चित्रपट उद्योगात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. ड्रोनच्या माध्यमातून एकाच ठिकाणी बसून कमी वेळात जास्त काम आणि जास्त क्षेत्र कव्हर करता येते, आणि हे काम ड्रोन पायलट अगदी प्रभावीपणे पार पाडू शकतो.

असं बनू शकता ड्रोन पायलट (How to Become Drone Pilot)
जर तुमचेही ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही ते 10वी/12वी पूर्ण केल्या नंतर या क्षेत्रात काम सुरू करू शकता. ड्रोन पायलट होण्यासाठी सरकार प्रशिक्षणही देते.

प्रशिक्षण कुठे घ्याल?
ड्रोन पायलट होण्यासाठी तुम्हाला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणासाठी संस्थेने ठरवून दिलेली फी जमा करून प्रवेश घेता येईल. यानंतर तुम्हाला ड्रोन तंत्रज्ञान समजून घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर उमेदवाराला (How to Become Drone Pilot) वैद्यकीय चाचणीस हजर रहावे लागते. या टप्प्यातील यशस्वी उमेदवारांना DGCA द्वारे प्रमाणपत्रे प्रदान केली जातात. ड्रोन पायलट किंवा ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही सरकारी वेबसाइट digitalsky.dgca.gov.in ला भेट देऊ शकता. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवार या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात आणि चांगली कमाई करु शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Board Exam 2024 : 10 वी/12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; विद्यार्थ्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार

Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डी. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण मंडळातर्फे नुकतीच विभागातील सर्व जिल्हानिहाय मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी परीक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा, परीक्षेतील गैरप्रकार टाळावेत, परीक्षा केंद्र परिसरात मुलांना बसण्यासाठी मंडप उभारू नये, पिण्याचे पाणी, फॅन, लाइट अशा भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात, केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकार किंवा भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास बोर्डाच्या नियमानुसार त्या केंद्राचे संकेतांक गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी; तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना विभागीय मंडळाने केंद्रांना दिल्या आहेत.

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळाने (Board Exam 2024) केंद्रसंचालकांकडून हमीपत्र भरून घेतले आहे. यामध्ये असे म्हटले आहे, की प्रत्येक वर्गात केवळ २५ विद्यार्थी असतील. परीक्षा कक्षात योग्य असा प्रकाश, पंखे, लाइट अशी सुविधा असेल. पर्यवेक्षणासाठी मान्यताप्राप्त शाळेतील नियमित शिक्षक असेल. ओळखपत्रानुसारच कर्मचाऱ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाईल इतरांना प्रवेश दिला जाणार नाही.

CCTV च्या निगराणीत होणार तपासणी (Board Exam 2024)
परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याची आवश्यक ते पथक नियुक्त करून तपासणी करण्यात येईल. कोणताही परीक्षार्थी अवैध साहित्य अथवा कागद सोबत घेऊन परीक्षा दालनात प्रविष्ट होणार नाही. तपासणी सीसीटीव्हीच्या निगराणीत होईल. त्याचे फुटेज परीक्षा संपेपर्यंत जतन करण्यात येईल. परीक्षा कालावधीत ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा शिक्षक केंद्रावर आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यास ‘मी जबाबदार असेल’, असे पत्र केंद्रसंचालकांकडून बोर्डाने भरून घेतले आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार अथवा भौतिक सुविधांचा अभाव आढळून आल्यास बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करून संकेतांक गोठवण्यात येईल; अशा सूचना; विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिल्या आहेत.

10 वी, 12 वी ची विद्यार्थी संख्या अशी आहे –
इयत्ता 12 वी

1. प्रविष्ट विद्यार्थी – १,७९,०१४
2. एकूण महाविद्यालये – १,४०८
3. परीक्षा केंद्रे – ४४९(Board Exam 2024)
4. परीरक्षक केंद्रे – ५८
इयत्ता 10 वी
1. प्रविष्ट विद्यार्थी – १,८६,८१४
2. शाळांची संख्या – २,७३७
3. परीक्षा केंद्रे – ६३८
4. परीरक्षक केंद्रे – ६३
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : नाईट शिफ्टमध्ये नोकरी; दररोज 10 ते 12 तास अभ्यास; अ‍ॅक्टरचा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shrutanjay Narayanan

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की सिनेतारकांची मुले (UPSC Success Story) चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावतात. बहुसंख्य सिनेतारकांची मुले कोणत्या ना कोणत्या मार्गाने फिल्मी दुनियेशी जोडलेली असतात. खूप कमी स्टार किड्स या चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःची ओळख निर्माण करतात. आपण आज अशाच एका तरुणाविषयी जाणून घेणार आहोत. हा तरुण IAS अधिकारी बनला आहे. श्रुतंजय नारायणन असं त्याचं नांव. याचे वडील वडील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र फिल्मी दुनियेत स्थान निर्माण करण्याऐवजी त्याने स्वत:ची वेगळी वाट निर्माण केली आहे. सध्या तो तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पाहूया त्याच्या प्रवासाविषयी…

वडिलांना मिळाली मुलामुळे ओळख
प्रसिद्ध तमिळ अभिनेते चिन्नी जयंती यांचा मुलगा श्रुतंजय नारायणन IAS अधिकारी झाला आहे. आतापर्यंत मुलगा त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखला जात होता, आता वडिलांना मुलाच्या नावाने नवीन ओळख मिळाली आहे.

शाळा-कॉलेजमध्ये होती रंगभूमीची आवड (UPSC Success Story)
श्रुतंजय नारायणन (Shrutanjay Narayanan) शाळा-कॉलेजमधील मित्रांसोबत नाटक आणि इतर स्टेज शोमध्ये सहभागी होत असत. तो वडिलांनी भूमिका साकारलेले प्रत्येक नाटक पहायचा. त्याने आपल्या मित्रांनाही अभिनयातील बारकावे शिकवले पण श्रुतंजयला स्वतःला या क्षेत्रात करिअर करण्यामध्ये फार रस नव्हता. त्याच्यासाठी रंगभूमी म्हणजे रंगमंचावर स्वतःला व्यक्त करणे आणि नवीन मित्र बनवणे एवढ्यापुरती मर्यादित होती; कारण त्याला UPSC देवून IAS अधिकारी व्हायचं होतं.

दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
श्रुतंजय नारायणन हे 2015 च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. यूपीएससी (UPSC) परीक्षेचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. यामध्ये त्याने संपूर्ण भारतात 75 वी रॅंक मिळवली आहे. श्रुतंजय सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्याला त्याचे शिक्षक, कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे सहकार्य मिळाल्याचे तो सांगतो.

नोकरी करत केला अभ्यास
श्रुतंजय नारायणन एका स्टार्टअप कंपनीमध्ये नोकरी करत (UPSC Success Story) होता. तो नाईट शिफ्टमध्ये काम करायचा. नोकरी करत असताना त्याने अभ्यासासाठी वेळ काढून दररोज 4 ते 5 तास सेल्फ स्टडी केला. परीक्षेच्या काही आठवडे आधी, त्याने आपला अभ्यासाचा दिनक्रम बदलला. तो दररोज 10 ते 12 तास अभ्यास करु लागला. यासोबतच तो तब्येतीकडे लक्ष देत असे. उत्तम आहार आणि झोपेसोबतच योगा; असा त्याचा दिनक्रम होता.

विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला
UPSC मध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराची मुलाखत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. श्रुतंजय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण उमेदवारांना सांगतो की, या मुलाखतीत उमेदवाराला पॅनेल समोर उत्तर देताना 20 मिनिटांत आपला प्रभाव पाडावा लागतो. ही 20 मिनिटे महत्वाची ठरतात. श्रुतंजय याने या परिक्षेत समाजशास्त्र हा पर्यायी विषय ठेवला होता, तर त्याला भूगोलातही प्रचंड आवड आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SpiceJet Layoff : 1400 कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार; कोणत्या कंपनीने दिला मोठा धक्का

SpiceJet Layoff

करिअरनामा ऑनलाईन । नोकर कपातीची कुऱ्हाड कधी कोणावर कोसळेल (SpiceJet Layoff) हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. भारताप्रमाणेच विदेशात देखील अशा घटना घडत आहेत. आता भारतामधील एका मोठ्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे कारण? (SpiceJet Layoff)
महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम आता थेट भारतामध्येही परिणाम करताना दिसत आहे. भारताची एअरलाइन स्पाइसजेटनेही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसल्याचे पहायला मिळत आहे. कंपनी आर्थिक संकटात असल्याने असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. स्पाइसजेट कंपनीने खर्च कमी करण्यासाठीच असा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळी आल्याचे दिसतंय.
1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे म्हणजेच हा कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच मोठा धक्का आहे. 60 कोटी रुपयांवर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च गेल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे देखील सांगितले जातंय. रिपोर्टनुसार टाळेबंदीबाबत (Layoff) कंपनीकडूबन कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती ही दिली जात आहे.

एका रिपोर्टनुसार, एअरलाइन स्पाइसजेटने (SpiceJet) तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीने आपले 15 टक्के इतके कर्मचारी कामावरून काढले आहेत. सध्या कंपनीमध्ये 9 हजारांच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत तर एअरलाइन स्पाइसजेटचे सध्या 30 च्या आसपास विमाने सुरू आहेत.
यापूर्वी एअरलाइन स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना (SpiceJet Layoff) उशीरा पगार मिळत होता. आता तर थेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं आहे. एवढंच नाही तर जानेवारी महिन्याचा पगार देखील कर्मचाऱ्यांना अजून मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार बंपर भरती!! 10 वी/ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी शोधत असणाऱ्या तरुण (Railway Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन पदांच्या तब्बल 9000 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ही मोठी भरती प्रक्रिया जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

असा करा अर्ज (Railway Recruitment 2024)
रेल्वेमध्ये टेक्निशियन पदांसाठी एकूण ९००० जागांवर भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र, मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि अपडेट्स घेऊ शकता.

‘ही’ पात्रता आवश्यक
1. इच्छुक उमेदवाराने १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. यासोबतच उमेदवाराने ITI उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.
3. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त (Railway Recruitment 2024) बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
4. तसेच इच्छुक उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आवश्यक वय मर्यादा
तंत्रज्ञान (टेक्निशियन) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 असावे तर कमाल वय हे 33 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अशी होणार निवड (Railway Recruitment 2024)
– रेल्वेतील या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे. CBT1 उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्यानंतर CBT2 परिक्षेत सहभागी होता यईल.
– CBT2 परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यानंतर उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com