Home Blog Page 153

Indian Post Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; महिन्याचा 63,200 एवढा पगार

Indian Post Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Indian Post Recruitment 2024) तरुणांसाठी भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय डाक विभागाकडून नवीन भरती राबवली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राइवर (साधारण ग्रेड) पदाच्या 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

विभाग – भारतीय डाक विभाग
भरले जाणारे पद – ड्राइवर (साधारण ग्रेड)
पद संख्या – 78 पदे (Indian Post Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. त्याच्याकडे Driving License+ हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे (Indian Post Recruitment 2024)
परीक्षा फी – 100 रुपये/-
मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

अशी होईल निवड –
स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित रहावे लागेल.
नोकरीचे करण्याचे ठिकाण – कानपूर (उत्तर प्रदेश)
काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Post Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIIT Pune Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापकासह अनेक पदांवर भरती

IIIT Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत (IIIT Pune Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे
पद संख्या – 54 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक प्राध्यापक – 39 पदे
आधीच्या पदवींमध्ये प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात पीएचडी
2. सहायक निबंधक – 02 पदे
किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य शिक्षण
3. कनिष्ठ अधीक्षक – 04 पदे
संबंधित क्षेत्रातील 6 वर्षांच्या अनुभवासह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
4. शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक – 01 पद
पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) अधिक 3 वर्षांचा अनुभव
5. कनिष्ठ तंत्रज्ञ – 03 पदे (IIIT Pune Recruitment 2024)
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी
6. कनिष्ठ सहाय्यक – 05 पदे
संगणक ऑपरेशन्सच्या ज्ञानासह बॅचलर पदवी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – 4111041, महाराष्ट्र.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 21,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (IIIT Pune Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – www.iiitp.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

INCOIS Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी!! भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात ‘या’ पदांवर भरती

INCOIS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात (INCOIS Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र
भरली जाणारी पदे –
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 01 पद
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 12 पदे
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 23 पदे
4. एक्सपर्ट/ कंसल्टंट (सायंटिफिक) – 02 पदे
5. एक्सपर्ट/ कंसल्टंट (एडमिन) – 01 पद
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (INCOIS Recruitment 2024)
1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III
60% गुण अनुभव पदव्युत्तर पदवी (महासागर विज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ भौतिक समुद्रविज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान)
2. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (वायुमंडलीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ हवामानशास्त्र/ भौतिक समुद्रविज्ञान/ समुद्रविज्ञान/ महासागर अभियांत्रिकी/ जिओमॅटिक्स/ जिओइन्फॉरमॅटिक्स/ रिमोट सेन्सिंग आणि GIS/ भूस्थानिक विज्ञान/ अवकाशीय माहिती तंत्रज्ञान/ पर्यावरण अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक ऍप्लिकेशन्स/ सेंट्रल मॅनेजमेंट)
3. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I
६०% गुण पदवी विज्ञान आणि तंत्रज्ञान / अवकाशीय माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / संगणक अनुप्रयोग / डेटा विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / समुद्र विज्ञान / भौतिकशास्त्र / विज्ञान संप्रेषण) किंवा 60% टक्के बी.ई./बी.टेक (संगणक विज्ञान/आयटी/सिव्हिल)
4. एक्सपर्ट/ कंसल्टंट (सायंटिफिक)
60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा डॉक्टरेट पदवी (महासागर विज्ञान / वायुमंडलीय विज्ञान / सागरी विज्ञान / भौतिकशास्त्र किंवा महासागर / वायुमंडलीय विज्ञानातील तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी)
5. एक्सपर्ट/ कंसल्टंट (एडमिन)
कोणत्याही शाखेतील पदवी

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 35 ते 65 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही (INCOIS Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद/संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – incois.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! मुंबई मनपाच्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या माध्यमासाठी किती पदे?

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची (Shikshak Bharti 2024) मोठी भरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी एकूण 1342 पदे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने या पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंत ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पटसंख्या वाढली पण शिक्षकांची पदे रिक्त
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा 8 भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते इयत्ता 10 पर्यंतच्या सुमारे 1,129 शाळांमध्ये मिळून सध्या 3 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळांतील पटसंख्या वाढली असताना शिक्षकांची पदे मात्र मागील काही वर्षापासून रिक्त आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी होणार शिक्षक भरती (Shikshak Bharti 2024)
ही पदे भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून यासाठी जाहिरात काढण्य़ात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान पदभरतीत पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. परंतुआता या भरतीमुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळतील; असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती
पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने आता याकरीता जाहिरात दिली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना दि. 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जाची छानणी करून यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या माध्यमास किती पदे
1. इंग्रजी माध्यम – ६९८ पदे
2. हिंदी माध्यम – २३९ पदे (Shikshak Bharti 2024)
3. मराठी माध्यम – २१६ पदे
4. उर्दू माध्यम – १८९ पदे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : हिने तर कमालच केली!! एकाच वर्षी पास केली IIT आणि UPSC; अवघ्या 22 व्या वर्षी झाली IAS

UPSC Success Story of IAS Simi Karan

करिअरनामा ऑनलाईन । IAS टॉपर्सच्या मुलाखती (UPSC Success Story) पाहून सिमीला UPSC परीक्षेचा पॅटर्न समजला होता. तिने UPSC अभ्यासक्रमाची वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती. त्यामुळे तिला सरकारी भरती परीक्षेची तयारी करणे खूप सोपे झाले. तिने आखलेल्या योग्य रणनीतीमुळे तिला 2019 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत संपूर्ण भारतातून 31 वा क्रमांक मिळाला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. आज आपण तिने केलेल्या कामगिरीविषयी जाणून घेणार आहोत.

ओडिशाची आहे रहिवासी
सिमी करण (Simi Karan) ही मुळची ओडिशाची रहिवासी आहे. आयएएस सिमी करणने लहान वयातच आयएएस (IAS) होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. ज्यावर्षी तिने आयआयटीमधून (IIT) अभियांत्रिकी पास केली त्याच वर्षी ती यूपीएससी परीक्षेतही यशस्वी झाली. तेव्हा तिचे वय फक्त 22 वर्षे होते. आयएएस प्रशिक्षणादरम्यान तिला सर्वोत्कृष्ट आयएएस प्रशिक्षणार्थी ही पदवीही मिळाली आहे.

IIT बॉम्बेची विद्यार्थिनी (UPSC Success Story)
सिमीने छत्तीसगडमधील भिलाई येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करत होते तर तिची आई शिक्षिका होती. 12 वी पूर्ण केल्यानंतर सिमीने इंजिनीअरिंग करण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) प्रवेश घेतला. याचवेळी तिच्या मनात सरकारी परीक्षेत यश मिळवून IAS अधिकारी होण्याची कल्पना तिच्या मनात आली आणि तिने या परीक्षेचा फॉर्म भरला.

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवलं
आयआयटी बॉम्बेमध्ये शिकत असताना सिमी करणला (Simi Karan) झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली. तिथूनच समाजसेवा करण्याचा विचार तिच्या मनात आला. तिला निस्वार्थीपणे (UPSC Success Story) समाजाची मदत करायची होती. यासाठीच तिने UPSC परीक्षा पास होऊन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची तयारी करताना तिने UPSC चा अभ्यासक्रम समजून घेऊन त्यानुसार पुस्तके जमा करण्यास सुरुवात केली.

अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी
सिमी IAS टॉपर्सच्या मुलाखती पहायची. यामाध्यमातून तिने UPSC परीक्षेचा पॅटर्न समजून घेतला. आधी तिने अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके जमा केली आणि प्रत्येक विषयाची छोट्या छोट्या भागात विभागणी केली. या स्ट्रॅटेजीमुळे तिला परीक्षेची तयारी करणे सोपे झाले. परिणामी 2019 मध्ये झालेल्या परिक्षेत तिने AIR 31 पटकावली आणि अवघ्या 22 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. ती सांगते; “मी कधीच अभ्यासाच्या (UPSC Success Story) तासांवर लक्ष केंद्रित केले नाही परंतु माझे ध्येय साध्य करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी मी प्राधान्यक्रम निश्चित केला. मी दररोज 8 ते 10 तास अभ्यास करायचे. यासोबत मी दररोज जॉगिंग करायचे, स्टँड-अप कॉमेडी सारखे शो पहायचे, मनोरंजनासाठी वेळ काढून माझे मन मोकळे करायचे.”

सिमी ठरली सर्वोत्कृष्ट IAS प्रशिक्षणार्थी
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने सिमी करणला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी प्रशिक्षणार्थी म्हणून LV पुरस्कार प्रदान केला आहे. सध्या तीची दिल्लीत सहाय्यक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Exam 2024 : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF ची परीक्षा मराठीतून होणार; ‘या’ प्रादेशिक भाषांचा समावेश

CRPF Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणं तसेच (CRPF Exam 2024) शासनाच्या विविध दलांमध्ये सामील होण्याचं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विशेष आकर्षण असते. यासाठी ते शारीरिक चाचणीत प्राप्त ठरण्यासाठी जिवतोडून मेहनत घेतात पण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक गुण मिळवता येत नाहीत. परिणामी या तरुणांचे स्वप्न भंगते. या समस्येची दखल घेत उमेदवारांना आता त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कॉन्स्टेबल (CRPF Constable) भरती परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे; यामध्ये मराठी (CRPF Exam 2024) भाषेचाही समावेश आहे.
सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी (Constable GD) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (SSC) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. यामाध्यमातून देशभरातून लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात.

देशभरातील या परीक्षेच्या संदर्भात, गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वरील १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC)2024 मध्ये विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे; त्यानुसार पुढील प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
या भाषांचा आहे समावेश (CRPF Exam 2024)
मराठी, आसामी, पंजाबी, मणिपुरी, कोकणी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू इ.
भरती विषयी महत्वाचे –
1. परीक्षा – दि. 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024
2. उमेदवार संख्या – 48 लाख
3. सहभागी शहरे – 128
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPPU Recruitment 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘या’ पदावर भरती; भरघोस पगाराची नोकरी; ताबडतोब करा अर्ज

SPPU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Recruitment 2024) अंतर्गत रजिस्ट्रार पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भरले जाणारे पद – रजिस्ट्रार
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी – Rs. 400/-
वय मर्यादा – 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SPPU Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
रजिस्ट्रारA Master’s Degree with at least 55% of the marks of any statutory University or its equivalent grade of ‘B’ in the UGC 7 point scale.Ph.D. Degree.Proficiency in Marathi, Hindi and English languages.

मिळणारे वेतन –

पदवेतन
रजिस्ट्रारAs per 7th pay commission at Academic Level S-29 (1,31,100 – 2,16,600) with rationalized entry pay of Rs. 1,31,100

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक (SPPU Recruitment 2024) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सूचना www.unipune.ac.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे; अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SPPU Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली 120 पदांवर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC अंतर्गत भरती होण्याची इच्छा (UPSC Recruitment 2024) असणाऱ्या देशातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 120 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)
पद संख्या – 120 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 40 ते 45 वर्षे

भरतीचा तपशील – (UPSC Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक संचालक51
वैज्ञानिक-बी12
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I02
विशेषज्ञ ग्रेड III54
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालकDegree in Engineering in Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical/ Electrical/ Electronics disciplines from a recognized University with Three years’ experience
वैज्ञानिक-बीMaster’s Degree in Physics/ Chemistry from a recognized University/ Institute; and (ii) One year practical experience in the testing/ evaluation of building construction materials employing physical methods of analysis in a recognized Laboratory/ Institute
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-IDegree of a recognized University or Institute (UPSC Recruitment 2024)
विशेषज्ञ ग्रेड IIIA recognized MBBS degree qualification included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956)
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक)Certificate of competency of Marine Engineer Officer Class-I (Steam or Motor or Combined Steam and Motor) as specified in section 78 of the Merchant Shipping Act, 1958 (44 of 1958) or equivalent as specified in section 86 of the said Act. N

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची (UPSC Recruitment 2024) तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://upsconline.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महावितरण विभागीय कार्यालय, पुसद अंतर्गत (Mahavitaran Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महावितरण विभागीय कार्यालय, पुसद
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)
पद संख्या – 55 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुसद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

पदपद संख्या 
विजतंत्री13 पदे
तारतंत्री36 पदे
कोपा06 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – ITI पास
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Mahavitaran Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. नोंदणीची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते?लीप वर्षात किती दिवस असतात? पहा उत्तरे

GK Updates 8 Feb (1)

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न : लीप वर्षात किती दिवस असतात?
उत्तर : ३६६ दिवस
प्रश्न : कोणत्या देशात माणसे माणसांना खातात?
उत्तर : कांगो देश (GK Updates)

प्रश्न : कोणत्या देशात वाघांना पाळले जाते?
उत्तर : दुबई
प्रश्न : कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
उत्तर : अमोनिया

प्रश्न : ‘जय हिंद’ हा नारा कोणी दिला होता?
उत्तर : सुभाष चंद्र बोस
प्रश्न : निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
उत्तर : ३६ डिग्री से.

प्रश्न : (GK Updates) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते होते?
उत्तर : सिंदखेड राजा
प्रश्न : भारताव्यतिरिक्त कोणत्या राज्यात लाल किल्ला आहे?
उत्तर : पाकिस्तान
प्रश्न : पूर्ण जगात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
उत्तर : गहू (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com