CRPF Exam 2024 : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF ची परीक्षा मराठीतून होणार; ‘या’ प्रादेशिक भाषांचा समावेश

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणं तसेच (CRPF Exam 2024) शासनाच्या विविध दलांमध्ये सामील होण्याचं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना विशेष आकर्षण असते. यासाठी ते शारीरिक चाचणीत प्राप्त ठरण्यासाठी जिवतोडून मेहनत घेतात पण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक गुण मिळवता येत नाहीत. परिणामी या तरुणांचे स्वप्न भंगते. या समस्येची दखल घेत उमेदवारांना आता त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कॉन्स्टेबल (CRPF Constable) भरती परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे; यामध्ये मराठी (CRPF Exam 2024) भाषेचाही समावेश आहे.
सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी (Constable GD) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (SSC) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. यामाध्यमातून देशभरातून लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात.

देशभरातील या परीक्षेच्या संदर्भात, गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वरील १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC)2024 मध्ये विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे; त्यानुसार पुढील प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
या भाषांचा आहे समावेश (CRPF Exam 2024)
मराठी, आसामी, पंजाबी, मणिपुरी, कोकणी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू इ.
भरती विषयी महत्वाचे –
1. परीक्षा – दि. 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024
2. उमेदवार संख्या – 48 लाख
3. सहभागी शहरे – 128
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com