UPSC Success Story : हिने तर कमालच केली!! एकाच वर्षी पास केली IIT आणि UPSC; अवघ्या 22 व्या वर्षी झाली IAS

करिअरनामा ऑनलाईन । IAS टॉपर्सच्या मुलाखती (UPSC Success Story) पाहून सिमीला UPSC परीक्षेचा पॅटर्न समजला होता. तिने UPSC अभ्यासक्रमाची वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती. त्यामुळे तिला सरकारी भरती परीक्षेची तयारी करणे खूप सोपे झाले. तिने आखलेल्या योग्य रणनीतीमुळे तिला 2019 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत संपूर्ण भारतातून 31 वा क्रमांक मिळाला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. आज आपण तिने केलेल्या कामगिरीविषयी जाणून घेणार आहोत.

ओडिशाची आहे रहिवासी
सिमी करण (Simi Karan) ही मुळची ओडिशाची रहिवासी आहे. आयएएस सिमी करणने लहान वयातच आयएएस (IAS) होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. ज्यावर्षी तिने आयआयटीमधून (IIT) अभियांत्रिकी पास केली त्याच वर्षी ती यूपीएससी परीक्षेतही यशस्वी झाली. तेव्हा तिचे वय फक्त 22 वर्षे होते. आयएएस प्रशिक्षणादरम्यान तिला सर्वोत्कृष्ट आयएएस प्रशिक्षणार्थी ही पदवीही मिळाली आहे.

IIT बॉम्बेची विद्यार्थिनी (UPSC Success Story)
सिमीने छत्तीसगडमधील भिलाई येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करत होते तर तिची आई शिक्षिका होती. 12 वी पूर्ण केल्यानंतर सिमीने इंजिनीअरिंग करण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) प्रवेश घेतला. याचवेळी तिच्या मनात सरकारी परीक्षेत यश मिळवून IAS अधिकारी होण्याची कल्पना तिच्या मनात आली आणि तिने या परीक्षेचा फॉर्म भरला.

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवलं
आयआयटी बॉम्बेमध्ये शिकत असताना सिमी करणला (Simi Karan) झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली. तिथूनच समाजसेवा करण्याचा विचार तिच्या मनात आला. तिला निस्वार्थीपणे (UPSC Success Story) समाजाची मदत करायची होती. यासाठीच तिने UPSC परीक्षा पास होऊन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची तयारी करताना तिने UPSC चा अभ्यासक्रम समजून घेऊन त्यानुसार पुस्तके जमा करण्यास सुरुवात केली.

अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी
सिमी IAS टॉपर्सच्या मुलाखती पहायची. यामाध्यमातून तिने UPSC परीक्षेचा पॅटर्न समजून घेतला. आधी तिने अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके जमा केली आणि प्रत्येक विषयाची छोट्या छोट्या भागात विभागणी केली. या स्ट्रॅटेजीमुळे तिला परीक्षेची तयारी करणे सोपे झाले. परिणामी 2019 मध्ये झालेल्या परिक्षेत तिने AIR 31 पटकावली आणि अवघ्या 22 व्या वर्षी ती IAS अधिकारी बनली. ती सांगते; “मी कधीच अभ्यासाच्या (UPSC Success Story) तासांवर लक्ष केंद्रित केले नाही परंतु माझे ध्येय साध्य करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी मी प्राधान्यक्रम निश्चित केला. मी दररोज 8 ते 10 तास अभ्यास करायचे. यासोबत मी दररोज जॉगिंग करायचे, स्टँड-अप कॉमेडी सारखे शो पहायचे, मनोरंजनासाठी वेळ काढून माझे मन मोकळे करायचे.”

सिमी ठरली सर्वोत्कृष्ट IAS प्रशिक्षणार्थी
लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) ने सिमी करणला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी प्रशिक्षणार्थी म्हणून LV पुरस्कार प्रदान केला आहे. सध्या तीची दिल्लीत सहाय्यक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com