SpiceJet Layoff : 1400 कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार; कोणत्या कंपनीने दिला मोठा धक्का

करिअरनामा ऑनलाईन । नोकर कपातीची कुऱ्हाड कधी कोणावर कोसळेल (SpiceJet Layoff) हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. भारताप्रमाणेच विदेशात देखील अशा घटना घडत आहेत. आता भारतामधील एका मोठ्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे कारण? (SpiceJet Layoff)
महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम आता थेट भारतामध्येही परिणाम करताना दिसत आहे. भारताची एअरलाइन स्पाइसजेटनेही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसल्याचे पहायला मिळत आहे. कंपनी आर्थिक संकटात असल्याने असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. स्पाइसजेट कंपनीने खर्च कमी करण्यासाठीच असा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळी आल्याचे दिसतंय.
1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे म्हणजेच हा कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच मोठा धक्का आहे. 60 कोटी रुपयांवर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च गेल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे देखील सांगितले जातंय. रिपोर्टनुसार टाळेबंदीबाबत (Layoff) कंपनीकडूबन कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती ही दिली जात आहे.

एका रिपोर्टनुसार, एअरलाइन स्पाइसजेटने (SpiceJet) तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीने आपले 15 टक्के इतके कर्मचारी कामावरून काढले आहेत. सध्या कंपनीमध्ये 9 हजारांच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत तर एअरलाइन स्पाइसजेटचे सध्या 30 च्या आसपास विमाने सुरू आहेत.
यापूर्वी एअरलाइन स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना (SpiceJet Layoff) उशीरा पगार मिळत होता. आता तर थेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं आहे. एवढंच नाही तर जानेवारी महिन्याचा पगार देखील कर्मचाऱ्यांना अजून मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com