Board Exam 2024 : 10 वी/12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; विद्यार्थ्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डी. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण मंडळातर्फे नुकतीच विभागातील सर्व जिल्हानिहाय मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी परीक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा, परीक्षेतील गैरप्रकार टाळावेत, परीक्षा केंद्र परिसरात मुलांना बसण्यासाठी मंडप उभारू नये, पिण्याचे पाणी, फॅन, लाइट अशा भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात, केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकार किंवा भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास बोर्डाच्या नियमानुसार त्या केंद्राचे संकेतांक गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी; तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना विभागीय मंडळाने केंद्रांना दिल्या आहेत.

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळाने (Board Exam 2024) केंद्रसंचालकांकडून हमीपत्र भरून घेतले आहे. यामध्ये असे म्हटले आहे, की प्रत्येक वर्गात केवळ २५ विद्यार्थी असतील. परीक्षा कक्षात योग्य असा प्रकाश, पंखे, लाइट अशी सुविधा असेल. पर्यवेक्षणासाठी मान्यताप्राप्त शाळेतील नियमित शिक्षक असेल. ओळखपत्रानुसारच कर्मचाऱ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाईल इतरांना प्रवेश दिला जाणार नाही.

CCTV च्या निगराणीत होणार तपासणी (Board Exam 2024)
परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याची आवश्यक ते पथक नियुक्त करून तपासणी करण्यात येईल. कोणताही परीक्षार्थी अवैध साहित्य अथवा कागद सोबत घेऊन परीक्षा दालनात प्रविष्ट होणार नाही. तपासणी सीसीटीव्हीच्या निगराणीत होईल. त्याचे फुटेज परीक्षा संपेपर्यंत जतन करण्यात येईल. परीक्षा कालावधीत ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा शिक्षक केंद्रावर आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यास ‘मी जबाबदार असेल’, असे पत्र केंद्रसंचालकांकडून बोर्डाने भरून घेतले आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार अथवा भौतिक सुविधांचा अभाव आढळून आल्यास बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करून संकेतांक गोठवण्यात येईल; अशा सूचना; विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिल्या आहेत.

10 वी, 12 वी ची विद्यार्थी संख्या अशी आहे –
इयत्ता 12 वी

1. प्रविष्ट विद्यार्थी – १,७९,०१४
2. एकूण महाविद्यालये – १,४०८
3. परीक्षा केंद्रे – ४४९(Board Exam 2024)
4. परीरक्षक केंद्रे – ५८
इयत्ता 10 वी
1. प्रविष्ट विद्यार्थी – १,८६,८१४
2. शाळांची संख्या – २,७३७
3. परीक्षा केंद्रे – ६३८
4. परीरक्षक केंद्रे – ६३
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com