Home Blog Page 133

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली; ‘या’ दिवशी जाहीर होणार नवीन वेळापत्रक

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडिया ने CA मे 2024 च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ICAI ने पुढे माहिती दिली आहे की ते सुधारित वेळापत्रक 19 मार्च रोजी अधिकृत वेबसाइट icai.org वर प्रसिद्ध करतील.

या दिवशी होणार होत्या परीक्षा
ICAI ने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, CA फाउंडेशन कोर्सची परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून 2024 रोजी होणार होती. सीए इंटरमीडिएट अभ्यासक्रमासाठी, गट 1 च्या परीक्षा 3, 5 आणि 7 मे 2024 रोजी होणार होत्या आणि गट 2 च्या परीक्षा 9, 11 आणि 13 मे रोजी होणार होत्या. त्याचवेळी गट 1 च्या CA अंतिम अभ्यासक्रमाच्या परीक्षा 2, 4 आणि 6 मे आणि गट 2 च्या परीक्षा 8, 10 आणि 12 मे रोजी होणार होत्या.

फाउंडेशन पेपर 1 आणि 2 च्या परीक्षा साधारणतः तीन तासांच्या कालावधीसाठी, दुपारी 2 ते 5 या वेळेत घेतल्या जातात, तर पेपर 3 आणि 4 च्या परीक्षा दुपारी 2 ते 4 या दोन तासांसाठी (ICAI CA Exam 2024) घेतल्या जातात. याशिवाय मध्यंतरीच्या सर्व पेपरची वेळ दुपारी 2 ते 5 अशी आहे. अंतिम अभ्यासक्रमाचा पेपर क्र.1 ते 5 दुपारी 2 ते 5 या वेळेत, तर पेपर क्र. 6 हा दुपारी 2 ते 6 या चार तासांसाठी घेण्यात येतो.
दरम्यान, आयसीएआयने फाऊंडेशन आणि आंतर परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतल्या जातील अशी घोषणा केली होती. आतापर्यंत, ICAI वर्षातून दोनदा सीए इंटर आणि फाउंडेशन परीक्षा घेत असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Toughest Exam in India : ‘या’ आहेत देशातील सर्वात कठीण परीक्षा; पास झाला तर तुमची लाईफ सेट झाली म्हणून समजा

Toughest Exam in India

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीची परीक्षा झाली की तरुण-तरुणींना (Toughest Exam in India) करिअरचा योग्य मार्ग निवडण्यात खूप गोंधळाचा सामना करावा लागतो. यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा किंवा करिअर समुपदेशकांचा सल्लाही घेऊ शकता. जर तुम्हाला भविष्यात लाखात किंवा कोटीत सॅलरी पॅकेज मिळवायचे असेल, तर तुम्हाला भारतातील टॉप कोर्समधून पदवीचे शिक्षण घ्यावे लागेल.

डॉक्टर, इंजिनीअर, सायंटिस्ट, सीए यांसारख्या सर्वोत्तम कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि त्यानंतर या अभ्यासक्रमांसाठी कठोर अभ्यास करावा लागतो. असे काही कोर्सेस आहेत ज्यात तुम्हाला पदवी मिळविण्यासाठी 4 ते 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो, परंतु त्यानंतर तुमचे भविष्य एकदम सुरक्षित होते. पाहूया अशा काही कोर्सेसची यादी जे तुम्ही 12 वी नंतर करू शकता….

अभियांत्रिकी (Engineering) (Toughest Exam in India)
जर तुम्हाला B.Tech करायचे असेल तर एकदा कसून मेहनत करा आणि JEE (JEE) परीक्षा पास करा. यानंतर तुम्हाला आयआयटीत प्रवेश मिळाला तर तुमचे आयुष्य सेट होईल. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन तयार केला जातो. जरी अभियांत्रिकीचा अभ्यास करणे कठीण असले तरी ते परदेशात नोकरी मिळवण्याची आणि तुमचे आयुष्य सेट करण्याची अधिक चांगली संधी देते.

एमबीबीएस (MBBS)
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, तुम्हाला NEET (NEET) परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसची जागा मिळेल. MBBS कोर्स 5 वर्षांचा आहे, परंतु तुम्हाला यासाठी कदाचित 6 वर्षे देखील द्यावे लागतील. उच्च शिक्षणासाठी हा देशातील सर्वात कठीण अभ्यासक्रमांपैकी एक असला, तरी पदवी मिळाल्यानंतर आयुष्य निश्चित करता येते.

सनदी लेखापाल (Chartered Accountant)
आर्थिक घडामोडी आणि लेखा क्षेत्राशी संबंधित सीए अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारे विद्यार्थी. हा कोर्स इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने तयार केला आहे. हा अभ्यासक्रम खूप आव्हानात्मक समजला जातो. भारतात सीए (CA) होण्यासाठी अकाउंटिंग, टॅक्सेशन इत्यादींशी संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कामाच्या अनुभवासह, CA दरमहा 60 लाख रुपये कमवू शकतो.

शास्त्रज्ञ (Scientist)
शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमचे मन कुशाग्र असण्यासोबतच संशोधनाची आवड असणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान क्षेत्राचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. वैज्ञानिक (Toughest Exam in India) प्रणाली आणि तंत्रे समजून घेणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञाकडे विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच बौद्धिक कौशल्ये असणे महत्त्वाचे आहे. अभ्यास पूर्ण केल्यानंतर, एखादी व्यक्ती इस्रो, नासा या अंतराळ संस्थामध्ये नोकरी मिळवू शकते.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mazagon Dock Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी महाव्यवस्थापक, अभियंता पदावर नोकरीची संधी; दरमहा 2,80,000 पगार

Mazagon Dock Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Recruitment 2024) लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे.

संस्था – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2024

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. महाव्यवस्थापक / General Manager – 01 पद
शैक्षणिक पात्रता – पदवी
2. उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager – 02 पदे
शैक्षणिक पात्रता – CWA, MBA, MMS, पदव्युत्तर पदवी
3. वरिष्ठ अभियंता / Senior Engineer – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – पत्रव्यवहार पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, पीजी डिप्लोमा, एमबीए, एचआर मध्ये डिप्लोमा. + ०१ वर्षांचा अनुभव.
बीई फायर इंजिनिअरिंग, फायर इंजिनीअर्समध्ये पदवीधर, सीपीओ/ मास्टर
4. उपमहाव्यवस्थापक / Manager – 01 पद
पदवीधर, पदव्युत्तर पदवी
5. वरिष्ठ अभियंता / Senior Engineer – 05 पदे
शैक्षणिक पात्रता – नौदल आर्किटेक्चरमधील पदवी, नौदल बांधकाम, अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदविका

वय मर्यादा – (Mazagon Dock Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी 30 ते 54 वर्षापर्यंत
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS 300/- रुपये
SC/ST/PWD – शुल्क नाही (Mazagon Dock Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)


काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.mazagondock.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Rail Coach Factory Recruitment 2024 : 10 वी/ITI पास तरुणांसाठी रेल कोच फॅक्टरी अंतर्गत मेगाभरती सुरु

Rail Coach Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल कोच फॅक्टरी अंतर्गत (Rail Coach Factory Recruitment 2024) विविध पदांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.

रेल्वेतील नोकरी ही सुरक्षित नोकरी मानली जाते. त्यामुळे (Rail Coach Factory Recruitment 2024) अनेक तरुण रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत असतात. या तरुणांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे 10 वी/ITI पास तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. पाहूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – रेल कोच फॅक्टरी
पद संख्या – 550 पदे
भरले जाणारे पद –
1) फिटर – 200 पदे
2) वेल्डर (G&E) – 230 पदे
3) मशीनिस्ट – 05 पदे
4) पेंटर (G) – 20 पदे
5) कारपेंटर – 05 पदे (Rail Coach Factory Recruitment 2024)
6) इलेक्ट्रिशियन – 75 पदे
7) AC & Ref. मॅकेनिक – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024 (11:59 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Rail Coach Factory Recruitment 2024)
1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2. ITI/ ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट (Rail Coach Factory Recruitment 2024)
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी – ₹100/-
2. SC/ST/PWD/महिला – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – कपूरथला (पंजाब)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
railnet.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSCE Recruitment 2024 : ‘लिपिक’ पदावर नोकरीची मोठी संधी!! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत भरती जाहीर

MSCE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Recruitment 2024) अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पद संख्या – 23 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य लिपिक – 06 पदे
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे
2. वरिष्ठ लिपिक – 14 पदे
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
3. निम्नश्रेणी लघुलेखक – 03 पदे (MSCE Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024

वय मर्यादा – (MSCE Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ मार्च २०२४ रोजी १८ ते ४३ असणे आवश्यक आहे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी –
1. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव) रु. ९५०/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
3. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.mscepune.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Dress Code : शिक्षकांनो… जीन्स टीशर्ट वापरु नका… शिक्षकांच्या पोषाखाबाबत शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं?

Teachers Dress Code

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील सर्व (Teachers Dress Code) माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन केलेला असा पेहराव करायचा आहे.

ड्रेस कोड ठरवा
शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ‘ड्रेस कोड ठरवावा, असे राज्य सरकारने (Teachers Dress Code) सांगितले आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश काढला आहे.

आता शिक्षकांना नीटनेटक्या पेहरावातच शाळेत यावे लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक अशा सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत (Teachers Dress Code) असतात. नागरिक आणि विद्यार्थी शिक्षकांना गुरु मानतात. समजात वावरत असताना या शिक्षकांचा विद्यार्थी, पालक, नामांकित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क येत असतो. अशा वेळी शिक्षकांच्या पेहरावाकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते.

शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना शिक्षकांनी वेशभूषेबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. आपली वेशभूषा ही आपल्या संस्थेस आणि पदास किमान अनुरूप ठरेल, याची (Teachers Dress Code) शिक्षकांनी सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. हा निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांसाठी लागू असणार आहे.

शिक्षकांनी काय करावे आणि काय करु नये
1. कर्तव्यावर असताना शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेला पेहराव परिधान करू नये. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये.
2. पुरुष व महिला शिक्षकांसाठी कोणत्या रंगाचा पेहराव असावा; हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
3. पुरुष शिक्षकांनी फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान करावी.
4. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पोषाख करावा.
5. आपल्या पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे किंवा बूट वापरावेत.
5. स्काउट गाइडच्या शिक्षकांनी स्काउट गाइडचाच पोषाख वापरावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : राज्य सरकारचा मोठा निर्णय… मराठी शिक्षकांच्या नावामागे ‘T’ तर इंग्रजी शिक्षकांच्या नावामागे ‘Tr’ लागणार

Big News (9)

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Big News) लागू होण्यापूर्वी राज्य सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी राज्य सरकारने सर्व शालेय शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू करण्याची ही घोषणा केली आहे. याचबरोबर जसे डॉक्टरांच्या नावापुढे ‘Dr’ लावले जाते, वकिलांच्या नावापुढे ‘Ad’ लावले जाते तसेच शिक्षकांच्या नावापुढे Tr लावले जावे असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावापुढे ‘Tr’ लिहिता येणार आहे आणि मराठी माध्यमातील शिक्षकांना ‘T’ असे आपल्या नावापुढे लिहावे लागणार आहे. यामुळे शिक्षकांच्या नावावरूनच त्यांचे प्रोफेशन ओळखता येणार आहे.

राज्य सरकारने शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापूर्वी जसे डॉक्टरांच्या नावापुढे Dr लावले जायचे तसेच आता शिक्षकांच्या नावापुढे देखील Tr असे लावता येणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नावापुढे Tr असे लावावे हा आदेश जारी करण्यात आला (Big News) आहे. या आदेशानुसारच, जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे Tr लिहिले जाणार आहे. तर मराठी शिक्षकांच्या नावापुढे फक्त T जोडले जाणार आहे. यामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावाने एक वेगळी ओळख मिळणार आहे.

दरम्यान, शाळांमधील शिक्षकांच्या ड्रेस कोडबाबत राज्य सरकारने (Big News) परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. या परिपत्रकाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या परिपत्रकात सरकारने म्हटले आहे की; महिला शिक्षकांनी सलवार, कुर्ता, दुपट्टा घालावा. तर पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट घालावी. त्यांच्या शर्टवर फॅब्रिकमध्ये ग्राफिक डिझाइन किंवा पेंटिंग नसावेत. तसेच, शिक्षकांनी शाळेत जीन्स आणि टी-शर्ट घालू नये. सरकारने शिक्षकांना फक्त कपडे कसे घालावे हे सांगितलेले नाही तर शूज आणि चप्पल देखील कशी घालावी याचे आदेश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : परदेशात जाण्याची संधी आणि लाखोंच्या पगारावर सोडलं पाणी; हा तरुण पहिल्याच प्रयत्नात झाला DSP

Career Success Story of DSP Syed Areeb Ahmad

करिअरनामा ऑनलाईन । देशात असे अनेक तरुण आहेत जे देशसेवा (Career Success Story) करण्यासाठी चांगली नोकरी सोडतात. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद असं या तरुणाचं नाव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे रहिवासी आहेत. त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलीस उपअधीक्षक होण्याचा मान मिळवला आहे.

परदेशात जाण्याची आणि लाखो रुपये पगाराची संधी सोडली
सय्यद अरीब अहमद (DSP Syed Areeb Ahmad) यांच्या करिअरची सुरवात झाली होती. त्यांना 1 लाख रुपये पगार आणि परदेशात जाण्याची संधी मिळाली होती. पण त्यांनी ही नोकरी नाकारुन सैन्यात भरती होण्याची तयारी सुरु केली होती. नागरी सेवा परीक्षांचा कसून अभ्यास करुन सय्यद अहमद हे पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) झाले आहेत. सय्यद अहमद यांचे आयआयटी कानपूरमधून (IIT kanpur) बी. टेक. झाले आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून त्यांनी एमएससी (MSC) केलं आहे. 2018 मध्ये ते पीपीएस (PPS) अधिकारी झाले होते.

परदेशात जावून नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती
सय्यद अहमद यांचे वडील व्यवसायानं वकिल होते. मुलाने आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन चांगली नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा (Career Success Story) होती. पण सय्यद अहमद यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. त्यांना भारतात राहून लोकांना सहकार्य करायचे होते. या आवडीपोटी त्यांनी महिन्याला 1 लाख रुपये पगार देणाऱ्या नोकरीवर पाणी सोडले. समजसेवेचा वसा पूर्ण करण्यसाठी त्यांनी पोलीस अधिकारी होणं पसंत केलं.

अभ्यासासाठी सय्यद अहमद यांनी दिल्ली गाठली
सुरुवातीच्या काळात सय्यद अहमद प्रयागराजमध्ये राहून सरकारी परीक्षेची तयारी करत होते. त्यानंतर काही काळानंतर ते दिल्लीला गेले. त्यांनी कसून अभ्यास केला आणि 2018-19 मध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते DSP झाले. यापूर्वी ते PPS ची परीक्षा पास झाले होते.

कर्तव्यदक्ष अधिकारी
नोकरीत कर्तव्य बजावत असताना सय्यद अहमद हे पारदर्शक काम करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी धाडसाने अनेक गुन्हे उघड केले आहेत. दरोडे असतील किंवा गांजा (Career Success Story) तस्करी असेल या घटनांचा त्यांनी छडा लावला आहे. अनेक गुन्हेगारांना त्यांनी शिताफीने अटक केली आहे. सय्यद अहमद यांच्याकडे ताज महलची (Taj Mahal) सुरक्षा आणि आग्रा शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन ते स्वतःवर दिलेली जबाबदारी पार पाडत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

British Council Scholarship for Women : खास महिलांसाठी ब्रिटिश कौन्सिलची स्कॉलरशीप जाहीर

British Council Scholarship for Women

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिटिश दूतावासाच्या वतीने (British Council Scholarship for Women) महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही स्टेम शिष्यवृत्ती असेल. या शिष्यवृत्तीमुळे महिलांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली आहे.

ब्रिटिश दूतावासाच्या वतीने जगभरातील महिलांसाठी ही विशेष शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे. “संशोधन आणि नवनिर्मितीत महिलांची संख्या वाढावी म्हणून ब्रिटिश दूतावासाच्या वतीने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे;” अशी माहिती एज्युकेशन इंडियाच्या संचालक रित्तिका चंदा यांनी दिली आहे.

प्रवेश कुठे घेता येणार – (British Council Scholarship for Women)
या शिष्यवृत्तीसाठी ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी, ग्रीनविच युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येणार आहे.
या सवलती मिळणार –
शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क, स्टायपेंड, प्रवास खर्च, व्हिसा, आरोग्य विमा यांचा समावेश असेल.
कोणता अभ्यासक्रम निवडू शकता –
स्कॉलर्स डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फार्मास्युटिकल सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, इंटेलिजंट हेल्थकेअर आदी अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात. (British Council Scholarship for Women)
ब्रिटिश दूतावासाच्या वतीने भारत किंवा दक्षिण आशियातील विद्यार्थिनींसाठी 25 टक्के शिष्यवृत्ती राखीव असणार आहे.

देशातील विज्ञान तंत्रज्ञानात महिलांचे योगदान असे आहे
1. संशोधन किंवा नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण – 27 टक्के
2. या क्षेत्रात पदवीधरांमध्ये महिलांचे प्रमाण – 43 टक्के
शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://www.britishcouncil.in/study-uk/scholarships
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CUET-PG Admit Card 2024 : ‘CUET PG’ परीक्षेचे अॅडमिट कार्ड उपलब्ध; इथून करा डाउनलोड

CUET-PG Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय आणि राज्य (CUET-PG Admit Card 2024) विद्यापीठे, नामांकित शैक्षणिक संस्था, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यामधील विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी CUET PG परीक्षा घेण्यात येते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (NTA) घेण्यात येणारी ‘सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-2024’ (CUET PG ) येत्या रविवारी दि. 17 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
देशातील विद्यार्थ्यांना आणि विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते.

अॅडमिट कार्ड इथे करा डाउनलोड
ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र https://pgcuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. या संकेतस्थळावरुन अर्ज क्रमांक आणि जन्म दिवस अशी माहिती देऊन (CUET-PG Admit Card 2024) विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षेसाठी परीक्षार्थीकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थींनी प्रवेश पत्र सांभाळून ठेवणेही आवश्यक आहे, अशा सूचना NTA ने दिल्या आहेत.

विशेष सूचना – (CUET-PG Admit Card 2024)
विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in आणि https://pgcuet.samarth.ac.in ही अधिकृत संकेतस्थळे सातत्याने पाहावीत. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती या संकेतस्थळाद्वारे परीक्षार्थींना देण्यात येत आहे. तसेच, प्रवेश पत्र डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास किंवा प्रवेश पत्रातील माहिती विसंगती आढळल्यास संबंधित परीक्षार्थींनी [email protected] या ईमेलद्वारे संपर्क साधावा; असे आवाहन NTA ने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com