Teachers Dress Code : शिक्षकांनो… जीन्स टीशर्ट वापरु नका… शिक्षकांच्या पोषाखाबाबत शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं?

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील सर्व (Teachers Dress Code) माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन केलेला असा पेहराव करायचा आहे.

ड्रेस कोड ठरवा
शिक्षकांनी शाळेत येताना जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ‘ड्रेस कोड ठरवावा, असे राज्य सरकारने (Teachers Dress Code) सांगितले आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश काढला आहे.

आता शिक्षकांना नीटनेटक्या पेहरावातच शाळेत यावे लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक अशा सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत (Teachers Dress Code) असतात. नागरिक आणि विद्यार्थी शिक्षकांना गुरु मानतात. समजात वावरत असताना या शिक्षकांचा विद्यार्थी, पालक, नामांकित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क येत असतो. अशा वेळी शिक्षकांच्या पेहरावाकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते.

शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना शिक्षकांनी वेशभूषेबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. आपली वेशभूषा ही आपल्या संस्थेस आणि पदास किमान अनुरूप ठरेल, याची (Teachers Dress Code) शिक्षकांनी सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. हा निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांसाठी लागू असणार आहे.

शिक्षकांनी काय करावे आणि काय करु नये
1. कर्तव्यावर असताना शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेला पेहराव परिधान करू नये. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये.
2. पुरुष व महिला शिक्षकांसाठी कोणत्या रंगाचा पेहराव असावा; हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
3. पुरुष शिक्षकांनी फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान करावी.
4. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पोषाख करावा.
5. आपल्या पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे किंवा बूट वापरावेत.
5. स्काउट गाइडच्या शिक्षकांनी स्काउट गाइडचाच पोषाख वापरावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com