Big News : राज्य सरकारचा मोठा निर्णय… मराठी शिक्षकांच्या नावामागे ‘T’ तर इंग्रजी शिक्षकांच्या नावामागे ‘Tr’ लागणार

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Big News) लागू होण्यापूर्वी राज्य सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी राज्य सरकारने सर्व शालेय शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू करण्याची ही घोषणा केली आहे. याचबरोबर जसे डॉक्टरांच्या नावापुढे ‘Dr’ लावले जाते, वकिलांच्या नावापुढे ‘Ad’ लावले जाते तसेच शिक्षकांच्या नावापुढे Tr लावले जावे असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावापुढे ‘Tr’ लिहिता येणार आहे आणि मराठी माध्यमातील शिक्षकांना ‘T’ असे आपल्या नावापुढे लिहावे लागणार आहे. यामुळे शिक्षकांच्या नावावरूनच त्यांचे प्रोफेशन ओळखता येणार आहे.

राज्य सरकारने शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापूर्वी जसे डॉक्टरांच्या नावापुढे Dr लावले जायचे तसेच आता शिक्षकांच्या नावापुढे देखील Tr असे लावता येणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नावापुढे Tr असे लावावे हा आदेश जारी करण्यात आला (Big News) आहे. या आदेशानुसारच, जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे Tr लिहिले जाणार आहे. तर मराठी शिक्षकांच्या नावापुढे फक्त T जोडले जाणार आहे. यामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावाने एक वेगळी ओळख मिळणार आहे.

दरम्यान, शाळांमधील शिक्षकांच्या ड्रेस कोडबाबत राज्य सरकारने (Big News) परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. या परिपत्रकाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या परिपत्रकात सरकारने म्हटले आहे की; महिला शिक्षकांनी सलवार, कुर्ता, दुपट्टा घालावा. तर पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट घालावी. त्यांच्या शर्टवर फॅब्रिकमध्ये ग्राफिक डिझाइन किंवा पेंटिंग नसावेत. तसेच, शिक्षकांनी शाळेत जीन्स आणि टी-शर्ट घालू नये. सरकारने शिक्षकांना फक्त कपडे कसे घालावे हे सांगितलेले नाही तर शूज आणि चप्पल देखील कशी घालावी याचे आदेश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com