MSCE Recruitment 2024 : ‘लिपिक’ पदावर नोकरीची मोठी संधी!! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Recruitment 2024) अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पद संख्या – 23 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य लिपिक – 06 पदे
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे
2. वरिष्ठ लिपिक – 14 पदे
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
3. निम्नश्रेणी लघुलेखक – 03 पदे (MSCE Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024

वय मर्यादा – (MSCE Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ मार्च २०२४ रोजी १८ ते ४३ असणे आवश्यक आहे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी –
1. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव) रु. ९५०/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
3. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.mscepune.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com