CUET-PG Admit Card 2024 : ‘CUET PG’ परीक्षेचे अॅडमिट कार्ड उपलब्ध; इथून करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय आणि राज्य (CUET-PG Admit Card 2024) विद्यापीठे, नामांकित शैक्षणिक संस्था, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यामधील विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी CUET PG परीक्षा घेण्यात येते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (NTA) घेण्यात येणारी ‘सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-2024’ (CUET PG ) येत्या रविवारी दि. 17 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
देशातील विद्यार्थ्यांना आणि विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते.

अॅडमिट कार्ड इथे करा डाउनलोड
ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र https://pgcuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. या संकेतस्थळावरुन अर्ज क्रमांक आणि जन्म दिवस अशी माहिती देऊन (CUET-PG Admit Card 2024) विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. परीक्षेसाठी परीक्षार्थीकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थींनी प्रवेश पत्र सांभाळून ठेवणेही आवश्यक आहे, अशा सूचना NTA ने दिल्या आहेत.

विशेष सूचना – (CUET-PG Admit Card 2024)
विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in आणि https://pgcuet.samarth.ac.in ही अधिकृत संकेतस्थळे सातत्याने पाहावीत. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती या संकेतस्थळाद्वारे परीक्षार्थींना देण्यात येत आहे. तसेच, प्रवेश पत्र डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास किंवा प्रवेश पत्रातील माहिती विसंगती आढळल्यास संबंधित परीक्षार्थींनी [email protected] या ईमेलद्वारे संपर्क साधावा; असे आवाहन NTA ने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com