Home Blog Page 126

CBIC Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना कस्टम्स विभागात सरकारी नोकरीची संधी; त्वरा करा

CBIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त सहायक संचालक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ
भरले जाणारे पद – अतिरिक्त सहायक संचालक
पद संख्या – 110 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (CBIC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002

मिळणारे वेतन – Rs. 47,600/- ते Rs. 1,51,100/- दरमहा
असा करा अर्ज – (CBIC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dgpm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2024 : ITI पास तरुणांसाठी न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरु

NPCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2024) लिमिटेड येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 355 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2024 आहे.

ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी समजली जाते. या माध्यमातून फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेवूया….

संस्था – न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)
रिक्त पदांचा तपशील –
1. फिटर / Fitter – 94 पदे (NPCIL Recruitment 2024)
2. इलेक्ट्रिशियन / Electrician – 94 पदे
3. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic – 94 पदे
4. कोपा / COPA – 14 पदे
5. टर्नर / Turner – 13 पदे
6. मशिनिस्ट / Machinist – 13 पदे
7. वेल्डर / Welder – 13 पदे
पद संख्या – 355 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (NPCIL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 एप्रिल 2024 रोजी, 14 ते 24 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
PwBD – 10 वर्षे सूट (NPCIL Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.npcilcareers.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pawan Hans Ltd Recruitment 2024 : हेलिकॉप्टर पायलट होण्याची मोठी संधी!! दरमहा 1.50 ते 4.50 लाख रुपये पगार

Pawan Hans Ltd Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पवन हंस लिमिटेड अंतर्गत (Pawan Hans Ltd Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी हेलिकॉप्टर पायलट पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

संस्था – पवन हंस लिमिटेड
भरले जाणारे पद – सहयोगी हेलिकॉप्टर पायलट (Associate Helicopter Pilot)
पद संख्या – 50 पदे (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida-201 301, (U.P.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024

परीक्षा फी – (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
1. UR/OBC उमेदवारांसाठी – रु.295
2. SC/ST उमेदवार आणि अपंग व्यक्तींसाठी – NIL
मिळणारे वेतन – रु. 1.50 लाख ते रु. 4.50 लाख दरमहा
निवड प्रक्रिया –
1. उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
2. उमेदवारांनी मुलाखतीस येताना पात्रता, अनुभव, वेतन/सीटीसी, आरक्षण इत्यादीसह सर्व मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Pawan Hans Ltd Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : एकामागोमाग एक अवघड परीक्षा पास केल्या; 12 वर्षानंतर IAS पदाचा राजीनामा; आता करतात ‘हे’ काम

Career Success Story of Gaurav Kaushal

करिअरनामा ऑनलाईन । UPSC, MPSC प्रमाणे दरवर्षी लाखो (Career Success Story) विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु काही मोजकेच तरुण त्यांचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात. आज आपण अशा एका तरुणाची कथा पाहणार आहोत; ज्याने एकामागोमाग एक अनेक कठीण परीक्षा पास केल्या आहेत. हा तरुण अगदी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. या तरुणाने आयआयटी दिल्लीमध्ये (IIT Delhi) प्रवेश घेतला, एक वर्ष बी.टेक शिकला, इथून बाहेर पडल्यानंतर बीआयटीएस पिलानीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. केले. इथूनही त्याने कॉलेज आणि कोर्स एका वर्षानंतर सोडला. यानंतर शेवटी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केले आणि नंतर तो आयएएस (IAS) झाला आणि तिथूनही त्याने पदाचा राजीनामा दिला. एकंदरीत या तरुणाचा करिअर ग्राफ कसा आहे? IAS पद सोडल्यानंतर सध्या हा तरुण काय करत आहे; ते पाहूया…

IIT मध्ये प्रवेश मिळवला (Career Success Story)
गौरव कौशल (IAS Gaurav Kaushal) हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण पंचकुला येथून झाले. गौरव कौशलने बारावीनंतर अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी JEE MAIN आणि ADVANCE परीक्षा दिली. ही परीक्षा देशातील कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये पास झाल्यावर त्याला आयआयटी दिल्लीत प्रवेश मिळाला. पण वर्षभर अभ्यास करूनही त्याला यामध्ये रस वाटला नाही. ज्या ठिकाणी जावून अभ्यास करण्याचे स्वप्न विद्यार्थी पाहतात तेथे प्रवेश घेऊन वर्षभर अभ्यास केल्यानंतर कौशलने हा अभ्यास सोडला.

बी.टेक. करताना ठरवलं प्रशासकीय सेवेत जायचं
IIT दिल्ली सोडल्यानंतर कौशलने BITS पिलानीमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केले. इथून शिकूनही त्याने कॉलेज आणि अभ्यासक्रम एका वर्षानंतर (Career Success Story) सोडला. यानंतर शेवटी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.टेक. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याने देशसेवा करण्याचे ठरवले आणि शिक्षण सुरु असतानाच नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि संपूर्ण भारतातून 38 वी रॅंक मिळवली. यानंतर त्याने IDES (इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस) मध्ये पदभार स्वीकारला.

12 वर्षानंतर IAS ची नोकरी सोडली (Career Success Story)
गौरवने एसएससी सीजीएल (SSC CGL) परीक्षा पास केली आहे; पण या माध्यमातून मिळालेले पद त्यांनी स्वीकारले नाही. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश कसौली येथे सीईओ म्हणून काम केले. चंदीगडमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणून काम केले, जालंधरमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणूनही त्याने जबाबदारी पार पडली आहे. आपल्या सरकारी नोकरीत 12 वर्षे सेवा दिल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

गौरव सध्या काय करतात (Career Success Story
गौरव सध्या कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे. त्याचे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ आहेत. तो देशातील तरुण उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणे परीक्षेची रणनीती आणि (Career Success Story) फिटनेसवर व्लॉग करतो. गौरवने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर माहिती दिली आहे की तो UPSC CSE-2012 पास केलेला विद्यार्थी आहे. UPSC अभ्यासाचा अनुभव पाठीशी असल्याने तो स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. तसेच तरुण पिढी फिटनेस बाबत जागरूक रहावी; यासाठी तो व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा देत असतो. त्याने गौरव कौशल ॲप लाँच केले आहे; ज्या माध्यमातून UPSC इच्छुकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचे लग्न नॅन्सी लूम्बाशी झाले आहे. हे दोघेही एकमेकांना त्यांच्या कामात मदत करत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Unemployment Rate in India : भारतात बेरोजगारीचा भस्मासूर!! 83 टक्के तरुण बेरोजगार; महिलांचे प्रमाण जास्त

Unemployment Rate in India

करिअरनामा ऑनलाईन । देशातील वाढती बेरोजगारी म्हणजे (Unemployment Rate in India) न तोडगा निघणारा कळीचा मुद्दा. तरुणांमधील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या भारताच्या रोजगार अहवालांनुसार, देशातील 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

शहरी भागात जास्त बेरोजगारी (Unemployment Rate in India)
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) यांच्या अहवालानुसार, या सर्व बेरोजगार लोकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा 2000 मध्ये 54.2% होता, मात्र तोच आकडा 2022 मध्ये वाढून 65.7% झाला आहे. तसेच सध्या शिक्षित परंतु बेरोजगार तरुणांमध्ये, पुरुषांपेक्षा (62.2%) महिलांचे प्रमाण अधिक आहे (76.7%). या अहवालात असेही दिसून येते कि, भारतातील बेरोजगारीची समस्या तरुणांमध्ये, विशेषत: शहरी भागातील शिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 2000 ते 2019 पर्यंत तरुण रोजगार (Unemployment Rate in India) आणि अल्प बेरोजगारी वाढली, परंतु कोविड-19 महामारीच्या काळात त्यात घट झाली. 2000 मध्ये, एकूण रोजगार असलेल्या तरुण लोकसंख्येपैकी निम्मी स्वयंरोजगार होती, 13% नियमित नोकऱ्या होत्या, तर उर्वरित 37% लोकांना प्रासंगिक नोकऱ्या होत्या.

भारत पुढील १० वर्षात 70 ते 80 लाख तरुणांना आपल्या श्रमिक कर्मचाऱ्यांमध्ये सामील करेल आणि पुढे जाण्यासाठी 5 प्रमुख धोरणात्मक क्षेत्रे सुचवेल; यासाठी सर्वप्रथम
१. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे (Unemployment Rate in India)
२. रोजगाराच्या गुणवत्तेत सुधारणा करणे
३. श्रमिक बाजारातील असमानता संबोधित करणे
४. सक्रिय श्रमिक बाजार कौशल्ये आणि धोरणे दोन्ही मजबूत करणे
५. श्रमिक बाजार पद्धती आणि युवकांच्या रोजगारावरील ज्ञानातील अंतर भरून काढणे; या गोष्टींचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे.

शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न
शालेय शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी सरकारमार्फत (Educational Scholarship) गेल्या काही दशकांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलींना विविध शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. शालेय शिक्षण घेताना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी वरदान ठरत आहेत.

‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती’
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 7वीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा २५० रुपये प्रमाणे दहा महिन्यांसाठी २ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात (Educational Scholarship) येते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थीनिंनी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी (वर्ग-२), संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यांशी संपर्क करायचा आहे.

उत्पन्नाची किंवा गुणांची अट नाही (Educational Scholarship)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गतच ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी १९९६ पासून, तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी २००३ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी कोणतीही उत्पन्नाची किंवा गुणांची अट घालण्यात आली नाही. वर्षातून तीन वेळा ही शिष्यवृत्ती टप्प्या-टप्प्याने देण्यात येते.

इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थिनींना (Educational Scholarship) दरमहा तीनशे रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी देखील शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : 10 वी पास तसेच ग्रॅज्युएट्सना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक
भरले जाणारे पद – लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस
वय मर्यादा – 25 ते 35 वर्षे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी – Rs.1180/- + GST

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
लेखकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच Chartered Accountant पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य
सफाई कामगारकिमान शिक्षण १० वी पास, तसेच मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://punebankasso.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PAT Exam 2024 : PAT परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; राज्यभरात ‘या’ तारखेला होणार परीक्षा

PAT Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील (PAT Exam 2024) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयासाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन 1 घेण्यात आली आहे.

शासनामार्फत राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट दि. २ ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे. त्याचदरम्यान 2 एप्रिल रोजी नाथषष्ठीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाने सुटी जाहीर केलेली आहे. त्यामुळे दोन (PAT Exam 2024) तारखेला मुलांनी परीक्षा घ्यावी की, सुटी? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक बदलून आता दि. ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेच्या तारखेसह वेळही बदलली
दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ता. २ ते ४ एप्रिलदरम्यान राज्यभरातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार होती; परंतु दोन एप्रिलरोजी नाथषष्ठी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विभागीय आयुक्त कार्यालयाने सुटी जाहीर केली आहे. तसेच त्याच दिवशी म्हणजे दोन एप्रिलला तिसरी ते (PAT Exam 2024) सहावीसाठी ११ ते १२.३० वाजता; तर सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ ते १ यावेळेत प्रथम भाषेचा पेपर घेण्यात येणार होता. त्यामुळे दोन एप्रिलला परीक्षा घ्यायची की नाथषष्ठीनिमित्त मुलांना सुटी द्यायची? असा प्रश्न शाळांकडून विचारला जात होता. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. तसेच 2 तारखेचा पेपर पुढे ढकलण्यात यावा; अशी मागणीही शाळांनी वृत्तपत्र माध्यमातून केली होती. या वृत्ताची दखल घेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने २ ते ४ ऐवजी ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.

जुन्या वेळापत्रकानुसार चाचणी परीक्षेची वेळ दुपारी एक वाजेपर्यंत होती. मात्र, आता तारखेत बदल करण्यात आला असून चाचणी परीक्षा सकाळी 8 ते १० दरम्यान घेण्यात येणार आहे.

नवीन वेळापत्रक असे आहे – (PAT Exam 2024)
ता.४ एप्रिल – प्रथम भाषा
(सर्व माध्यमे)
तिसरी व चौथी – सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०

ता. ५ एप्रिल – गणित (सर्व माध्यमे)तिसरी व चौथी ः सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०

ता. ६ एप्रिल – इंग्रजी
तिसरी व चौथी – सकाळी ८ ते ९.३०
पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Supreme Court of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदासाठी अधिसूचना जारी

Supreme Court of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सहाय्यक निबंधक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सहाय्यक निबंधक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Supreme Court of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001
वय मर्यादा – 56 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Master’s or Bachelor’s degree in Computer Applications or B.E. in Computers or IT or B.Tech in Computers from a recognized University or equivalent
मिळणारे वेतन – Level 12 of the Pay Matrix with initial Basic Pay of Rs. 78800/- plus other allowances as admissible under the rules (approximate Gross Salary with HRA – Rs. 148586/- p.m.).

असा करा अर्ज – (Supreme Court of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच पाठवा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2024 : ITI पास ते डिग्रीधारक ‘या’ सरकारी नोकरीसाठी करु शकतात अर्ज; पहा तपशील

SAIL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत (SAIL Recruitment 2024) सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी [OHS], सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा), ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर], परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल], मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 108 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. सविस्तरपणे जाणून घेवूया रिक्त पदे, वय मर्यादा आणि अर्ज प्रक्रियेविषयी…

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, (SAIL Recruitment 2024) वैद्यकीय अधिकारी [OHS], सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा), ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर], परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल], मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 108 पदे
वय मर्यादा – 44 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 21 एप्रिल 2024
र्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

भरतीचा तपशील – (SAIL Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही (SAIL Recruitment 2024) माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जामध्ये माहिती संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटकी तारीख 07 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SAIL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.sail.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com