Career Success Story : एकामागोमाग एक अवघड परीक्षा पास केल्या; 12 वर्षानंतर IAS पदाचा राजीनामा; आता करतात ‘हे’ काम

करिअरनामा ऑनलाईन । UPSC, MPSC प्रमाणे दरवर्षी लाखो (Career Success Story) विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु काही मोजकेच तरुण त्यांचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात. आज आपण अशा एका तरुणाची कथा पाहणार आहोत; ज्याने एकामागोमाग एक अनेक कठीण परीक्षा पास केल्या आहेत. हा तरुण अगदी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. या तरुणाने आयआयटी दिल्लीमध्ये (IIT Delhi) प्रवेश घेतला, एक वर्ष बी.टेक शिकला, इथून बाहेर पडल्यानंतर बीआयटीएस पिलानीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. केले. इथूनही त्याने कॉलेज आणि कोर्स एका वर्षानंतर सोडला. यानंतर शेवटी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केले आणि नंतर तो आयएएस (IAS) झाला आणि तिथूनही त्याने पदाचा राजीनामा दिला. एकंदरीत या तरुणाचा करिअर ग्राफ कसा आहे? IAS पद सोडल्यानंतर सध्या हा तरुण काय करत आहे; ते पाहूया…

IIT मध्ये प्रवेश मिळवला (Career Success Story)
गौरव कौशल (IAS Gaurav Kaushal) हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण पंचकुला येथून झाले. गौरव कौशलने बारावीनंतर अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी JEE MAIN आणि ADVANCE परीक्षा दिली. ही परीक्षा देशातील कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये पास झाल्यावर त्याला आयआयटी दिल्लीत प्रवेश मिळाला. पण वर्षभर अभ्यास करूनही त्याला यामध्ये रस वाटला नाही. ज्या ठिकाणी जावून अभ्यास करण्याचे स्वप्न विद्यार्थी पाहतात तेथे प्रवेश घेऊन वर्षभर अभ्यास केल्यानंतर कौशलने हा अभ्यास सोडला.

बी.टेक. करताना ठरवलं प्रशासकीय सेवेत जायचं
IIT दिल्ली सोडल्यानंतर कौशलने BITS पिलानीमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केले. इथून शिकूनही त्याने कॉलेज आणि अभ्यासक्रम एका वर्षानंतर (Career Success Story) सोडला. यानंतर शेवटी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.टेक. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याने देशसेवा करण्याचे ठरवले आणि शिक्षण सुरु असतानाच नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि संपूर्ण भारतातून 38 वी रॅंक मिळवली. यानंतर त्याने IDES (इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस) मध्ये पदभार स्वीकारला.

12 वर्षानंतर IAS ची नोकरी सोडली (Career Success Story)
गौरवने एसएससी सीजीएल (SSC CGL) परीक्षा पास केली आहे; पण या माध्यमातून मिळालेले पद त्यांनी स्वीकारले नाही. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश कसौली येथे सीईओ म्हणून काम केले. चंदीगडमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणून काम केले, जालंधरमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणूनही त्याने जबाबदारी पार पडली आहे. आपल्या सरकारी नोकरीत 12 वर्षे सेवा दिल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

गौरव सध्या काय करतात (Career Success Story
गौरव सध्या कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे. त्याचे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ आहेत. तो देशातील तरुण उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणे परीक्षेची रणनीती आणि (Career Success Story) फिटनेसवर व्लॉग करतो. गौरवने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर माहिती दिली आहे की तो UPSC CSE-2012 पास केलेला विद्यार्थी आहे. UPSC अभ्यासाचा अनुभव पाठीशी असल्याने तो स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. तसेच तरुण पिढी फिटनेस बाबत जागरूक रहावी; यासाठी तो व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा देत असतो. त्याने गौरव कौशल ॲप लाँच केले आहे; ज्या माध्यमातून UPSC इच्छुकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचे लग्न नॅन्सी लूम्बाशी झाले आहे. हे दोघेही एकमेकांना त्यांच्या कामात मदत करत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com