Educational Scholarship : मुलगी शिकणार.. प्रगती होणार..!! शालेय मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षणातील मुलींच्या (Educational Scholarship) गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता 5वी ते 7 वीमधील मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीतील आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही शिष्यवृत्ती लागू केली आहे.

शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न
शालेय शिक्षणातील मुलींची गळती रोखण्यासाठी सरकारमार्फत (Educational Scholarship) गेल्या काही दशकांपासून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलींना विविध शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. शालेय शिक्षण घेताना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी वरदान ठरत आहेत.

‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती’
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 7वीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा २५० रुपये प्रमाणे दहा महिन्यांसाठी २ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात (Educational Scholarship) येते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थीनिंनी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी (वर्ग-२), संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यांशी संपर्क करायचा आहे.

उत्पन्नाची किंवा गुणांची अट नाही (Educational Scholarship)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गतच ही शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी १९९६ पासून, तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी २००३ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी कोणतीही उत्पन्नाची किंवा गुणांची अट घालण्यात आली नाही. वर्षातून तीन वेळा ही शिष्यवृत्ती टप्प्या-टप्प्याने देण्यात येते.

इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थिनींना (Educational Scholarship) दरमहा तीनशे रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी देखील शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com