Unemployment Rate in India : भारतात बेरोजगारीचा भस्मासूर!! 83 टक्के तरुण बेरोजगार; महिलांचे प्रमाण जास्त

करिअरनामा ऑनलाईन । देशातील वाढती बेरोजगारी म्हणजे (Unemployment Rate in India) न तोडगा निघणारा कळीचा मुद्दा. तरुणांमधील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या भारताच्या रोजगार अहवालांनुसार, देशातील 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

शहरी भागात जास्त बेरोजगारी (Unemployment Rate in India)
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट (IHD) यांच्या अहवालानुसार, या सर्व बेरोजगार लोकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा 2000 मध्ये 54.2% होता, मात्र तोच आकडा 2022 मध्ये वाढून 65.7% झाला आहे. तसेच सध्या शिक्षित परंतु बेरोजगार तरुणांमध्ये, पुरुषांपेक्षा (62.2%) महिलांचे प्रमाण अधिक आहे (76.7%). या अहवालात असेही दिसून येते कि, भारतातील बेरोजगारीची समस्या तरुणांमध्ये, विशेषत: शहरी भागातील शिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 2000 ते 2019 पर्यंत तरुण रोजगार (Unemployment Rate in India) आणि अल्प बेरोजगारी वाढली, परंतु कोविड-19 महामारीच्या काळात त्यात घट झाली. 2000 मध्ये, एकूण रोजगार असलेल्या तरुण लोकसंख्येपैकी निम्मी स्वयंरोजगार होती, 13% नियमित नोकऱ्या होत्या, तर उर्वरित 37% लोकांना प्रासंगिक नोकऱ्या होत्या.

भारत पुढील १० वर्षात 70 ते 80 लाख तरुणांना आपल्या श्रमिक कर्मचाऱ्यांमध्ये सामील करेल आणि पुढे जाण्यासाठी 5 प्रमुख धोरणात्मक क्षेत्रे सुचवेल; यासाठी सर्वप्रथम
१. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे (Unemployment Rate in India)
२. रोजगाराच्या गुणवत्तेत सुधारणा करणे
३. श्रमिक बाजारातील असमानता संबोधित करणे
४. सक्रिय श्रमिक बाजार कौशल्ये आणि धोरणे दोन्ही मजबूत करणे
५. श्रमिक बाजार पद्धती आणि युवकांच्या रोजगारावरील ज्ञानातील अंतर भरून काढणे; या गोष्टींचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com