CBIC Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना कस्टम्स विभागात सरकारी नोकरीची संधी; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त सहायक संचालक पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ
भरले जाणारे पद – अतिरिक्त सहायक संचालक
पद संख्या – 110 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (CBIC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002

मिळणारे वेतन – Rs. 47,600/- ते Rs. 1,51,100/- दरमहा
असा करा अर्ज – (CBIC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dgpm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com