Home Blog Page 127

ECIL Recruitment 2024 : 10 वी पास, ITI पास ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी

ECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (ECIL Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. 10 वी पास, ITI पास तसेच इंजिनियरिंगमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक या पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा (ECIL Recruitment 2024) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे. ही भरती म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी समजली जाते. जाणून घेवूया पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी…

संस्था – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक
पद संख्या – 44 पदे (ECIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद
वय मर्यादा – 25 वर्षे

भरतीचा तपशील – (ECIL Recruitment 2024)

पदपद संख्या 
तंत्रज्ञ (GR-II)30 पदे
उप. व्यवस्थापक तांत्रिक14 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ (GR-II)The applicant should have Matriculation / SSC or its equivalent plus ITI certificate (National Trade Certificate (NTC)) with National Apprentice Certificate (NAC) OR Matriculation/SSC or its equivalent plus ITI certificate (NTC) with one-year relevant experience in manufacturing processes as on last date of submission of online application. (ECIL Recruitment 2024)
उप. व्यवस्थापक तांत्रिकFirst Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in Computer Science/ Computer Science & Engineering. Applicants holding Cyber Security Certification such as CISSP, CISM, CEH, CCS will have added advantage.

मिळणारे वेतन –


पद
वेतन (दरमहा)
तंत्रज्ञ (GR-II)Rs.20,480/-
उप. व्यवस्थापक तांत्रिकi) Rs 16,400 – 40,500 (IDA) Post 01/01/2007 (pre-revised pay scale).
ii) Rs 40,000 – 1,40,000 (IDA) Post 01/01/2017 (Revised pay scale).
iii) Rs 47,600 – 1,51,100 (Level 8) (Revised).

असा करा अर्ज – (ECIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. तंत्रज्ञ (GR-II) – APPLY
2. उप. व्यवस्थापक तांत्रिक – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : नोकरीचा नादच नाही केला!! हायटेक शेती करुन करते लाखोंची कमाई

Career Success Story of Anushka Jaiswal

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे (Career Success Story) राहणारी 27 वर्षीय अनुष्का जी जैस्वाल (Anushka Jaiswal) हिने दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, परंतु इतरांप्रमाणे तिला नोकरी करायची नव्हती… वेगळे काहीतरी करण्याच्या नादातून तिने भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती वर्षाला तब्बल 45 लाख रुपये कमावत आहे.

अलिकडच्या काळात तरुण शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग (Career Success Story) करताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेतात. पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील शेतात काम करतात. भाडेतत्वार जमिन घेऊन भरघोस उत्पादन घेणाऱ्या एका तरुणीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. अनुष्का जैस्वाल असं तिचं नाव असून, तिनं तिच्या शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात. यातून अनुष्का जैस्वाल वार्षिक 45 लाख रुपयांचा नफा मिळवत आहे.

दिल्ली विद्यापीठातून घेतले शिक्षण (Career Success Story)
अनुष्का दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) उत्तीर्ण झाली आहे. यानंतर नोकरीच्या मागे न धावता तिने यशस्वी शेती सुरु केली आहे. यातून ती मोठा नफा मिळवत आहे. उत्तर प्रदेशातील महिला आता पुरुषांच्या बरोबरीने विविध व्यवसायात बाजी मारत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो, शेती असो वा कोणतेही क्षेत्र असो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. यापैकीच एक तरुणी आहे अनुष्का जैस्वाल….

वयाच्या 23 व्या वर्षी सुरु केली शेती
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने चांगला अभ्यास करुन शिक्षण पूर्ण केले; पण शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी तिने शेतीचा मार्ग (Career Success Story) निवडला. आज ती दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक नफा कमावत आहे; 20 हून अधिक लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.

भाड्याने जमीन घेवून पॉली हाऊस उभारले (Career Success Story)
2021 मध्ये अनुष्काने लखनऊच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन भाडेतत्वार घेऊन शेती करायला सुरुवात केली. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून तिने अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. कृषी क्षेत्रातील शिक्षण न घेवून सुध्दा तिने शेती करण्याचं धाडस करुन दाखवलं आहे; कारण आपण काहितरी वेगळं करायचं असं तिने ठरवलंच होतं. सरकारकडून मदत घेऊन तिने एक एकरावर पॉली हाऊस सुरु केले. आता ती आणखी 6 एकर शेती करत आहे. जिथे सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या पिकतात. यातून तिला भरपूर नफाही मिळत आहे.

शेतीत नक्की काय करते अनुष्का (Career Success Story)
कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे घेता येईल; हे अनुष्काने दाखवून दिले आहे. परिस्थिती अशी होती की एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन होते. तर लाल पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीला दर चांगला मिळत आहे. लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे. आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे ही महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने (Career Success Story) हिरव्या भाज्यांची लागवड करते. तिला फलोत्पादन विभागाकडून ‘ड्रॉप मोअर पीक’ अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळं भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पिकांवर अधिक लक्ष देऊ शकलो; असं ती सांगते.

अशी केली सुरुवात
अनुष्काच्या कुटुंबाला कसलीही शेतीची पार्श्वभूमी नाही. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीनही नव्हती. अशा परिस्थितीत अनुष्काने मोठे धाडस केले. तिने प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. यातून नफा मिळवल्यानंतर तीन एकर जमीन घेतली. त्यानंतर योग्य प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. तिच्या शेतात (Career Success Story) पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात. त्यामुळे तिला सातत्याने नफा मिळत आहे. आपल्या कुटुंबाविषयी बोलताना अनुष्का सांगते; “माझे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. तर माझा भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत; आणि मी शेती करते आणि अनेक गरजूंना रोजगार देते.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pavan Davuluri : भारताशी खास नातं असलेले पवन दावूलुरी बनले Microsoft Windows चे प्रमुख

Pavan Davuluri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या (Pavan Davuluri) यादीत आणखीन एका भारतीय व्यक्तीने स्थान मिळवले आहे. सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्या नंतर आता IIT मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावूलुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोजचे (Microsoft Windows) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दावूलुरी यांनी पॅनोस पानय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 2023 मध्ये ऍमेझॉनमध्ये सामील होण्यासाठी पनयने मायक्रोसॉफ्ट विंडोजचे प्रमुख म्हणून आपले पद सोडले होते. पवन दावुलुरी हे केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोजच्याच नव्हे तर सरफेसच्याही प्रमुखपदाची जबाबदारी पेलणार आहेत.

उच्च शिक्षित आहेत पवन दावूलुरी (Pavan Davuluri)
मीडिया रिपोर्टनुसार, दावूलुरी यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे. दावूलुरी हे मायक्रोसॉफ्टशी 23 वर्षांहून अधिक काळापासून जोडलेले आहेत. त्यांनी आयआयटी मद्रास (IIT Madras) नंतर मेरीलँड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. या नवीन जबाबदरीसह, पवन दावुलुरी हे सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्याप्रमाणेच USमधील टेक कंपन्यांतील भारतीय नेत्यांच्या गटाचा भाग बनले आहेत.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत मेलमध्ये पवन दावूलुरीबद्दल माहिती देताना, मायक्रोसॉफ्टच्या डिव्हाइस विभागाचे प्रमुख राजेश झा म्हणाले की, पवन दावूलुरी यांनी (Pavan Davuluri) पदभार स्वीकारल्यानंतर, आम्ही नवीन एआय युगासाठी विंडोज क्लायंट आणि क्लाउड टूल्स तयार करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन घेण्यास सक्षम होऊ.”

मायक्रोसॉफ्टमध्ये 23 वर्षांहून अधिक काळ काम
मायक्रोसॉफ्टमध्ये 23 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या दावूलुरी (Pavan Davuluri) यांनी यापूर्वी सरफेस सिलिकॉन आणि उपकरणे व्यवस्थापित केली होती, तर मिखाईल पारखिन यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीमने विंडोज आणि वेब अनुभवांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांचा सानुकूल पृष्ठभाग प्रोसेसर तयार करण्यासाठी Qualcomm आणि AMD सह कंपनीच्या कामात सखोल सहभाग होता.
Davuluri ने 2001 मध्ये रिलायबिलिटी कंपोनंट मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्टचा कार्यकाळ सुरू केला आणि 2005 पर्यंत ते त्यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार सरफेस टीमचे जनरल मॅनेजर होते. ऑक्टोबर 2023 मध्ये Windows + Devices टीमच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षपदी त्यांची पदोन्नती मायक्रोसॉफ्टच्या धोरणात्मक नेतृत्वातील बदलांना अधोरेखित करते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Police Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या (Police Bharti 2024) तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुदतीत आता वाढ करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. मराठा आरक्षणासाठी उमेदवारांना लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र (SEBC Certificate) मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची (Police Bharti 2024) पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा; मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहेत; असं सांगण्यात आलं आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Police Bharti 2024)
महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता 12 वी किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उमेदवाराने उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –
1) SSC, HSC पास प्रमाणपत्र
2) जन्मतारखेचा दाखला
3) रहिवाशी प्रमाणपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र (Police Bharti 2024)
5) जात-वैधता प्रमाणपत्र,
6) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
7) खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती
(शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे)
8) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रः (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. ०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र.४ नुसार)

9) माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
10) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
(जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल)
11) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
12) भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
13) पोलीस पाल्य प्रमाणपत्र (असल्यास)
14) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
15) अंशकालीन प्रमाणपत्र (Police Bharti 2024)
16) इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र
17) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे

राज्यातील खालील ठिकाणी पोलीस भरती होणार आहे – बृहन्मुंबई आयुक्तालय, ठाणे आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, मिरा-भाईंदर आयुक्तालय, नागपूर आयुक्तालय, नाशिक आयुक्तालय, नवी मुंबई आयुक्तालय, अमरावती आयुक्तालय, सोलापूर आयुक्तालय, छ. संभाजीनगर आयुक्तालय, (Police Bharti 2024) लोहमार्ग-मुंबई आयुक्तालय, ठाणे ग्रामीण जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, सिंधुदूर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा, अहमदनगर जिल्हा, जळगांव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे ग्रा. जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर ग्रा. जिल्हा, छ. संभाजीनगर ग्रा. जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नागपूर ग्रा. जिल्हा, भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती ग्रा. जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लोहमार्ग-पुणे जिल्हा, लोहमार्ग औरंगाबाद जिल्हा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DCPW Recruitment 2024 : समन्वय पोलीस वायरलेस संचालनालय अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; जणून घ्या अर्ज प्रक्रिया

DCPW Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत (DCPW Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे. भरती जाहीर झाल्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता.

या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीची अधिसूचना जारी झालेल्या तारखेपासून 60 दिवसापर्यंत म्हणजेच दि. 26 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

संस्था – समन्वय पोलीस वायरलेस संचालनालय (DCPW Recruitment 2024)
भरली जाणारी पदे – सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024 (अधिसूचना जारी झाल्यापासून 60 दिवसाच्या आत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), DCPW” ब्लॉक 9, CGO, कॉम्प्लेक्स, लोध रोड, नवी दिल्ली-110003
वय मर्यादा – 56 वर्षे

भरतीचा तपशील – (DCPW Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक विभाग अधिकारी01
संपर्क अधिकारी (Cy)02
संपर्क अधिकारी10

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहाय्यक विभाग अधिकारीLevel 7 (Rs.44900-142400)
संपर्क अधिकारी (Cy)Level 7 (Rs.44900-142400)
संपर्क अधिकारीLevel 7 (Rs.44900-142400)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. (DCPW Recruitment 2024)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (DCPW Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://dcpw.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAMEER Recruitment 2024 : SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी

SAMEER Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक (SAMEER Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च म्हणजेच SAMEER येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी E-Mail/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सल्लागार (प्रशासन/खाते/खरेदी) – 03 पदे
आवश्यक पात्रता – कार्मिक आणि प्रशासन, खरेदी, खाती आणि आर्थिक बाबींचा अनुभव. सरकारी/स्वायत्त संस्थांमधून प्रशासन/लेखा अधिकारी किंवा समकक्ष किंवा त्याहून अधिक पदावर निवृत्त झालेले असावे.
2. सल्लागार (तांत्रिक) – 01 पद
आवश्यक पात्रता – इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग आणि सिव्हिलशी संबंधित तांत्रिक बाबी हाताळण्याचा अनुभव, वेतन स्तर 07 किंवा त्यावरील अनुभवासह सेवेतून निवृत्त झालेले असावे.
पद संख्या – 04 पदे

अर्ज करण्याची पद्धत – E-Mail /ऑफलाईन (SAMEER Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research, IIT Campus, Hill Side, Powal, Mumbai – 400076
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी, 64 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई , चेन्नई, कोलकाता.

काही महत्वाच्या लिंक्स – (SAMEER Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्जामध्ये बदल करता येणार; दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडियाकडून मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार 27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम यामध्ये बदल करू शकतात. मे 2024 च्या CA परीक्षांसाठी आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी, परीक्षा शहर, गट आणि माध्यम बदलण्यासाठी ऑनलाइन विनंती पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ICAI कडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थी या वेळेत करु शकतात बदल (ICAI CA Exam 2024)
नोटीसमध्ये म्हटले आहे की, सीए इंटरमिजिएट आणि फायनल मे परीक्षा उमेदवार ज्यांना परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम बदलायचे आहेत ते उमेदवार येत्या 27 मार्च रोजी सकाळी 10 ते 29 मार्च रात्री 11:59 वाजेपर्यंत बदल करू शकतात.
लोकसभानिवडणुकांच्या घोषणेनंतर ICAI ने CA फायनल आणि (ICAI CA Exam 2024) इंटरमीडिएट मे 2024 च्या डेट शीटमध्ये सुधारणा केली होती. सुधारित वेळापत्रकानुसार, इंटरमिजिएट ग्रुप 1 च्या परीक्षा 7 मे ऐवजी 3, 5 आणि 9 मे रोजी आणि ग्रुप 2 च्या परीक्षा 9, 11 आणि 13 मे ऐवजी 11, 15 आणि 17 मे रोजी होतील. 16 मे ऐवजी 2, 4 आणि 8 मे रोजी होणार आहे. सीए फायनल ग्रुप 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे ऐवजी 10, 14 आणि 16 मे रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : तुम्ही खूप अभ्यास केला असेल तर ‘या’ प्रश्नांची उत्तरे सांगू शकाल?

GK Updates 25 Mar

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- ओखला पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
पंजाब
दिल्ली
बिहार (GK Updates)
केरळा
उत्तर- दिल्ली
प्रश्न- कोणते राज्य ‘पाच नद्यांची भूमी’ म्हणून ओळखले जाते?
पंजाब
हरियाणा
राजस्थान
उत्तर प्रदेश
उत्तर- पंजाबला ‘पाच नद्यांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. बियास, झेलम, चिनाब, रावी आणि सतलज या पाच नद्या आहेत.

प्रश्न- जलेप ला पास कुठे आहे?
सिक्कीम (GK Updates)
मणिपूर
हिमाचल प्रदेश
जम्मू
उत्तर- तिस्ता नदीने बांधलेला जलेप ला पास सिक्कीममध्ये आहे, जो सिक्कीमला भूतानला जोडतो.
प्रश्न- भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
दल सरोवर
सांभार तलाव
वुलर तलाव
लोकतक तलाव
उत्तर- जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात स्थित वुलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.

प्रश्न- कोणत्या (GK Updates) ग्रहाचा दिवस सर्वात कमी असतो?
पारा
शुक्र
शनि
बृहस्पति
उत्तर- बृहस्पति
प्रश्न- मानव विकास अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला?
ऍम्नेस्टी इंटरनॅशनल
रेड क्रॉस
जागतिक बँक
संयुक्त राष्ट्र (UN)
उत्तर-संयुक्त राष्ट्रे

प्रश्न- गारो हिल्स खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?
मिझोराम
आसाम
मेघालय (GK Updates)
त्रिपुरा
उत्तर- गारो हिल्स हा मेघालयमध्ये स्थित एक डोंगराळ प्रदेश आहे, जो जंगले, धबधबे आणि नद्यांसह नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10वी/12 वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत मोठी भरती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती (Railway Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करावा; असं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी देशातील तरुण-तरुणी नेहमीच भरती प्रक्रिया जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असतात; अशा उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. या भरतीसाठी 10वी, 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Railway Recruitment 2024) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे. जाणून घेवूया रिक्त पदे, आवश्यक पात्रता, भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 733 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे (Railway Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2024)

No.Trade NameTotal
1Carpenter38
2COPA100
3Draftsman (Civil)10
4Electrician137
5Elect (Mech)05
6Fitter187
7Machinist04
8Painter42
9Plumber25
10Mech (Rac)15
11SMW04
12Steno (English)27
13Steno (Hindi)19
14Diesel Mechanic12
15Turner04
16Welder18
17Wireman80
18Chemical Laboratory Asst04
19Digital Photographer02

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2024)
Applicants should have completed 10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks. They should also possess a National Trade Certificate (NTC) in the relevant trade issued by the National Council for Vocational Training (NCVT)
वय मर्यादा –
The minimum age limit is 15 years, and the maximum age limit varies between 24 to 25 years, depending on the trade, with relaxation provided for reserved categories as per government norms.

मिळणारे वेतन –
The period of apprenticeship and stipend – Selected candidates will be engaged as apprentices and they will undergo apprenticeship (Railway Recruitment 2024) training for a period of Iyear for each trade. They will be paid stipend during their training as per the rules of State Government of Chhattisgarh. Their training will be terminated after the completion of their apprenticeship.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://secr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी दिल्ली पोलिसात PSI होण्याची मोठी संधी; अर्जासाठी उरले काहीच दिवस

SSC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस खात्यात अधिकारी होणं हे अनेक (SSC Recruitment 2024) तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकजण आपलं नशीब आजमावत असतात. अशा तरुणांसाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने PSI पदाच्या 4,187 पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्यासाठी दि. 28 मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे; असं आवाहन करण्यात आलं आहे.

संस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशन
भरले जाणारे पद – सब इन्सपेक्टर, दिल्ली पोलीस आणि CAPF
परीक्षा फी – 100 रुपये (SSC Recruitment 2024)
(महिला अनुसूचित जाती जमाती तसेच माजी सैनिकांना परीक्षा फी नाही)
भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा – (SSC Recruitment 2024)
1. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 04-03-2024
2. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28-03-2024
3. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 28-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
4. ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 29-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
5. अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख – 30-03-2024 ते 31-03-2024 (रात्री 11 वाजेपर्यंत)
6. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक – 9, 10 आणि 13 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे.
आवश्यक वय मर्यादा – (SSC Recruitment 2024)
1. किमान वय – 20 वर्षे
2. कमाल वय – 25 वर्षे
(अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 02.08.1999 च्या आधीचा आणि 01.08.2004 या तारखेनंतर नसावा.)

भरतीचा तपशील –
1. दिल्ली पोलीस पोलीस उपनिरीक्षक पुरूष – 125 पदे
2. दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला – 61 पदे
3. CAPF मध्ये पोलीस उपनिरीक्षक – 4001 पदे

शारीरिक पात्रता –
पुरुष उमेदवारांसाठी –
1. 100 मीटर शर्यत – 16 सेकंदात
2. 1.6 किलोमीटर धावणे – 6.5 मिनिटांत
3. लांब उडी – 3 संधींमध्ये 3.65 मीटर
4. उंच उडी – 3 प्रयत्नांत 1.2 मीटर.
5. गोळा फेक (16 पौंड) – 3 प्रयत्नांमध्ये 4.5 मीटर.
महिला उमेदवारांसाठी –
1. 100 मीटर शर्यत – 18 सेकंदात
2. 800 मीटर शर्यत – 4 मिनिटांत (SSC Recruitment 2024)
3. लांब उडी – 3 संधींमध्ये 2.7 मीटर
4. उंच उडी – 0.9 मीटर 3 संधींमध्ये
(महिला उमेदवारांसाठी छातीच्या मोजमापाची किमान आवश्यकता नसेल)

सर्व पदांसाठी वैद्यकीय मानके अशी आहेत –
1. डोळ्याची दृष्टी : किमान जवळची दृष्टी N6 (चांगली नजर) आणि N9 (खराब नजर) असावी.
2. दोन्ही डोळ्यांची किमान अंतर दृष्टी 6/6 (चांगली नजर) आणि 6/9 (खराब नजर) असावी.
काही महत्वाच्या लिंक्स – (SSC Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com