Home Blog Page 120

MHT CET 2024 : महत्वाची अपडेट!! B.A.,B.Sc., B.Ed. च्या CET परीक्षांसाठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

MHT CET 2024
xr:d:DAF2TZni6GE:1459,j:6657870466400136614,t:24040910

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य (MHT CET 2024) सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra State Common Entrance Test) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या B.A/B.Sc-B.Ed अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेकरीता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; पण आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात.

दरम्यान विद्यार्थी आणि पालकांकडून बी.ए/बी.एस्सी-बी.एड अभ्यासक्रमाच्या (MHT CET 2024) सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून बी.ए/बी.एस्सी-बी.एड (4 वर्ष एकात्मिक) सीईटी २०२४ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; असे सीईटी सेलने (CET Cell) परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

18 मे ला होणार परीक्षा (MHT CET 2024)
बी.ए/बी.एस्सी-बी.एड साठी परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती, आता ही मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. तर परीक्षा येत्या १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
असा करा अर्ज –
1. सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
2. होम पेजवर दिलेला MAH बी.ए/बी.एस्सी-बी.एड CET 2023 टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा.
3. नवीन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल तर इतरांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
4. महत्त्वाची ओळखपत्रे भरून (MHT CET 2024) फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा.
5.आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी; पहा एप्रिलमध्ये कोणकोणत्या विभागात होणार भरती

Government Job
xr:d:DAF2TZni6GE:1453,j:6193999699964979461,t:24040908

करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखो तरुण सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी धडपड करत असतात. बहुतेक तरुण उमेदवार यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, रेल्वे, मेट्रो, एसएससी, सरकारी बँक इत्यादींच्या वेबसाइटवर सरकारी भरतीच्या सूचना तपासत असतात. सरकारी नोकऱ्या शोधणारे तरुण या महिन्यात एसएससी जेई, यूपी मेट्रो व्हेकन्सी, बँक ऑफ इंडियामधील सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पुढील काही महिने महत्वाचे असणार आहेत. अनेक केंद्रीय विभागांमध्ये तसेच राज्य स्तरावर रिक्त पदांची घोषणा होणार आहे. तुम्हाला (Government Job) ज्या विभागामध्ये काम करायचे आहे त्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही सरकारी भरतीची अधिसूचना पाहू शकता. एप्रिल 2024 मध्ये सरकारी नोकऱ्यांचे पर्याय कुठे उपलब्ध होतील ते जाणून घेवूया…

SSC CHSL भरती (SSC CHSL Recruitment 2024)
कर्मचारी निवड आयोग दरवर्षी एकत्रित उच्च माध्यमिक स्तरावर भरती परीक्षा आयोजित करते. एसएससी सीएचएसएल परीक्षा पास केल्यानंतर 12वी पास तरुण भारत सरकारच्या गट क आणि गट ब (अराजपत्रित) मध्ये नोकरी मिळवू शकतात. SSC परीक्षा कॅलेंडर 2024 नुसार, SSC CHSL 2024 अधिसूचना एप्रिलमध्ये ssc.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. SSC CHSL 2024 परीक्षा जून-जुलै 2024 मध्ये होईल.

बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरी (Government Job)
बँक ऑफ इंडिया (BOI) ने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना (Government Job) जारी केली आहे. सरकारी बँकांमधील नोकऱ्यांसाठी तुम्ही एकूण 143 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. बँक ऑफ इंडिया 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. बँक ऑफ इंडियाने परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

SSC JE भरती 2024 (SSC JE Recruitment 2024)
एसएससी कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध सरकारी विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांसाठी एसएससी जेई परीक्षेद्वारे भरती केली जाईल. SSC कनिष्ठ अभियंता सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. SSC JE फॉर्म 2024 18 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपर्यंत भरता येईल. तर, 19 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन फी भरता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : ICICI बँकेतील नोकरी सोडून दिली UPSC; मुलाला माहेरी ठेवून केला अभ्यास; देशात ठरली टॉपर

UPSC Success Story of IAS Anu Kumari
xr:d:DAF2TZni6GE:1447,j:2818551772155559937,t:24040907

करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (UPSC Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या प्रयत्नात यश मिळवून त्यांनी हे दाखवून दिले की तुमची मेहनत ही कशावरही अवलंबून नसते. प्रशासकीय सेवेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षे स्वतःपासून दूर ठेवले होते. जाणून घ्या IAS अनु कुमारीची यशोगाथा….

अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
IAS अनु कुमारी यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1986 रोजी हरियाणातील सोनीपत येथे हिंदू जाट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलजीत सिंग आणि आईचे नाव संट्रो देवी आहे. अनु कुमारीला (UPSC Success Story) एक लहान बहीण आणि दोन भाऊ (IAS Anu Kumari Family) देखील आहेत. अनु कुमारी लहानपणापासून तिच्या अभ्यासाबाबत खूप जगरुक होत्या. त्यांनी चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.

अनु कुमारी किती शिकल्या
IAS अनु कुमारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिव शिक्षा सदन, सोनीपत येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात B.Sc ऑनर्स पदवी मिळवली. त्यांचा शिक्षणाचा प्रवास इथेच थांबला नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयएमटी नागपूरमधून (IMT Nagpur) एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.

ICICI बँकेत 9 वर्षे केली नोकरी (UPSC Success Story)
एमबीए केल्यानंतर IAS अनु कुमारी यांनी मुंबईतील ICICI बँकेच्या शाखेत काम करायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी गुरुग्राम येथील नामांकित व्यापारी वरुण दहिया यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनु गुरुग्रामला स्थायिक झाल्या. जवळपास 9 वर्षे नोकरी केल्यानंतर अनु यांनी प्रशासकीय सेवेत सामील होण्यासाठी तयारी सुरू केली. नोकरी मिळवून त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्या असल्या तरी सार्वजनिक सेवेत काम करण्याची त्यांची दीर्घकाळापासून इच्छा होती. म्हणूनच 2016 मध्ये त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसल्या होत्या.

अभ्यासासाठी मुलाला स्वतःपासून दूर ठेवले
UPSC परीक्षेची तयारी करत असताना अनु कुमारी यांचा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा होता. मुलाचा सांभाळ करत यूपीएससी परीक्षेची तयारी करणे तसे अवघड होते. म्हणून त्यांनी आपल्या (UPSC Success Story) मुलाला दोन वर्षांसाठी स्वतःपासून दूर त्यांच्या माहेरी आईकडे पाठवले. अनु यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले. 2017 मध्ये, अनु कुमारी यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला.

यशाच्या मार्गात आले अनेक अडथळे
ICICI बँकेतील नोकरी सोडून ते UPSC मध्ये पास होण्यापर्यंतचा प्रवास अनु यांच्यासाठी सोपा नव्हता. या मार्गात अनेक अडथळे आले. अभ्याससाठी जवळपास दोन वर्षे आपल्या मुलाला स्वतःपासून दूर ठेवून त्यांनी मोठी हिंमत दाखवली. मुलापासून दूर राहण्याचे दु:ख सहन करणाऱ्या अनु कुमारीने अभ्यासात येणाऱ्या अनेक आव्हानांचा धैर्याने सामना केला. या अडथळ्यांना न जुमानता त्यांनी त्यांची तयारी सुरू ठेवली. पण दुर्दैवाने (UPSC Success Story) परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता त्या शिकत राहिल्या. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा मोठ्या मार्कने पास केली. यावेळी त्यांना संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक मिळाला आणि त्या IAS अधिकारी बनल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : स्पर्धा परीक्षेत विचारले जातात असे ऐतिहासिक अभ्यासावर प्रश्न

GK Updates
xr:d:DAF2TZni6GE:1439,j:8382749040892144322,t:24040814

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे?
उत्तर –
त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
प्रश्न 2 – नंद घराण्याची स्थापना कोणी केली?
उत्तर –
नंद वंशाची स्थापना (GK Updates) महापद्मानंद यांनी केली होती.

प्रश्न 3 – मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती हे सांगू शकाल का?
उत्तर –
वास्तविकपणे मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.
प्रश्न 4 – दिलवाड्याचे चालुक्य मंदिर कोठे आहे?
उत्तर –
दिलवाड्याचे चालुक्य मंदिर राजस्थानच्या माउंट अबू येथे आहे.

प्रश्न 5 – (GK Updates) हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर –
हैदराबाद मुशी नदीच्या काठावर वसलेले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : लोकसभा निवडणुकांमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती परीक्षांच्या तारखेत बदल

Big News
xr:d:DAF2TZni6GE:1437,j:914654956128351286,t:24040814

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती (Big News) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या JE, CHSL, CPO, आणि भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. SSC ने यावर्षी विविध भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने 8 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या नोटीसमधील परीक्षा वेळापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता JE परीक्षा 2024 चा पहिला टप्पा अर्थात पेपर 1 (CBE) आता 5, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येणार आहे; यापूर्वी ही परीक्षा 4, 5 आणि 6 जूनला होणार होती.

अशा आहेत परीक्षेच्या सुधारीत तारखा
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर SSC (SSC) परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. विविध निवड पोस्ट फेज 12, 2024 परीक्षेचा पहिला टप्पा पेपर 1 (CBE) आता 24, 25 आणि 26 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी यापूर्वी 6, 7 आणि 8 मे या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. SSC ने 27, 28 आणि 29 जून रोजी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दल (CAPFs) सब-इन्स्पेक्टर परीक्षा 2024 चा पहिला टप्पा म्हणजेच पेपर 1 (CBE) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही परीक्षा 9, 10 आणि 13 मे रोजी होणार होती.

CBE परीक्षा पेपर 1 ची तारीख जाहीर (Big News)
दुसरीकडे, स्टाफ सिलेक्शन कमिशनने CBE परीक्षा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील पेपर 1 ची तारीख देखील जाहीर केली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार, ही परीक्षा 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 11 आणि 12 जुलै 2024 रोजी घेतली जाईल. या अगोदर या परीक्षा आयोजित करण्याच्या निश्चित तारखा जाहीर केलेल्या नव्हत्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2024 : DRDO नाशिक अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी; पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएट

DRDO Recruitment 2024
xr:d:DAF2w5xVX7c:266,j:6459711996590401949,t:24040813

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरीच्या (DRDO Recruitment 2024) शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. DRDO अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक अंतर्गत ‘शिकाऊ’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 41 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – DRDO अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक
भरले जाणारे पद – शिकाऊ
पद संख्या – 41 पदे (DRDO Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
Email ID – [email protected].

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DRDO Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार (डिप्लोमा) साठी राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर (www.mhrdnats.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांनी अर्ज [email protected]. या Email ID वर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची (DRDO Recruitment 2024) तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
5. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICSI Recruitment 2024 : कंपनी सेक्रेटरी पदावर सरकारी नोकरी.. मिळवा भरघोस पगार; जाणून घ्या पात्रता

ICSI Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1434,j:6278442107171358853,t:24040812

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कंपनी सचिवांची या (ICSI Recruitment 2024) संस्थेअंतर्गत ‘सीआरसी कार्यकारी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

संस्था – भारतीय कंपनी सचिवांची संस्था
भरले जाणारे पद – सीआरसी कार्यकारी (COMPANY SECRETARY)
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
वय मर्यादा – 31 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ICSI Recruitment 2024)
Candidate should have Member of The Institute of Company Secretaries of India
मिळणारे वेतन – Rs.40,000/- to Rs.60,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाथी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या (ICSI Recruitment 2024) तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.icsi.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CCI Recruitment 2024 : भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 2 लाखांपेक्षा जास्त पगार

CCI Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1430,j:678215965518607475,t:24040811

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध (CCI Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक कर्मचारी, प्रशासन. कर्मचारी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 आहे.

संस्था – भारतीय स्पर्धा आयोग
भरले जाणारे पद –
1. व्यावसायिक कर्मचारी
2. प्रशासन कर्मचारी
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जे.टी. संचालक (HR), भारतीय स्पर्धा आयोग, 9वा मजला, ऑफिस ब्लॉक-1, किडवाई नगर (पूर्व), नवी दिल्ली-110023

भरतीचा तपशील – (CCI Recruitment 2024)

पदपद संख्या 
व्यावसायिक कर्मचारी04
प्रशासन. कर्मचारी05

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CCI Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यावसायिक कर्मचारीMaster’s Degree
प्रशासन. कर्मचारीBachelor’s Degree in Computer Science

मिळणारे वेतन –

पदवेतन
व्यावसायिक कर्मचारीLevel 14 (Rs.144200-218200) – Level 13A (Rs.131100-216600)
प्रशासन. कर्मचारीLevel 13 (Rs.123100-215900) – Level 7 (Rs.44900-142400)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक (CCI Recruitment 2024) कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
शुद्धिपत्र जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.cci.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ACTREC Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना ‘इथे’ आहे नोकरीची मोठी संधी; दरमहा 40 हजार पगार

ACTREC Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1426,j:8382749026814594564,t:24040811

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे विविध रिक्त पदे (ACTREC Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. फायरमन, सब ऑफिसर (फायर) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. केवळ 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. फायरमन / Fireman (ACTREC Recruitment 2024)
पात्रता – उमेदवार अग्निशमन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. सब ऑफिसर (फायर) / Sub Officer (Fire)
पात्रता – ‘सब ऑफिसर’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखत (ACTREC Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2024
मुलाखतीचा पत्ता – 3rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 23,800/- रुपये ते 40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (ACTREC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
फायरमन – PDF 1
सब ऑफिसर PDF 2
अधिकृत वेबसाईट – www.actrec.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Strathclyde Scholarship : ब्रिटीश विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना देतंय 10 लाखाची स्कॉलरशीप; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Strathclyde Scholarship
xr:d:DAF2TZni6GE:1423,j:5573628749843320292,t:24040809

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्याचे (Strathclyde Scholarship) स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम (UK) च्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेने अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, भारत, थायलंड आणि मलेशियातील विद्यार्थ्यांना तब्बल 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि यूकेच्या ४९ विद्यापीठांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ग्रेट स्कॉलरशिप प्रोग्रामचा एक भाग आहे. या माध्यमातून भारत, मलेशिया आणि थायलंडसह विविध देशांतील विद्यार्थ्यांना यूकेमध्ये उच्च शिक्षण घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.

ब्रिटनचे ‘स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठ’ (Strathclyde University) भारतीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी मधील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देत ​​आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि यूकेच्या ४९ विद्यापीठांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ग्रेट स्कॉलरशिप प्रोग्रामचा एक भाग आहे.

मिळणार 10 लाखाची स्कॉलरशिप (Strathclyde Scholarship)
अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 10,000 पौंड म्हणजेच 10 लाख रुपयांच्या समतुल्य शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा लागेल. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांकडे भारत, मलेशिया किंवा थायलंडचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे 2024 आहे.

कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळणार शिष्यवृत्ती
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, शिष्यवृत्तीसाठी बायोमेडिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग, डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग आणि (Strathclyde Scholarship) इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर, ओशन ॲण्ड मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल ही क्षेत्रे आहेत. अभियांत्रिकी, सिव्हिल वनला अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, नवीकरणीय ऊर्जा इत्यादी कोणत्याही विषयात पीजीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com