GK Updates : स्पर्धा परीक्षेत विचारले जातात असे ऐतिहासिक अभ्यासावर प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे?
उत्तर –
त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे.
प्रश्न 2 – नंद घराण्याची स्थापना कोणी केली?
उत्तर –
नंद वंशाची स्थापना (GK Updates) महापद्मानंद यांनी केली होती.

प्रश्न 3 – मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती हे सांगू शकाल का?
उत्तर –
वास्तविकपणे मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.
प्रश्न 4 – दिलवाड्याचे चालुक्य मंदिर कोठे आहे?
उत्तर –
दिलवाड्याचे चालुक्य मंदिर राजस्थानच्या माउंट अबू येथे आहे.

प्रश्न 5 – (GK Updates) हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
उत्तर –
हैदराबाद मुशी नदीच्या काठावर वसलेले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com