Strathclyde Scholarship : ब्रिटीश विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना देतंय 10 लाखाची स्कॉलरशीप; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्याचे (Strathclyde Scholarship) स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम (UK) च्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेने अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, भारत, थायलंड आणि मलेशियातील विद्यार्थ्यांना तब्बल 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि यूकेच्या ४९ विद्यापीठांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ग्रेट स्कॉलरशिप प्रोग्रामचा एक भाग आहे. या माध्यमातून भारत, मलेशिया आणि थायलंडसह विविध देशांतील विद्यार्थ्यांना यूकेमध्ये उच्च शिक्षण घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.

ब्रिटनचे ‘स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठ’ (Strathclyde University) भारतीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी मधील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देत ​​आहे. ही शिष्यवृत्ती ब्रिटिश कौन्सिल आणि यूकेच्या ४९ विद्यापीठांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ग्रेट स्कॉलरशिप प्रोग्रामचा एक भाग आहे.

मिळणार 10 लाखाची स्कॉलरशिप (Strathclyde Scholarship)
अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 10,000 पौंड म्हणजेच 10 लाख रुपयांच्या समतुल्य शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा लागेल. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांकडे भारत, मलेशिया किंवा थायलंडचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे 2024 आहे.

कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळणार शिष्यवृत्ती
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, शिष्यवृत्तीसाठी बायोमेडिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग, डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग आणि (Strathclyde Scholarship) इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर, ओशन ॲण्ड मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल ही क्षेत्रे आहेत. अभियांत्रिकी, सिव्हिल वनला अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, नवीकरणीय ऊर्जा इत्यादी कोणत्याही विषयात पीजीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com