UPSC Success Story : ICICI बँकेतील नोकरी सोडून दिली UPSC; मुलाला माहेरी ठेवून केला अभ्यास; देशात ठरली टॉपर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (UPSC Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या प्रयत्नात यश मिळवून त्यांनी हे दाखवून दिले की तुमची मेहनत ही कशावरही अवलंबून नसते. प्रशासकीय सेवेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षे स्वतःपासून दूर ठेवले होते. जाणून घ्या IAS अनु कुमारीची यशोगाथा….

अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
IAS अनु कुमारी यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1986 रोजी हरियाणातील सोनीपत येथे हिंदू जाट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलजीत सिंग आणि आईचे नाव संट्रो देवी आहे. अनु कुमारीला (UPSC Success Story) एक लहान बहीण आणि दोन भाऊ (IAS Anu Kumari Family) देखील आहेत. अनु कुमारी लहानपणापासून तिच्या अभ्यासाबाबत खूप जगरुक होत्या. त्यांनी चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.

अनु कुमारी किती शिकल्या
IAS अनु कुमारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिव शिक्षा सदन, सोनीपत येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात B.Sc ऑनर्स पदवी मिळवली. त्यांचा शिक्षणाचा प्रवास इथेच थांबला नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयएमटी नागपूरमधून (IMT Nagpur) एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.

ICICI बँकेत 9 वर्षे केली नोकरी (UPSC Success Story)
एमबीए केल्यानंतर IAS अनु कुमारी यांनी मुंबईतील ICICI बँकेच्या शाखेत काम करायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी गुरुग्राम येथील नामांकित व्यापारी वरुण दहिया यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनु गुरुग्रामला स्थायिक झाल्या. जवळपास 9 वर्षे नोकरी केल्यानंतर अनु यांनी प्रशासकीय सेवेत सामील होण्यासाठी तयारी सुरू केली. नोकरी मिळवून त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्या असल्या तरी सार्वजनिक सेवेत काम करण्याची त्यांची दीर्घकाळापासून इच्छा होती. म्हणूनच 2016 मध्ये त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसल्या होत्या.

अभ्यासासाठी मुलाला स्वतःपासून दूर ठेवले
UPSC परीक्षेची तयारी करत असताना अनु कुमारी यांचा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा होता. मुलाचा सांभाळ करत यूपीएससी परीक्षेची तयारी करणे तसे अवघड होते. म्हणून त्यांनी आपल्या (UPSC Success Story) मुलाला दोन वर्षांसाठी स्वतःपासून दूर त्यांच्या माहेरी आईकडे पाठवले. अनु यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले. 2017 मध्ये, अनु कुमारी यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला.

यशाच्या मार्गात आले अनेक अडथळे
ICICI बँकेतील नोकरी सोडून ते UPSC मध्ये पास होण्यापर्यंतचा प्रवास अनु यांच्यासाठी सोपा नव्हता. या मार्गात अनेक अडथळे आले. अभ्याससाठी जवळपास दोन वर्षे आपल्या मुलाला स्वतःपासून दूर ठेवून त्यांनी मोठी हिंमत दाखवली. मुलापासून दूर राहण्याचे दु:ख सहन करणाऱ्या अनु कुमारीने अभ्यासात येणाऱ्या अनेक आव्हानांचा धैर्याने सामना केला. या अडथळ्यांना न जुमानता त्यांनी त्यांची तयारी सुरू ठेवली. पण दुर्दैवाने (UPSC Success Story) परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता त्या शिकत राहिल्या. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा मोठ्या मार्कने पास केली. यावेळी त्यांना संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक मिळाला आणि त्या IAS अधिकारी बनल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com