Government Job : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी; पहा एप्रिलमध्ये कोणकोणत्या विभागात होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखो तरुण सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी धडपड करत असतात. बहुतेक तरुण उमेदवार यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, रेल्वे, मेट्रो, एसएससी, सरकारी बँक इत्यादींच्या वेबसाइटवर सरकारी भरतीच्या सूचना तपासत असतात. सरकारी नोकऱ्या शोधणारे तरुण या महिन्यात एसएससी जेई, यूपी मेट्रो व्हेकन्सी, बँक ऑफ इंडियामधील सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पुढील काही महिने महत्वाचे असणार आहेत. अनेक केंद्रीय विभागांमध्ये तसेच राज्य स्तरावर रिक्त पदांची घोषणा होणार आहे. तुम्हाला (Government Job) ज्या विभागामध्ये काम करायचे आहे त्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही सरकारी भरतीची अधिसूचना पाहू शकता. एप्रिल 2024 मध्ये सरकारी नोकऱ्यांचे पर्याय कुठे उपलब्ध होतील ते जाणून घेवूया…

SSC CHSL भरती (SSC CHSL Recruitment 2024)
कर्मचारी निवड आयोग दरवर्षी एकत्रित उच्च माध्यमिक स्तरावर भरती परीक्षा आयोजित करते. एसएससी सीएचएसएल परीक्षा पास केल्यानंतर 12वी पास तरुण भारत सरकारच्या गट क आणि गट ब (अराजपत्रित) मध्ये नोकरी मिळवू शकतात. SSC परीक्षा कॅलेंडर 2024 नुसार, SSC CHSL 2024 अधिसूचना एप्रिलमध्ये ssc.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. SSC CHSL 2024 परीक्षा जून-जुलै 2024 मध्ये होईल.

बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरी (Government Job)
बँक ऑफ इंडिया (BOI) ने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना (Government Job) जारी केली आहे. सरकारी बँकांमधील नोकऱ्यांसाठी तुम्ही एकूण 143 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. बँक ऑफ इंडिया 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. बँक ऑफ इंडियाने परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

SSC JE भरती 2024 (SSC JE Recruitment 2024)
एसएससी कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध सरकारी विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता पदांसाठी एसएससी जेई परीक्षेद्वारे भरती केली जाईल. SSC कनिष्ठ अभियंता सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. SSC JE फॉर्म 2024 18 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपर्यंत भरता येईल. तर, 19 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन फी भरता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com