के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

0

करिअरनामा आॅनलाईन | इस्रो चे चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किमी दूर होते. तोच त्याचा संपर्क तुटला. विक्रम लँडरच आयुष्य १४ दिवसाचं असल्याने आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू अस इस्रो ने म्हटले आहे. दरम्यान काल इस्रो प्रमुख के सिवण भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना धीर दिला.

दरम्यान के सिवान यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. कोणाच्या पण डोळ्यात अश्रू आणेल असा त्यांचा इस्रो पर्यंतचा प्रवास आहे. के सिवाण यांचा जन्म तामिळनाडू मधील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला.त्यांचे वडील शेतकरी होते.त्यांचं ८ वी पर्यंतचे शिक्षण तमिळ भाषेत सरकारी शाळेत झालं.

फी साठी विकले आंबे

के सीवान यांचे वडील आंबे विकत असत.८ वी नंतर फी साठी त्यांच्याकडे पैसे नसत.शिक्षण सोडण्याची वेळ आली होते.तेव्हा सीवान स्वतः सायकलवरून आंबे बाजारात नेत आणि विकत.त्यातून ते आपली शाळेची फी देत असत.

वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी विकली जमीन, महाविद्यालयात पण घातले धोतर

के सीवान यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.त्यांना गणितात १०० टक्के गुण मिळाले.त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश मिळाला.येथूनच अब्दुल कलाम यांनी आपल शिक्षण पूर्ण केले होते.या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकण्यासाठी सीवान यांच्या वडिलांनी जमीन विकली.सीवान कॉलेजमध्ये पण धोतर नेसून जात असत.त्यांना लहानपणी बूट किंवा चप्पल मिळाली नाही.

सीवान १९८२ ला इस्रो मध्ये आले.२००६ ला त्यांनी आयआयटी मुंबई येथून पीएचडी पूर्ण केली.२०१५ सालो ते इस्त्रोचे प्रमुख झाले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रो ने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा पराक्रम केला.तसेच क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात पण त्यांचे मोलाचे योगदान आहे.आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.तसेच ती कित्येक युवांचे प्रेरणास्थान पण बनले आहेत.

%d bloggers like this: