MPSC Update : MPSC ची मोठी घोषणा!! 800 पदांची भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर…

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC चा अभ्यास करत (MPSC Update) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार आहे.

MPSC पूर्व परीक्षा रचनेत असे आहेत महत्‍वपूर्ण बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्‍यानुसार आता CSAT चा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये 33 टक्‍के गुण प्राप्त (MPSC Update) उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या निर्णयामुळे कला, वाणिज्‍य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

पेपर क्र. 1 चे गुण ठरवणार मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील स्थान (MPSC Update)

आता राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 2 तपासल्‍यानंतर, ज्‍या उमेदवारांना किमान 33 टक्‍के गुण अर्थात 66 किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

सर्वांना समान संधी मिळणार –

CSAT चा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍याने कला, वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत CSAT च्‍या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण (MPSC Update) असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. या निर्णयामुळे आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया MPSC मार्फत –

“ 1994 नंतर मुद्रांक आणि नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक संवर्गाची पदभरती झालेली नव्हती. ही पदे MPSCच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. आता पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवली जाईल.” अशी माहिती MPSCचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com