MPSC Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०० पदांसाठी भरती जाहीर

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत होते. आता प्रतीक्षा संपली असून विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. २०० पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये पुढील महत्वाच्या पदांचा समावेश आहे.

महत्त्वाची पदे –

सहायक राज्यकर आयुक्त – १० पदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी – ७ पदे
उपशिक्षणाधिकारी – २५ पदे
कक्ष अधिकारी – २५ पदे
सहायक गट विकास अधिकारी – १२ पदे
सहायक निबंधक – १९ पदे
नायब तहसीलदार – ७३ पदे

पूर्व परीक्षेतुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा दिनांक २,३ व ४ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर घेतली जाण्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षेनंतर पदांच्या संख्येत वाढ देखील होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी निघालेल्या जागांच्या तुलनेत या जागा जास्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. MPSC Online

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.