MPSC News : ‘नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करा’; या मागणीसाठी उद्या पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

करिअरनामा ऑनलाईन |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी घेतलेल्या (MPSC News) निर्णयामुळे MPSCची तयारी करणारे विद्ययार्थ, आयोग आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पहायला मिळतो. दोन दिवसांपूर्वी वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडून आपल्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण आता वर्णनात्मक अभ्यासक्रमाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करावा या मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी उद्या दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अलका टॉकीज चौकात आंदोलन करणार आहेत.

आयोगाने जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे ज्या उमेदवारांनी वर्षभर अभ्यास केला आहे; त्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही नवीन बदलानुसार (MPSC News) अभ्यास केला असून आमचे शैक्षणिक नुकसान होवू नये यसाथही नवीन अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी पासूनच लागू करावा; अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी उद्या पुण्यात MPSC चे विद्यार्थी तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

दरम्यान UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा वर्णनात्मक पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. नुकत्याच (MPSC News) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता अभ्यासक्रमातील नवीन बदलांचा मुद्दा पुनः ऐरणीवर आल्यामुळे नवीन बदलाप्रमाणे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com