How to Join Indian Air Force : 12वी नंतर इंडियन एअर फोर्समध्ये कसं सामील व्हायचं? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि निवड प्रक्रियेबद्दल 

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही देखील बारावी पास झाला (How to Join Indian Air Force) असाल तर यानंतर तुम्ही भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सहभागी होऊन देशाची सेवा करू शकता. UPSC व्दारे घेतल्या जाणाऱ्या NDA परीक्षेद्वारे तसेच ग्रुप X आणि ग्रुप Y पदांसाठी भरतीद्वारे भारतीय हवाई दलात सामील होऊ शकता येते. हवाई दलाकडून दरवर्षी ही भरती केली जाते.

आपल्या देशातील लाखो तरुणांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असते. जर तुमच्या मनात अशी भावना असेल आणि तुम्हाला भारतीय हवाई दलात भरती व्हायचे असेल तर तुम्ही बारावीनंतरच त्यादृष्टीने तयारी करू शकता आणि ही प्रतिष्ठित नोकरी मिळवून स्वतःचे करिअर घडवू शकता. जर तुम्हाला हवाई दलातील (Air Force) भरती प्रक्रियेबद्दल माहिती मिळवायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे आम्ही 12वी नंतर हवाई दलात नोकरी मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगत आहोत.

NDA म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा
12वी नंतर भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी NDA म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (National Defence Academy) परीक्षा द्यावी लागते. तुम्ही या परीक्षेत सहभागी (How to Join Indian Air Force) होऊ शकता. जर तुम्ही या परीक्षेत आवश्यक गुण मिळवले आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवले तर तुम्हाला हवाई दलात भरती होण्याची संधी मिळते. ही परीक्षा दरवर्षी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित केली जाते.
काय आहे पात्रता
UPSC NDA मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 16 वर्षांपेक्षा कमी आणि 19 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

गट X आणि गट Y पदांच्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकता
UPSC NDA व्यतिरिक्त, भारतीय वायुसेनेद्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या गट X आणि गट Y पदांच्या भरतीमध्ये उमेदवार सहभागी होऊ शकतात. गट X पदांची भरती तांत्रिक कर्मचार्‍यांसाठी केली जाते तर गट Y पदांची भरती अतांत्रिक पदांसाठी केली जाते.
काय आहे आवश्यक पात्रता (How to Join Indian Air Force)
गट X पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय तीन वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा घेतलेले उमेदवारही या भरतीत सहभागी होऊ शकतात.
गट Y पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंटरमिजिएट परीक्षा 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला इंग्रजी विषयात 50 टक्के गुण मिळालेले असावेत. यासोबतच 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे उमेदवारही या भरतीत सहभागी होऊ शकतात.

आवश्यक शारीरिक पात्रता
गट X आणि Y पदांच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांची (How to Join Indian Air Force) किमान उंची 152.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वजन 55 किलो आणि छातीचा विस्तार 5 से. मी. असावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com