How To Become A Judge : भारतात न्यायाधीश कसं व्हायचं? पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात न्यायाधीशाच्या (How To Become A Judge) नोकरीला समाजात सर्वोच्च स्थान आहे. न्यायाधीशांना ‘कायद्याचा देव’ देखील म्हटलं जातं कारण ते कोणताही भेदभाव न करता निर्णय घेवून त्या आधारे लोकांना न्याय देतात. जर तुम्हालाही न्यायाधीश बनून लोकांची आणि समाजाची सेवा करायची असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर न्यायाधीश बनून हे ध्येय साध्य करता येईल. न्यायाधीश होण्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण होऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. न्यायाधीश म्हणून काम करण्याचा विचार करणारे उमेदवार या लेखातून पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

न्यायाधीश होण्यासाठी 12वी नंतर अभ्यास सुरु करता येईल. न्यायाधीश (Judge) होण्यासाठी तुम्ही 5 वर्षांचा किंवा 3 वर्षांचा LLB कोर्स करू शकता. कोर्स केल्यानंतर, तुम्हाला न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यामध्ये यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षणानंतर ‘मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’ (Metropolitan Magistrate) किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट (Judicial Magistrate) या पदावर नियुक्त केले जाते.

दिवाणी न्यायाधीक्ष होण्यासाठी असे आहेत टप्पे (How To Become A Judge)
भारतात न्यायाधीश होण्यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. न्यायाधीश होण्यासाठी तुम्ही 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करु शकता. 12वी नंतर तुम्ही बॅचलर ऑफ लॉ (Bachelor of Law) कोर्सला प्रवेश घेऊ शकता. कायद्यातील पदवीचा कालावधी 5 वर्षांचा आहे ज्यासाठी तुम्हाला CLAT परीक्षेस बसावे लागेल. याशिवाय, अनेक महाविद्यालये/विद्यापीठांमध्ये 3 वर्षांचा LLB अभ्यासक्रम उपलब्ध आहे ज्यासाठी संस्था त्यांच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षेच्या किंवा गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

अशी होते परीक्षा
बॅचलर ऑफ लॉ/ एलएलबी (LLB) केल्यानंतर, तुम्हाला न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेत भाग घ्यावा लागेल.
न्यायाधीश होण्यासाठी राज्यांच्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत न्यायिक सेवा परीक्षा आयोजित केली जाते. विविध स्पर्धा परीक्षांप्रमाणे, उमेदवारांना प्रिलिम/मुख्य परीक्षा, मुलाखत, व्हिवा या टप्यातून  जावे लागेल. ज्या उमेदवारांची नावे अंतिम गुणवत्ता यादीत येतील त्यांना नंतर न्यायाधीश होण्यासाठी (How To Become A Judge) प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण घेण्यासाठी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट या पदावर नियुक्ती दिली जाईल.

इतका मिळतो पगार
न्यायाधीश झाल्यानंतर तुमच्या रँकनुसार पगार (Salary) दिला जातो. कनिष्ठ न्यायव्यवस्थेत नियुक्त केलेल्या न्यायाधीशांना दरमहा 30,000 ते 50,000 रुपये पगार दिला जातो. याशिवाय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला दरमहा 1 लाख ते 2 लाख 50 हजार रुपये वेतन दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com