Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या भरती प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

10,949 जागांसाठी निघाली  जाहिरात
आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघाली आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ‘क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

2011 साली ही भरती प्रक्रिया सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता, त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आता पुन्हा आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.

या पदांचा समावेश (Health Department Recruitment)
गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक,वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त ताण कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी (Health Department Recruitment) आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर सर्व स्तरांतून टीका करण्यात येत होती. विरोधकांनीही यावरून प्रशासनाकडे उत्तर मागितलं होतं. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला होता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com