Foreign Scholarships for Maratha Students : मराठा विद्यार्थ्यांचं परदेशी शिकण्याचं स्वप्न साकार होणार; राज्य सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे (Foreign Scholarships for Maratha Students) परदेशी उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत आता एकसमानता आणण्यात येणार आहे. त्यामध्ये परदेशी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची संख्या व निवडीचे निकष ठरविण्यात येणार असून, त्या आधारे ‘राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) प्रस्तावित परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे निकष निश्चित केले जाणार आहेत.

मराठा समाजातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांची होणार निवड (Foreign Scholarships for Maratha Students)
राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे खुला प्रवर्ग, समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी (Foreign Scholarships for Maratha Students) समाजघटकांतील विद्यार्थ्यांना परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. त्या धर्तीवर मराठा समाजातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांनाही परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव ‘सारथी’ने नियोजन विभागाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी सरकारच्या सर्व विभागांमार्फत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नियमावलीत एकसमानता आणण्यात येणार आहे.

‘राज्य सरकारच्या विविध विभागांतर्फे त्यांच्या संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून संबंधित समाजघटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनांचे नियम समान करण्यासाठी नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत प्रत्येक विभागात परदेशी शिष्यवृत्तीचे निकष काय असावेत, लाभार्थ्यांची संख्या किती असावी यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार (Foreign Scholarships for Maratha Students) सर्व विभागांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे नियम एकसमान करण्यात येत असून, त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर ‘सारथी’च्या प्रस्तावात सुधारणा करण्यात येईल. त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे, असं नियोजन विभागाच्या सहसचिव सी. एन. सूर्यवंशी यांनी सांगितले.

विद्यापीठांच्या ‘रँकिंग’चे निकष समान करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
राज्य सरकारच्या विविध विभागांकडून परदेशातील विद्यापीठे किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी परदेशी विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांचे ‘क्यूएस रँकिंग’ तपासून त्या शिष्यवृत्तीचा (Foreign Scholarships for Maratha Students) लाभ दिला जातो. मात्र, या संदर्भात प्रत्येक विभागांचे निकष वेगवेगळे आहेत. समाजकल्याण विभागाकडून जागतिक रँकिंग 300च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये, तर इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे जागतिक रँकिंग 200च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी व पीएचडीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. त्यामध्येही एकसमानता हवी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान ‘बार्टी’, ‘महाज्योती, ‘सारथी, ‘टीआरटीआय’ या सर्व संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी बैठक पर पडली. त्यानुसार ‘सारथी’च्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा सुधारित प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. या (Foreign Scholarships for Maratha Students) प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com