CM Fellowship 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर!! शासनासोबत काम करा आणि मिळवा ‘एवढे’ वेतन

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील होतकरू तरुणांसाठी एक आनंदाची (CM Fellowship 2023) बातमी आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम काही वर्षांपासून बंद होता. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फेलोशिपसाठी तरूणांनी अर्ज करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्यांच्यातील कल्पकतेचा वापर करून प्रशासकीय कामांना गती द्यावी, हा या फेलोशिपचा उद्देश आहे.

अर्ज करण्याचा कालावधी – (CM Fellowship 2023)

  1. मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमासाठी 7 फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारण्यात सुरूवात झाली आहे.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2023 आहे.
  3. तसेच 3 मार्च ते 5 मार्च दरम्यान मॉक टेस्ट आणि 4 आणि 5 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

इतके मिळेल वेतन –

  1. या फेलोशिपसाठी 60 तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना राज्य शासनाच्या विविध विभागात वर्षभर काम करण्याची संधी मिळणार आहे. (CM Fellowship 2023)
  2. तसेच उमेदवारांना 75 हजार रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. 10 वी, 12 वी आणि पदवीची गुणपत्रिका
  2. एक वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
  3. छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत
  4. पत्त्याचा पुरावा
  5. पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र

फेलोशिपसाठी पात्रता निकष –

  1. मुख्यमंत्री फेलोशिप 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्षेदरम्यान असावे.
  2. तसेच संबंधित उमेदवाराने कोणत्याही (CM Fellowship 2023) शाखेतील पदवी 60 टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी.
  3. तसेच त्याला एका वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असावा.

फेलोशिपसाठी अटी व शर्थी अशा असतील –

  1. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून या दरम्यान उमेदवारांना इतर कोणतीही नोकरी, व्यवसाय आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नाही.
  2. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना शासनाच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेतले जाणार नाही.
  3. उमेदवाराला संबंधिक कार्यालयाच्या वेळा (CM Fellowship 2023) आणि आवश्यकतेनुसार प्रवास करणे अनिवार्य असेल.
  4. या कालावधीत उमेदवाराला कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. तसेच उमेदवारांना रूजू होण्यापूर्वी पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

इथे मिळेल संपूर्ण माहिती – (CM Fellowship 2023)

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP

E-Mail – [email protected]

हेल्पलाइन नंबर – 8411960005

फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com