Career Tips : या खास कोर्सबद्दल तुम्ही ऐकलंय का? मिळवून देतील छप्पर फाड पैसा!!

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या चिंतेत असणारे विद्यार्थी (Career Tips) कोणाच्यातरी सांगण्यावरून एखाद्या कोर्सला प्रवेश घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता करत बसण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याने असं काहीतरी करणे आवश्यक आहे जे चौकटीच्या बाहेर जावून करता येईल. शिवाय या कोर्समधून पगारही उत्तम मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत जे थोडे वेगळे आहेत पण पगाराच्या दृष्टीने सर्वोत्तम कोर्स आहेत. यापैकी एकही कोर्स केल्यानंतर तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला देशातच नाही तर परदेशातही मागणी असेल. त्याच वेळी, करिअरसंबंधी तुमची चिंता देखील दूर होईल.

1. विटी कल्चर आणि अॅनालॉगी कोर्स
या कोर्समध्ये वाईन बनवण्याच्या पद्धती आणि त्याचे जतन करणे शिकवले जाते. हा कोर्स जगातील अनेक विद्यापीठांद्वारे ऑफर केला जातो. अमेरिकेचे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीया कोर्सचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देते. याशिवाय देशातील गार्गी कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे वाईन टेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एक लक्षात घ्या की, हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ‘वाईन स्पेशालिस्ट’ बनून चांगला पगार मिळवू शकता.

2. कठपुतली कलेमध्ये पदवी शिक्षण
प्रत्येकाने कधी ना कधी कठपुतली नृत्य पाहिले असेलच. यामध्ये कठपुतली कलेचाही अभ्यास केला जातो; हे अनेकांना माहित नसेल. अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठ 3 पदवी अभ्यासक्रम ऑफर करते. या अभ्यासक्रमांची नावे आहेत;
1. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच (BFA)
2. मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजेच (MA) आणि
3. मास्टर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच (MFA)
मुंबई विद्यापीठात कठपुतली कलेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. तुम्ही कठपुतली कला हा तुमचा छंद बनवू शकता. आजकाल कठपुतली कलाकारांना विदेशात चांगली मागणी आहे. जर आपण पगाराबद्दल बोललो, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही; हा कोर्स केल्यानंतर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

3. टर्फ गवत विज्ञान अभ्यासक्रम (Career Tips)
या अभ्यासक्रमात पदवी आणि प्रमाणपत्र असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमादरम्यान गवत वाढवण्याच्या पद्धती, त्याची निगा आणि व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती दिली जाते. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स आणि पेनसिल्व्हेनियासारख्या विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय देशातील काही खासगी विद्यापीठेही त्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवतात. या कोर्सचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही गोल्फ कोर्स सुपरिटेंडंट, ग्राउंडकीपर आणि लँडस्केप डिझायनर बनू शकता. पगाराबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला लाखात पगार मिळतो. त्याचवेळी हे कोर्स केल्यानंतर जसा तुमचा अनुभव वाढत जातो, तसतसे या क्षेत्रात तुम्हाला मिळणाऱ्या पैशामध्येही वाढ होत जाते.

4. स्पा मॅनेजमेंट कोर्स
हा अभ्यासक्रम ब्रिटनच्या डर्बी विद्यापीठाने दिला आहे. या कोर्समध्ये स्पा म्हणजे काय, डाएट आणि एक्सरसाइज सोबत स्पा व्यवसाय कसा मॅनेज करायचा हे (Career Tips) शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्पा मॅनेजर बनू शकता. आपल्याच देशात स्पा मॅनेजरला लाखोंचे पॅकेज मिळते. तसेच हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला परदेशातही मोठी मागणी आहे.
5. कंटेम्परेरी सर्कस एंड फिजिकल परफॉर्मेंसमध्ये डिग्री
ब्रिटनचे बाथ स्पा युनिव्हर्सिटी कंटेम्पररी सर्कस अँड फिजिकल परफॉर्मन्स नावाचा (बीए ऑनर्स) पदवी अभ्यासक्रम देते. या कोर्समध्ये तुमच्या सर्कस कौशल्यासोबत फिजिकल थिएटर, परफॉर्मन्स स्किल्ससह तुमच्या सर्जनशीलतेला चालना देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com