Career Success Story : देशाच्या आर्थिक सेवेत जायचं म्हणून 25 लाख पगाराची नोकरी सोडली; हा तरुण देशात ठरला टॉपर

करिअरनामा ऑनलाईन । माणसाने एकदा निश्चय केला तर (Career Success Story) त्याच्यासाठी अशक्यही गोष्ट शक्य होते. निश्चल मित्तलनेही असेच काही करुन दाखवले आहे. भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथील निश्चलने भारतीय अर्थशास्त्र सेवेत (IES) संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून नावलौकिक मिळवला आहे. कठोर मेहनत घेऊन आयईएस होण्याचे हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. यासाठी त्याने स्विस बँक मुंबईतील महिना 25 लाख रुपये पगार देणारी नोकरीही सोडली; कारण तो या नोकरीत समाधानी नव्हता. यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवण्याचं त्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं आणि मेहनतीच्या जोरावरत्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. यापरिक्षेत निश्चल यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून ते देशात टॉपर विद्यार्थी ठरले आहेत.

इतकं झालं आहे शिक्षण
निश्चल मित्तल यांनी बायणा येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बी. एस. सी. केले आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पोस्ट ग्रॅज्युएटची पदवी घेतली. येथून कॅम्पस प्लेसमेंटद्वारे त्यांना स्विस बँकेत अधिकृत अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली. त्यानंतर निश्चलने ठरवले की आपल्याला भारतीय अर्थशास्त्र सेवेत सामील होण्यासाठी अभ्यासाची तयारी करायची आहे.

आठ महिन्याची कठोर मेहनत (Career Success Story)
निश्चलने पूर्णवेळ नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी केली आणि यामध्ये त्याने यश मिळवले आहे. ते तरुणांना असा सल्ला देतात की, “मेहनतीला घाबरू नका, वेळेचे योग्य व्यवस्थापन करा.” निश्चलचे वडील शशी मित्तल मुळबद्दल बोलताना सांगतात की, “निश्चलने 10 वी बोर्डाच्या परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. यानंतर त्याने जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बीएस्सी केले, मात्र रसायनशास्त्रासोबत गणित, भौतिकशास्त्र घेण्याऐवजी त्याने बीएस्सीमध्ये अर्थशास्त्र विषय निवडला. त्याने अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. त्यानंतर त्याने UPSC परीक्षेचा फॉर्म भरला. या मुख्य परीक्षेसाठी त्याने दरमहा 25 लाख रुपये देणारी नोकरी सोडली. यानंतर आठ महिने एका बंद खोलीत बसून या परीक्षेची कसून तयारी केली आणि अखेर त्याला या कठोर मेहनतीचे फळ मिळाले आणि तो IES अधिकारी झाला.

आयईएस परिक्षेत संपूर्ण भारतात प्रथम
निश्चलचे वडील शशी मित्तल हे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवतात तर त्यांची आई गृहिणी आहे. निश्चल हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. त्यांची मुंबई येथे आरबीआय बँकेत (Career Success Story) व्यवस्थापक पदावर निवड झाली होती. मात्र त्यांना आयईएस अधिकारीच व्हायचे होते.
निश्चलचे वडील शशी मित्तल आणि बहीण चित्रिका मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, 12वीनंतर निश्चल आयआयटीचे कोचिंग घेण्यासाठी कोटा येथे गेला होता. मात्र तेथे त्याची निवड होऊ शकली नाही. पण बीएस्सीमध्ये अर्थशास्त्र विषय घेणे हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरला. यामुळेच निश्चलने आयईएस परिक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ग्रुप स्टडी, कठोर परिश्रम आणि वेळेचे व्यवस्थापन
निश्चलने मिळवलेले यश कठोर परिश्रम आणि वेळेच्या व्यवस्थापनाचे फळ आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून इकॉनॉमिक्स विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन (Career Success Story) केल्यानंतर निश्चलने NET-JRF मध्ये पात्रता मिळवली होती. नोकरी करत असताना त्याने परीक्षेची तयारी केली. यासाठी वेळेचे व्यवस्थापन सर्वात महत्त्वाची बाब ठरली. निश्चल सांगतात की, “मला सुरुवातीपासूनच अर्थशास्त्रात विशेष रस आहे. म्हणूनच मी आयईएस होण्याचे स्वप्न पाहिले. परीक्षेच्या तयारीसाठी मी ग्रुप स्टडी केला आणि ऑनलाइन कंटेंटनेही मला खूप मदत केली”; असं ते सांगतात
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com