Career News : लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर कमी; आरोग्य विभागात होणार 15 हजार जागांवर मेगाभरती 

करिअरनामा ऑनलाईन । चांगली आरोग्य सेवा मिळणं हा प्रत्येक (Career News) नागरिकाचा अधिकार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागात 15 हजार जागांची भरती  केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी भरतीची माहिती दिली.

यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात (Career News) मोठी भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या सरकारमध्ये देखील आरोग्य भरती करण्याचा निर्णय झाला, पण यासाठी घेण्यात आलेली परीक्षा आणि निवडपद्धत वादात सापडली होती. तर यावेळी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप झाला होता. त्यामुळे यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

अवयदानाबाबत जनजागृती होणं गरजेचं (Career News)
देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज असल्याचे महाजन म्हणाले. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. पाश्चिमात्य देशात 10 हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3500 आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. त्यामुळे अवयदानबाबत जनजागृती होणे (Career News) आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. पुढील काळात जिल्हा निवड समितीच्या मार्फत 4500 पदांना भरतीची मंजूरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रीया पुढील दोन महिन्यात पुर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले या अभियानामध्ये जनतेचे मोलाचे योगदान आवश्यक असल्याचे आवाहन महाजन यांनी केले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com