Career After 12th : आर्ट्समधून 12 वी केल्यानंतर ‘हे’ क्षेत्र निवडून मिळवू शकता सरकारी नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या (Career After 12th) असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या भविष्याचे नियोजन सुरू केले आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आज आम्ही कला शाखेतून 12वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्यमातून त्यांना या क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते.

कला (Arts) शाखेत 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रही चांगला पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात देखील, विविध पदांसाठी भरती आहेत, ज्यासाठी उमेदवार ठराविक शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. यासह अजूनही काही क्षेत्रे आहेत जेथे तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता त्यावर एक नजर टाकूया…

1. UPSC (Union Public Service Comission)
UPSC नागरी सेवा परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये वेगळीच क्रेझ पहायला मिळते. दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार या परीक्षेची तयारी करत असतात. अशा परिस्थितीत, या परीक्षेला (Career After 12th) बसण्यासाठी, ज्यांनी कला शाखेतून बारावी पूर्ण केली आहे ते प्रथम कला शाखेतून पदवी घेऊन या परीक्षेची तयारी सुरू करू शकतात. यानंतर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेला बसू शकता.

2. बँकिंग (Banking)
कला शाखेत बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी बँकिंग (Career After 12th) क्षेत्रही चांगला पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात देखील, विविध पदांवर तुमच्यासाठी भरती आहे; ज्यासाठी उमेदवार अनिवार्य शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

3. शिक्षक (Teacher)
कला शाखेतून 12वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन (Career After 12th) क्षेत्र हा एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो, ज्यामध्ये ते पुढे जाऊन सरकारी नोकरी मिळवू शकतात. यासाठी, उमेदवार, प्रथम संबंधित क्षेत्रातील पदवी आणि नंतर B.Ed, D.Ed पदवी प्राप्त केल्यानंतर, KVS, नवोदय आणि त्या त्या राज्यांनी जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.

खाजगी क्षेत्रातील संधी (Career After 12th)
तुम्हाला खासगी क्षेत्रात जायचे असेल तर तुमच्याकडे अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या छंदानुसार नृत्य, अभिनय, संगीत असे क्षेत्र निवडू शकता. याशिवाय आजच्या काळात ब्लॉगिंग आणि यूट्यूबर हे देखील एक चांगले पर्याय आहेत. लोक YouTube वर त्यांची स्वतःची सामग्री तयार करून चांगली कमाई करत आहेत. याशिवाय फोटोग्राफी, ब्लॉगिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, ग्राफिक्स डिझायनर, फॅशन डिझायनर, फाइन आर्ट्स, जर्नालिझम, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट, टूर अँड ट्रॅव्हल्स असे इतर पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com