Big News : पोलीस पाटलांच्या मानधनात घसघशीत वाढ!! निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस पाटलांसाठी एक अत्यंत महत्वाची (Big News) अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस पाटलांचे (Police Patil) मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरण्यात येत होता. ही मागणी मान्य करत आता राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात भरभरुन वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पोटील यांना महिन्याला 15 हजार रुपये मिळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता (Election Code of Conduct) लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात भरभरुन वाढ करण्यात (Big News) आली आहे. आतापर्यंत पोलीस पाटलांना दरमहा 6 हजार 500 रुपये मानधन मिळत होते. आता त्यांना महिन्याला 15 हजार रुपये मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांचे मानदन वाढवण्याची मागणी होत होती. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला जात होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी (दि. 13) घेण्यात आला.

काय करतात पोलीस पाटील (Big News)
ज्या गावात पोलीस ठाणे नसते, त्या गावात पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. गावातील तंटे, हाणामाऱ्या आणि वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस पाटलांना 24 तास कर्त्यव्य बजावावे लागत होते याबदल्यात त्यांना साडे 6 हजार रुपये मानधन मिळत होते. कामाच्या बदल्यात तुटपुंजा मोबदला मिळत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनकडून मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com