Bed Rest Studies : इथे चक्क झोपायचा मिळतो लाखोंत पगार; ‘या’ संस्थेत कर्मचाऱ्यांना दिलं जातं आराम करण्याचं काम

करिअरनामा ऑनलाईन । उदरनिर्वाह करण्यासाठी लोक अनेक (Bed Rest Studies) प्रकाराचे काम करत असतात. काही व्यवसायात उतरतात तर काही नोकरी करणे पसंत करतात.  नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा असतो. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असं चित्र पाहायला मिळतं. या गटातील सदस्य सतत काम करत असतात. यामुळे ते ज्या ठिकाणी ताणतणाव असणार नाही, कामावरुन बॉसची बोलणी खावी लागणार नाही अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असतात. त्यातही काहीजण काम कमी आणि पैसे जास्त मिळावेत अशी अपेक्षा करत असतात. अशाच एका आरामदायी नोकरीविषयीची माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Bed Rest Studies

NASA देणार झोपायचे पैसे (Nasa Artificial Gravity Bed Rest Experiment)
नासा म्हणजेच ‘नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी’ या अमेरिकन संस्थेमध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना झोपायचे पैसे मिळणार आहेत. नासासंबंधित ही गोष्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे लोकांची या नोकरीबद्दलची उत्सुकता वाढली (Bed Rest Studies) आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे जर्मन एरोस्पेस सेंटर मिळून बऱ्याच काळापासून कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्टसंबंधित संशोधन करत आहे. त्यांच्या या प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना महिन्याला 13 ते 14 लाख रुपये दिले जातात असं म्हटलं जात आहे.

Bed Rest Studies

असं आहे जॉब प्रोफाईल (Bed Rest Studies)
नासाच्या संशोधनातील प्रयोगामध्ये व्यक्तीला बेडवर झोपवले जाते आणि त्याच्या शरीराचा अभ्यास केला जातो. एका जागी दिवसरात्र झोपून राहिल्यावर मानवी शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात याबद्दल शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी या अमेरिकन संस्थेद्वारे सदर प्रयोगामध्ये याआधीही अनेकजण सहभागी झाले आहेत. या प्रयोगामध्ये सहभाग घेणाऱ्यांना दोन महिने शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागते.

 

Bed Rest Studies

सोशल मीडियावर या नोकरीची चर्चा
अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, नासाच्या कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्ट प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल 18 हजार (Bed Rest Studies) अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 14 लाख रुपये दिले जातात. म्हणजे त्यातील एका व्यक्तीवर एका महिन्यात 7 लाख रुपये खर्च केले जातात. दरम्यान ही गोष्ट खरी आहे की खोटी याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.
अधिक माहितीसाठी CLICK करा – https://www.nasa.gov/analogs/envihab/bed-rest-faqs

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com