Army Success Story : वॉचमनच्या मुलाचा मोठा पराक्रम!! भारतीय सैन्यात झाला लेफ्टनंट

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना आजूबाजूच्या वातावरणापासून (Army Success Story) दूर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते त्या व्यक्ती आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीसमोर हार मानणारी माणसे हा बदल करण्यात हातभार लावू शकत नाहीत आणि त्यांच्या पुढील पिढ्याही अशाच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहतात. हिमाचल प्रदेशच्या गगनेशने काही वेगळे करायचे ठरवले नसते, तर आज तोही आपल्या वडिलांप्रमाणे किरकोळ नोकरी करताना दिसला असता.

वडील वॉचमन तर मुलगा झाला आर्मी ऑफिसर
गगनेश कुमार हा हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील कोठी गहरी रेवालसर या गावातील रहिवासी आहे. तो सध्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट झाला आहे. गगनेशच्या वडिलांसाठी ही बाब खूप अभिमानाची आहे. कारण ते स्वतः वॉचमन आहेत पण त्यांनी आपल्या मुलाला सैन्यात अधिकारी बनवून दाखवले आहे. गगनेशचे वडील बलदेव सिंह हिमाचल प्रदेश क्रीडा आणि युवा सेवा विभागात वॉचमन म्हणून काम (Army Success Story) करतात.
हिमाचल प्रदेशच्या क्रीडा विभागात नोकरी करत असलेले गगनेशचे वडील चौकीदार बलदेव सिंग आणि घर सांभाळणारी त्याची आई इंदिरा देवी यांच्यासाठी ही बाब अभिमानास्पद आहे. परंपरेनुसार खांद्यावर बिल्ला लावून आपल्या मुलाचे स्वागत करताना पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा सोहळा लखनौमधील आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता.

दुसरा मुलगाही आहे सैन्यात
गगनेश हा आधीच सैन्यात लिपिक म्हणून काम करत होता आणि त्याच दरम्यान त्याने पुढील परीक्षा दिल्या आणि त्याला सैन्यात प्रमोशन मिळाले. बलदेव सिंह यांनी सांगितले की, त्यांचा दुसरा मुलगाही लष्करात लिपिक म्हणून कार्यरत आहे.
वडिलांनी 28 वर्षे केली रोजंदारी (Army Success Story)
गगनेश याने सरकारी शाळेतून शिक्षण घेतले आहे. तो देशभरातील इतर ४७ सैनिकांसह उत्तीर्ण झाला आहे. सैन्यात भरती होण्यापूर्वी गगनेश जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चांगला बॅडमिंटनपटू होता. गगनेश वडील बलदेव सिंग क्रीडा व युवक सेवा विभागात 28 वर्षे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होते. आपली दोन्ही मुले  सैन्यात भरती झाली आहेत; ही बाब त्यांच्यासाठी अभिमानाची आहे. कमी उत्पन्न आणि इतर सोई सुविधांचा अभाव असला तरी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले. आता त्यांचा एक मुलगा लेफ्टनंट झाल्यावर वडिलांनी रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे खरे फळ त्यांना मिळाले. गगनेशने आपल्या यशाचे श्रेय त्याचे पालक आणि शिक्षकांना दिले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com